माझी आई अशीच आहे(भाग-११)
👏👏👏👏👏👏
माझी आई अशीच आहे
(भाग-११)
💐💐💐💐💐💐
********************
... नानाभाऊ माळी
"तूझ्या श्वासांचे देणे मजवर
थोडे उधार ठेव आई
देत गेलीस मापाविना
खूप करीत गेलीस घाई ..!
मुक्या मुखात वाणी ओतली
आई जन्माची तू दायी
वाटीत वाटीत रिते झालीस
माझा श्वास आहेस आई....!
कष्टातूनी तू स्वप्न पाहिलें
देण्या हाती नव्हते काही
जीवनसंध्येंसं उभी दारी
आई मागत नसते काही..!
देत गेलीस देणे तुझे तें
खूप उपकार आहेत आई
ओंजळीत घेऊनि आंसवे
मी तीर्थ घेतो आई.....!
यशोगाथा तुझीच गातो
आम्हा जन्म दिलास आई
देव संत तुलाच भजती
शब्दफुले वाहतो काही ..!"
......लहानपणी बाळ शाळेत गेलेलं असतं!आई दाराआड नुसतीचं येरझाऱ्या घालीत असतें!.. मनातल्या मनात म्हणत असतें,"माझ्या राजानें डबा खाल्ला असेल नां? व्यवस्थित जेवला असेल नां? घरी आईच्या हातांनी जेवणारा डबा उघडून कसा जेवत असेल?पोट भरलं असेल नां? हात धुतला असेल नां? शाळेत अभ्यास करत असेल नां?... एक ना अनेक प्रश्नानीं आई व्याकुळ होतं असतें!शंका कुशंकने काळजी
करीत बसतें!.... आई जन्मदेती असतें!रक्ताचा पाट देते!बाळ लोहचुंबक असतें!...घराघरातील आई अशीच असतें!.. माझी आई देखील अशीच आहें!🌷
बाळ जेव्हा हट्टी होतं!काहीही ऐकत नसतं!अशा वेळेस आई थोडी कठोर होते!एखादी छोटी-मोठी शिक्षा करते!दिलेली शिक्षा देखील मनावर दगड ठेवून करीत असतें!अन...अन स्वतःच कोपऱ्यात अश्रू गाळत बसते!अशा या कोमल हृदयी आईस, मातेस..बाळाला होणारी छोटीशी वेदना देखील सहन होत नसते! स्वतःलाच शिक्षा करीत बसते!... इतकी कनवाळू!इतकी मवाळ! इतकी नाजूक!इतकी कोमल!इतकी मायाळू !इतकी भावुक असतें 'आई' !संपूर्ण हृदय... एखाद्या पिशवी सारखे अंतरबाह्य उलगडणारी आई..... रात्रंदिवस मुलांवर जागल्या होऊन संस्कार करीत असतें!जागत असतें!वागत असतें!.. घरोघरी हिचं आई असतें!डोळे होऊन जगाचं दृश्य दाखवीत असतें!... माझी आई अशीच आहे 🌹
मुलगा मोठा झाला!लग्न झालं!...तरीही आईला तो लहानचं वाटत असतो!मुलगा कामाला गेला असेल!शेतात गेला असेल!कुठे बाहेर गेला असेल... तर... तर 'तो' घरात पाय ठेवीपर्यंत आईचं मन मुला भोवती फिरत असतं!घुटमळत असतं!त्याच्या सुरक्षित येण्याची वाट पाहत असतें!मुलगा सुखरूप घरी आल्यावर आई मनालाच बजावते, "आला आहें दादा माझा!गुपचूप पड आता!"... डोळ्यात प्राण आणून देखरेख करणारी 'माय'ला कोणी बनवलं असेल बरं ?मेना सारखी कोमल हृदयी,मवाळ आई स्वतः त्याग करत,जगत असतें!हा त्याग मुलांसाठी असतो!तिचं झिजनं मुलांसाठीचं असतं!तिच्या मायेच्या स्पर्शात प्रचंड शक्ती असतें!दुःख विसरायला लावते, ती आई असतें!माझी ही आई अशीच आहें!🌷
"तुचं सावली तुचं उब
तू रक्षण करिते आई
चटके झेलीत उन्हाचे
तू सावली होतेस आई...!
पाषाणात जीव ओतुनी
तू माणूस घडवितें आई
दुःख-चटके जीवभावाचें
आई थांबली कधीच नाही..!
पदराच्या अडोशातूनि रोज
चोरूनी तुलाचं बघतो आई.....
रक्षण करिते कुशी तुझीच
आम्हा दुःखचं कळलेंचं नाही..!
सूर्य झाकते नजरे आड तू
शितल चंद्र दाखवीतें आई
काळजाचा गोळा करुनी
एकटी तेलासम जळत राही.!
आई जगाची जन्मदात्री
स्वतः जगण्याची होते वही
इतिहासातील पानातील
सोनेरी शब्द तू आई......!"
........सोनेरी शब्दातही न मावणारी आई,विशाल रूप धारण करत असतें!आई आकाश होते!अनंत होते!निळ्याशार आभाळाच्या अनंत पोकळीत बसून अनादी होते!साक्षात ईश्वर तिची आराधना करीत असतो! आईने सर्वस्व त्यागलं असतं!डोळे,कान,अन मुखात शुद्ध संस्कार ओतणारी आई अनंत आहें!मुलगा कितीही मोठा झाला!विद्याविभुषित झाला!कुठल्याही मोठया पदावर पोहचला आईला त्याचं अप्रूप वाटतं असतं!पण तो जेवला किंवा नाही हेचं ती बघत असतें!.. मुलाचं पोट आईला माहीत असतं!ती मुलाच्या खाण्याविषयीचं विचारत असतें!आई अशी असतें!आईचा जीव मुलातं असतो!आईचं हृदय मुलातं असतं!आई संस्काराचं गोड झाड असतं!अशी आई घराघरात असतें!... माझी आई अशीच आहें!🌷
"आई संस्काराची जननी
आई असतें मधुर वाणी
आईचं हृदय असतें दानी
आईची संपत नाही कहाणी..!
संस्कारं झूळझूळ पाणी
आई चंद्र सूर्य दोन्ही
आई स्वभावाची मानी
आईची संपत नाही कहाणी..!
आई भूषण असतें आम्हा
ममता मायेचा गर्व आम्हा
नजरेची काठी शिकविते आम्हा
आई संस्कार देते आम्हा...!
आई संस्कार देते आम्हा...!
दररोज शरण जाणे
आई संस्कारं गोड गाणे
आई खणखण एक नाणे
इतिहास उलटीत असतो पाने
आईस डोळे भरून पाहणे...!
...अशा सर्व मातांना प्रणाम करत असतांना माझी आई अशीच आहें असें विनम्रपणे सांगतो!आई अशीच असतें👏
💐💐🌹🌹🌹💐💐
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०७फेब्रुवारी-२०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment