सोनेरी विस्मृतीस कस लावू आनंद घेवू
सोनेरी विस्मृतीसं कस लावू आनंदघेवू
*****************************
... नानाभाऊ माळी
सकाळची सोनेरी सूर्यकिरणे अंगावर घेत आहें!आज २१तारीख आहें!आज मंगळवार आहें!... बंधूनो!आनंद जगण्याचं अतिशय सुरेख आणि सुंदर माध्यम आहें!कित्येकदा आनंदातून आपली फसगत देखील होतं असतें!फसगत सकारात्मक घेतली तर आपला आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही!त्यातून जीवन जगण्याची कला अवगत होते!मन प्रसन्न रहातं!मनाची फसगत झाली अशी भावना देखील मनाला शिवत नसते!...बंधूनो झालं असं की काल २०फेब्रुवारी होता!काल सोमवार होता!कालची संध्याकाळ देखील आनंदी होती!मला पुण्यातल्या प्रसिद्ध "साहित्य सम्राट" या कवी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि कविमित्र श्री.विनोद अष्टुळ यांचा नेमका संध्याकाळी ५-३० वाजता फोन आला,'नानाभाऊ आपल्याला वास्तू शांतीला जायचं आहें!आठवण आहें नां? तुम्ही माझ्याकडे या!आपण जेष्ठ ग्रामीण कवी किशोर टिळेकर यांच्या घरी जावू!त्यांच्याकडे नामुगडे सर येणार आहेत!आपण चौघे किशोर दादांच्या गाडीतून पुढे जावू!'... विनोदीजींचा फोन कट झाला!🌹
माझ्याकडे पाहुणे आले होते!निघायला आर्धा तास अजून हातात होता!गप्पा टप्पा झाल्यावर पाहुण्यांना निरोप देत मी ही तयारीला लागलो!अन संध्याकाळी मावळतीला छानसे कपडे घालून!गाडीला किक मारली अन विनोद अष्टूळ यांच्या घरी पोहचलो!तें तयारीतचं होते!
हडपसरहून सोलापूर रोडला गाडी भरधावं पळत होती!१५मिनिटात लोणी काळभोर येथील सोलापूर रोड लगत किशोर दादांच्या मधुबन मंगल कार्यालयात पोहचलो!🌹
किशोर दादांच्या गाडीत बसून पुढे महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी आदरणीय सूर्यकांत नामुगडे सरांकडे निघालो!अवघ्या पाच मिनिटातं तेथे पोहचलो!सर सोलापूर रोडला येऊन थांबले होते!आम्ही चौघे अष्टविनायकातील एक गणपती, थेऊरमार्गे वाघोली-लोणीकंद निघालो!गाडीत गप्पा रंगल्या!कवी म्हटल्यावर कवींनी कवितेवर बोलले पाहिजे होतं!कवी सूर्यापलीकडे डोकावतो असं म्हणतात!पण गप्पा रंगल्या राजकारणाच्या!🌷
राजकारण विषय असा आहें... आपण एक वेळेस खोल विहिरीत उडी मारून एखादी वस्तू श्वास रोखून एका दमात काढून आणू शकतो!वस्तू सापडली की विषय संपतो!...राजकारण विषयाला ना सुरुवात आहें ना शेवट आहें!
चौॅकलेट तोंडात टाकली की जिभेला चव कळते!खट्याळ जीभ चघळतं बसते!आम्ही राजकारण चघळत होतो!महाराष्ट्रातील तमाम राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या कारमध्ये घुसखोरी केली होती!कार पळत होती!ती एकटी मुकी होती!आम्ही राजकारणाचा मुका घेत बसलो होतो!🌹
नेते राजकारण करतात!आमच्या मुखात चघळायला गोळी होती!राजकारणाची गोळी होती!नशा होती राजकीय विषयाची!जीभ वाचाळ असतें!बेताल असतें!खट्याळ असतें!बत्तीस दातात बंदिस्त असतांना देखील जीभ बत्तीशीला घाबरत नसते!जीभेच्या अति नादी कोणी लागलं तर बत्तीशी देखील पडते पण जीभ शाबूत असतें!अशी मार खाऊ घालणाऱ्या जिभेच्या नादी लागू नये!राजकारणाच्या नादी सामान्यांनी देखील लागू नये!गाडी वाघोली-लोणीकंद मार्गे नगररोडला कधी पोहचली कळले देखील नाही!नशा कुठलीही असो,मेंदूला मुंग्या आणल्या शिवाय रहात नसतें!आम्हाला फक्त राजकारण विषयाची नशा चढली होती!राजकारणी मंडळी काय करीत असतील!!!🌹
मोबाईलचा गूगल वास्तुशांतीचं ठिकाण शोधत होतं!कार गूगलमागे धावत होती!गूगल वेडेचाळे करीत कधी डाव्या बाजूला एक किलोमीटर जा म्हणत होता!कधी उजव्या बाजूला जा म्हणत होता!गल्लीबोळ पार करीत अंधाऱ्या रस्त्यावर गाडी पुढे पुढे सरकत होती!संध्याकाळी ७-३०वाजता गुगल एका सुंदर रोहाऊस जवळ येऊन थांबलं!गाडीनें देखील गुगलची आज्ञा पाळली होती !किशोरदादांनी देखील आज्ञा पाळली होती!🌹
दिलेल्या पत्त्यावर पोहचलो होतो !पत्ता होता महाराष्ट्राचे प्रसिद्ध गझलकार बबन धुमाळ सर यांचा!आमंत्रण दिलं होतं बबन धुमाळ सर आणि त्यांचे सुपुत्र गझलकार प्रसन्नकुमार धुमाळ सर यांनी!..पण कॉलनीतं शुकशूकाट होता!जो तो घरमालक आपल्या रोहाऊसमध्ये होते!पत्ता तर बरोबर होता!.. तेथील एका स्थानिक व्यक्तीला विचारलं,'आज इथं वास्तुशांती पूजा होती!बबन धुमाळ सर यांची!'.. ती व्यक्ती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले,'मी शेजारी आहें त्यांचा!मला सांगणार होते पूजेला!मलाही सांगितलं नाही त्यांनी!असं कसं होऊ शकत??'..🌷
आम्ही वास्तू शांतीला गेलो होतो!.. सरळ बबन धुमाळ सरांना फोन केला,'सर आम्ही आपल्या वाघोलीतील रोहाऊसला पोहचलो आहोत!सर्व शुकशुकाट आहें येथे!'.. पलीकडून उत्तर आलं,'आज नाहीये वास्तू शांती,बुधवारी २२तारखेला आहें!तुम्हाला व्हाट्सअपला पत्रिका टाकली आहें!!!'...🌹
आम्ही चौघांपैकी एकाने देखील वेळ आणि वार पाहिला नव्हता!पाहू नये का??व्हाट्सअप उघडल्यावर आमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली!स्वतःच्या तोंडावर मारल्यासारखं झालं होतं!इतक्या लांब जाऊन खजिल मनाने माघारी फिरलो होतो!आनंद आमची केविलवाणी परिस्थिती बघून हसत होता!आम्हीही आनंदाकडे पाहत,उसने अवसान आणतं हसत होतो!असाह्यपणे हसत होतो!आमच्या बुद्धीच्या स्मरणशक्ती शक्तीला केविलवाणे हसत होतो!
कोणाला सांगणार होतो आम्ही, चौघेही तारीख आणि वार विसरलो होतं म्हणून!!आमची गाडी परतीच्या प्रवासाला लागली होती!रस्त्यावर वाघोलीतील एका pure व्हेज हॉटेलमध्ये जेवलो!आपल्या विस्मृतीला दोष न देता आनंद घेत काल रात्री ११वाजता घरी पोहचलो!आज २१तारीख आहें हे लक्षात ठेवत, आता उगवत्या सूर्यदेवाला साक्षी मानत..... स्मृती आणि विस्मृतीचा लफडावं अनुभवत आहें!आनंद जगण्याचं साधन आहें!दोष कोणाला देणारं आहोत आपण!विस्मृती वयाची मैत्रीण आहें!साथसंगत देणारी विस्मृती वयाला जगवत असतें!जागवत असतें!वागवत असतें!.. आपण त्यातूनचं आनंद घ्यायचा!मागचं मागे सोडत पुढे जायचं!.. बस्स हेचं आनंदी फुले आपल्या हाती देत आहें!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२१फेब्रुवारी २०२३
(उगवत्या सर्यसाक्षी)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment