माझी आई अशीच आहें भाग -१२वा
💐💐💐💐💐💐💐
माझी आई अशीच आहें
(भाग-१२)
👏👏💐💐👏👏💐💐
... नानाभाऊ माळी
....एक छोटासा अश्रू बिंदू कधीतरी प्रसंग पाहून घरंगळतं असतो डोळ्यांच्या कडा भिजतात!ओलावतात!तो काचेरी अनमोल बिंदू जेव्हा आईच्या डोळ्यातला असतो तेव्हा साक्षात ईश्वर आईच्या रुपात अश्रू गाळीत असतो!आपल्या अनावर झालेल्या भावना अश्रुत भिजवत असतो!श्रेय आई घेत असतें!वेदनेची किनार अश्रुत भिजवून भावनेला वाट करून देणारी आई या जगात ईश्वरानंतर दुसरी असावी!या विश्वाची जननी विश्व साकारण्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत असतें!मनात दुःख रिचवणारी!हृदयातलं चांगलें तेचं वाटणारी!कानाच्या पडद्यातून चांगलं तेचं गाळून ऐकणारी आई!मुखातून साखर पेहरणी करणारी आई दृष्टी देत जग दर्शन करवून देत असतें!तिच्या बोलक्या डोळ्यातं श्रद्धेचा विश्वास दिसत असतो!आई श्रद्धा निर्माता असतें!हळव्या हृदयात कोमलतेचं सुंदर फुलं मांडून ठेवणारी आई फुलांचा ताटवा होऊन प्रसन्न, प्रफुल्लित असतें!देवाच्या गाभाऱ्यातील चंदनासम पवित्र सुगंध देणारी आई देवाला जवळ असतें!अन आईला मुलं हृदयातली असतात!म्हणून आई महान असतें!.. माझी आई अशीच आहें!🌹
"बोट धरुनी चालतांना
कधी झोका होते आई
धोका घंटी वाजतांना
माझी आका होते आई....!
जगाशी देणे घेणे नाही
माझी जग होते आई
कधी कधी हरतांना
माझी धग होते आई....!
मी रांगुनि उठतांना....
माझा आधार होते आई
धडपडून पळतांना....
काळजाचा हात देते आई..!
जोर जोरात रडतांना
कधी पान्हा देते आई
दंग होऊनि खेळतांना
स्वतः वहाणा होते आई...!
कळे ना सागराची खोली
अशी असतें आपुली आई
डोळे दिसेना उब हवा....
अंगा स्पर्शूनी जाते आई...!"
घरातून मुलगा कामाला निघतो!निघतांना घरातल्या थोरा मोठ्यांच्या पाया पडतो!आई ओट्यावर उभी राहून दूर...दूर जाईपर्यंत पाहत राहते!डोळ्यांच्या छोट्याश्या कॅमेऱ्यातून अस्पष्ट दिसें पर्यंत मुलाला पाहत राहते!असा असतो ममतेचा झरा?...वाहतचं रहातो!..वाहतचं रहातो..!कधी संपत नाही!कधी आटत नाही!कधी थांबत नाही!शुद्ध संस्कार रस वाहतचं रहातो!....🌹
आपण एक मिनिटं श्वास रोखून पाहू या बरं!श्वास घ्यायचाही ही नाही आणि सोडायचाही नाही!...जीव कोंडल्यासारखा होतो!गुदमरल्या सारखं होत असतं!येणाऱ्या, जाणाऱ्या प्रत्येक श्वासात ईश्वर ये जा करीत असतो!प्राण येरझाऱ्या करीत असतो!श्वासाचं येणं जाणं जेव्हा थांबलेलं असतं तेव्हा निरोपाचं निरूपण असतं!त्या श्वासातील अद्भुत ईश्वर रूप 'प्राण' असतो!प्राणदान देणारा ईश्वर आणि देह दान देणारी माता दोन्हीही एकरूप झालेले असतात!प्राणात आई आणि ईश्वर सदाचारं,सद्गुण,सत्कर्म अन श्रद्धेचा व्यवहार करीत असतात!ईश्वरभक्त आईला मातृपूजक मुलं कधीही दुःख देत नसतात!आमची आई ईश्वर रूप आहे!तिच्या पायांवर डोकं ठेवल्यावर जिंकण्यासारखं काहीही रहात नाही!आईचे आशीर्वादात महान शक्ती असतें!अशीच आमची आई आहें!
"अति चटक्याचा काळ
चालवीत होता भाता
विशाल सावली खाली
शांत विसावलो आता..!💐
थकूनी भागला जीव
नाही भेटले तेथे कोणी
उमेद सरतांना आतुनी
आईची पडली गोड वाणी💐
कोण परके आपुलें रें
एकसामान नजर तीचीं
भेदाभेद ना रें मनी
नसती समान बोटं पाची💐
आई दैवताची खान
सगुण भेटतसे तिथे
दुर्गुण गळूनी जाती रे
सुख वाटीतसे तिथे..!" 💐
आई ईश्वराचं एकरूप
दान देण्या ती उभी
आयुष्य देत ती राहते
बसते जाऊन ती नभी..!"💐
दया,क्षमा,करुणा,सहनशीलता, हसरं,आनंदाचं सर्वांग सुंदर रूप ओतलेलं असतं तें आईचं रूप असतं!साकार असतं !दृश्य असतं!कधी निराकार देखील असतं!सुख प्रदान करणारी आई असतें!दुःख स्वतःकडे घेणारी असतें!सर्वांची आई अशीच असतें!... माझी आई अशीच आहें!🌹
'धरती'... निर्मितीचं मुख्य अंग आहें!चल,अचल या सृष्टीत एक झालेले असतात!सजीवांची निर्मित होत असतांना सृष्टी मोरपीसाऱ्यासारखी फुलून नवनिर्मितिच्या खेळात दंग होऊन गेलेली असतें!या जीवसृष्टीचचं एक अंग असणारी "माता" मानव निर्मितीचीं जननी असतें!त्याग अन समर्पित भावनेतून देह अर्पण करीत असतें!पवित्र आत्म्यांच्या मिलनातून बाळ जन्माला आल्यावर,बाळाची आई संपूर्ण आई झालेली असतें!परिपूर्ण आई झालेली असतें!परिपूर्णतेची परिपूर्ती तृप्तीचं साधन असतं!तृप्तीचं फळं घरात 'आई' म्हणणार 'बाळ' असतं!बाळ जेव्हा रडू लागतं!...आईच्या छातीला पान्हा फुटतो!बाळ चुटूचुटू दूध प्यायला लागतं तेव्हा आई समाधान पावते!
आईसाठी बाळ सर्वस्व असतं!त्या बाळासाठी काळीज ही काढून देणारी आई विश्वाहून विशाल होते!अति विशाल होते!आई पावित्र्याची संजीवनी होते!आई तिन्ही जगात अमर असतें!तिच्या पवित्र चरणांवर आपला माथा आपो आप टेकला जात असतो!.. माता दाता होत असतें!दाता तृप्त अन समाधानी असतो!.. माझी आई अशीच आहे!
💐👏💐👏💐👏💐👏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो. नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०९फेब्रुवारी२०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment