चला जाऊ गड-किल्ल्यांवर

चला जाऊ गड-किल्ल्यांवर
(कोरीगड किल्ला भाग-०२)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी 

........गड किल्ले शौर्याचं प्रतीक असतात!आस्थेचं प्रतीक असतात!शक्तीचे प्रतीक असतात!मजबुतीचं प्रतीक असतात!भक्कम श्रद्धेचें प्रतीक असतात!अस्मितेचे प्रतीक असतात!वर्चस्ववादाचे केंद्रबिंदू असतात!चढाओढीचें बिंदू असतात!त्या काळी राज्य करण्याचं आणि कट कारस्थानाची देखील सुरक्षित ठिकाण किल्ला होती! प्राचीन काळापासून किल्ले- गडांविषयी मानवाला ओढ,कुतूहल आणि उत्सुकता लागून राहिली  आहें!किल्ल्याचं बांधकाम आणि विशालकाय तटबंदी किल्ल्याच वैभव असतं!काळानुरूप सत्ता बदलतं गेली!किल्ल्याचं भौगोलिक ठिकाण तेचं राहिलं!सत्ताधारी बदलतं गेलेत!सत्ताकारणी आपली संस्कृती रुजवीत राहिले!🌹

लोणावळ्याजवळील अँबी व्हॅलीच्या मध्यभागी प्रचंड उंच असा सह्याद्री पर्वत उभा दिसतो!पायथ्याजवळून वर किल्ल्याच रूप पहिलं तर तें समुद्रातील प्रचंड मोठया जहाजसारखे दिसावं असं विशाल रूप नजरेस भरत!तोच... तोच कोराई गड आहें!त्यालाच कोरीगड म्हणतात!अँबी व्हॅलीच्या मध्यभागी प्रचंड उंच असा विशालकाय पर्वत दिसतो!विशाल काय जहाज समुद्रात नांगरून ठेवल्यासारखे दिसतो!..एक उंच विशाल पर्वत आहें!कोराई गड!कोराई देवीच्या नावाने कोराई गड म्हणतात!काही कोरी गड
देखील म्हणतात!त्याला पूर्वेला आणि पश्चिमेला असें दोन दरवाजे आहेंतं 
आपल्या अस्तित्वाची ओळख असणारा कोरीगड पहायला "चला जाऊ गडकिल्ल्यांवर"..चें मुख्य संयोजक आणि प्रतोद आदरणीय श्री बागूल साहेब यांच्या सोबत गेलो होतो!दिनांक २६फेब्रुवारी २०२३गेलो होतो!🌹

.......आम्ही कोराई गडाच्या पायथ्यापासून चढाईला सुरवात केली होती!वाट....दगड धोंड्यातून जात होती!कधी झाडांच्यामध्ये लुप्त होतांना दिसतं होती!जंगलातून मार्ग क्रमनं सुरु होता!.... जाता जाता 
कच्चा पाय रस्ता संपला!पुढे दगडी पायऱ्या सुरु झाल्या होत्या!उन सावलीच्या खेळात आम्ही गडावर चढत होतो!मध्येच घामाने अंगाला स्पर्श केला होता!थकल्यावर रस्त्यावरचं सावली पाहून काही क्षण विश्रांती घेत पुन्हा एकेक पायरी चढणं सुरु होतं!पुढे लोखंडी रेलिंग लागली होती!रेलिंगचा आधार घेत पुढे जात जात होतो!किल्ल्याच्या पोटाशी वृक्ष वनराई फुलली होती!हिरवाईनें डोळ्यास आनंद होतं होता!अनेक झाडं किल्याच्या पोटाशी होती पण जमिनीकडे वाकली होती!
भुमातेला सांगायचं म्हणजे सर्व झाडं पर्वताच्या वंदन करतांना दिसत होती!झाडं जमिनीकडे झुकली होती!पर्वतला नमन करत होती!गडाच्या पायथ्याला अँबी व्हॅलीचा तलाव  आणि सुंदर बंगले नजरेस पडतं होती!उभा कडा रेलिंगला धरून पुढे सरकत होता!उन्हाचीं झळ झाडांच्या सावलीत लुप्त होत होती!किल्ल्यावर चढतांना झाडांच्या घोळक्यात, किल्ल्याच्या उभट कडेच्या पोटात गणपती मंदिर दिसलं!गणपती शुभंकर आहें!शुभ गोष्टींची देवता आहें!सुखाची,आनंदाची, भरभराटीची देवता आहें!त्याच्या शेजारीच जवळच गुहेसारखं विश्रांतीचं ठिकाण दिसलं!

प्राचीन काळी कदाचित किल्ल्यावर जाता...येता मध्येच अंधार झाला,रात्र झाली तर त्या ठिकाणी मशाल तेवत ठेवून रात्रभर तिथचं जागायचं होत!गुहेत विश्रांती घ्यायची!हिंस्र पशुपासून स्वतःचा बचाव करता येत होता!काही पावले वरती चडल्यावर किल्ल्याची उभट पाषाणातं पाण्याची टाकी दिसली!सगळं आश्चर्यचं आहें एवढ्या उंचावर तेही खडकात आणि उभट कड्याच पोट फोडून पाण्याची व्यवस्था केली होती!थंड,स्वच्छ पाण्याने तोंडं धुतलं!पाण्याची चव देखील गोड होती!निसर्गाचा नावीन्यपूर्ण नजारा दिसला!उभ्या कड्यात खोदलेल आणि पाण्याची थंडगार टाकी दिसली!एवढ्या उंचावर हे आश्चर्य पाहून निसर्ग सर्व काही देत असतो!तें मानव निर्मित कोडं खरंच विचार करायला लावणार होतं!खाली किल्ल्याच्या पायथ्याशी गजबजलेली मानव निर्मित अँबी व्हॅली दिसत होती!अँबी व्हॅलीनें कोरी गडाला सभोंवताली वेढा दिलेला दिसला!कोरी गड आता माणसाळला आहें!जंगल आहें पण माणसांनीं
घुसखोरी करून मोठा मिठाली बंगले बांधलेली दिसली!धरणावर बोटिंग दिसलं!🌹

गड सर करतांना अजून १५ मिनिटांनी किल्ल्याचा दरवाजा दिसला!विशाल आणि दगडाचीं कमान असलेला हा पूर्वेचा गणेश दरवाजा असावा!दरवाज्यातून आत जातांना अनेक पायऱ्या या पुरातत्व विभागाने बांधलेल्या दिसल्या!गडाच्या माथ्यावर पोहचलो अन आश्चर्य वाटलं!शंभर-दीडशे एकर भू माथ्यावर,टेबल लँडला अखंड दगडानी तटबंदी बांधलेली दिसली!तटबंदीला अनेक अनेक भोकं होती!त्यातून शत्रू दिसावा अन त्यावर तोफने मारा करता यावा यासाठी हीं भोकं होती!गड माथा एखाद्या विशाल जहाजसारखा दिसला!एका कोपऱ्यात उभट तटबंदीवर भगवा झेंडा फडकत होता!मध्ये महादेवाचं मंदिर होतं!ताटबंदीवरून चालत जातांना पश्चिमेकडील गडाच्या पायथ्यावर सहाराचं विमानतळ दिसलं!तटबंदी विशाल आणि रुंद होती!वरती पाण्याचा तलाव आणि काना कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या त्या काळी बांधून ठेवल्या असतील!त्यात पाणी दिसलं!गडावर पुढे जातांना एक मोठं मंदिर दिसलं!त्यात गेल्यावर कळलं तें तेथील जागृत देवी कोराई देवीचं मंदिर होतं!त्यावरून त्या गडाला कोराई गड नाव पडलं असावं!पुढे शब्द फोड होतं कोरीगड असं नाव पडलं असावं!अतिशय विराट लढवय्या रूप असलेला हा किल्ला प्राचीन वारसा आहें!मन प्रसन्न झालं!अनेक पिढ्या निघून गेल्या असतील!पुढेही अनेक पिढ्या जातील गड किल्ले प्राचीन सभ्यतेची ओळख ठेवून जागेवरच राहतील! इतिहासातील पानांवर तें ठळक ओळख ठेवून असतील!..

🌷🌷🌷इतिहासाकडे गेल्यावर कळतं हा कोरीगड कोण कोणत्या सत्तेच्या अधीन राहिला आहें!..तर उघडूया कोरीगडाच्या इतिहासातील पाने🌷🌷🌷..

प्राचीन यादव कालीन कोरीगड नंतर अनेक मुस्लिम शासक आले!त्यांनी किल्ला ताब्यात घेतल्यावर प्राचीन संस्कृतीला विद्रुप केलें!नंतर प्राचीन अस्मिता धुळीस मिळविण्याचा प्रयत्न होतं राहिला!किल्ला नावाची प्राचीन वास्तू आपलं अस्तित्व ठेवून उभ्या आहेत!काळानुरूप अनेक किल्ल्यांची नासधूस होतं राहिली!आक्रमक येत राहिले!किल्ल्यावरील प्राचीन संस्कृतीचीं नासधूस करीत राहिले!कित्येक पिढ्या गेल्या!विस्मय आणि आश्चर्यकारक असणारे हे प्राचीन किल्ले यादव काळात बांधले गेले असावेत!पुढे फक्त डागडुजी करून किल्ले उभी राहिली!अस्तित्व टिकून उभी होती!आयत्या बिळात नागोबा होऊन बसलेले आक्रमक आपली संस्कृती स्थानिक प्रजेवर लादायचा प्रयत्न करीत राहिली!अन्याय,अत्याचार,बळजबरीनें  संस्कृतीवर अन्याय होत राहिला!तरीही मुळापर्यंत रुजलेली हिंदू संस्कृती अनेक सत्तातंर पाहिलेले असतांना देखील टिकून राहिली!किल्ले अस्मितेचें प्रतिबिंब असतात ती उभीच आहेत!आधुनिक युगात देखील प्राचीन वारसा ठेवून उभी आहेत!🚩

प्रत्येक किल्याचा विशिष्ठ इतिहास असतो!इतिहासाच्या पानातून किल्ले बाहेर येऊन आपलं आत्मकथन सांगत असतात!बांधले असतील तेव्हाच वैभव आणि पडझडीनंतर कितीतरी पिढ्या पाहिलेली किल्ले आजही आपलं अस्तित्व टिकवून उभी आहेत!महाराष्ट्रात देखील अनेक किल्ले असतील!ज्यांच्या इतिहासातील नोंदी सुद्धा उपलब्ध नसतील!किल्ले बांधली असतील तेव्हाची राजसत्ता वेगळी असेल सत्ता संघर्षातनंतर दुसऱ्यांनी तेचं किल्ले आक्रमण करून मिळविले असतील!भिन्न संस्कृतीच्यां संघर्षात मानव अन वित्त हानी झाली असेल!अनेकजण प्राणास मुकले असतील!येणारे जेते आपली संस्कृती बळजबरीने लादायचा प्रयत्नामुळे प्रचंड हानी झाली असेल!अशा सर्व सत्ता पाहिलेले किल्ले महाराष्ट्रात आजही उभी आहेत!त्यात पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ असलेला हा प्राचीन किल्ला कोराईगड किल्ला आहें!त्याला कोरीगड देखील म्हणतात!🌹

सत्तेची प्रचंड लालसा असणाऱ्या आक्रमणकारी सत्तापिपासुनीं प्राचीन संस्कृतीच्या अनेक आठवणी,स्मृती, खानाखुणा नष्ट करण्याचा,पुसून टाकायचा प्रयत्न केलेंला दिसतो!तसंच कोरीगडाचंहीं झालं आहें!🌹

१२व्या शतकातील यादवकालीन असलेला कोरीगड हा प्राचीन किल्ला आहें!बहामनी सत्ता १३४७ तें इ स १४८५पर्यंत राज्य करीत होती! १४८२मध्ये महमद शाह बहमनीचा मृत्यू झाला!हा किल्ला बहामनी सत्तेनें जिंकून घेतला होता!अहमद नायबनें बहमनी सुलतानचीं सत्ता झुगारून आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं होतं!निजामशाहीची
मुहूर्तमेड रोवली होती!जुन्नर मार्गे निघतं त्याने सभोवतालचे सर्व किल्ले जिंकत कोरीगड देखील जिंकला होता!पुढे इ स १६३६ पर्यंत हा किल्ला निजामशाहीत होता!जावसळपास १३६वर्षं कोरीगड निजामशाहीच्या अंमलात होता! १६३६ मध्ये दिल्लीचा बादशाह शाहजान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी एकत्र येऊन हा किल्ला निजामशाहिचा पाडाव करून ताब्यात घेतला होता!दोघांनी आपले मुलुख वाटून घेतले होते!त्यात कोरीगड हा किल्ला आदिलशाहीकडे आला होता!तेथील देशमुखी सत्तान्तर झाले तरी ढमाले देशमुख हेचं त्या किल्ल्याचे किल्लेदार होते!

पुढे छत्रपती शिवरायांनी एकेक किल्ले जिंकत कोरीगड देखील ढमाले देशमुखांशी मुत्सदिगिरीने लढून दादोजी कोंडादेवांना पाठवून इ स १६४६मध्ये किल्ला स्वराज्यातं घेतला होता!तेथे आदिलशाहीचा काटा काढून टाकला होता!पूढे मोघलांच्या आक्रमनकारी सत्तेचा मुकाबला करीत इ स १६६५मध्ये मोघलं सरदार मिर्जा राजे जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदर तहानुसार हा किल्ला स्वराज्यातच राहिला होता!व इतर किल्ले मोघलांना देण्यात आले होते!इ.स १६९५ ला औरंगजेबानें  कोरीगड किल्ला ताब्यात घेण्याचा हुकूम काढला!औरंगजेबचा जुन्नरचा किल्लेदार मन्सूरखान अलिबेग याने आपला मुलगा मोहमद काजीमला हीं जबाबदारी सोपावली होती!त्याने  लष्करी अधिकारी रायाजी बाहुलकर यांच्या मदतीने कोरीगडचा किल्लेदार सोनाजी फर्जद याला फितूर केले होते!त्याने मोघलं सैन्याला दोरमाळा टाकून वर घेतलें!किल्ल्यावर मोघल आणि स्वराज रक्षक मराठा सैनिकांत तुंबळ युद्ध झालं त्यात किल्लेदार
गिरजोजी निंबाळकर आणि दिनकर राव या शूर विरांना वीर मरण आले!अन १२नोव्हेंबर १६९५रोजी कोरीगड मोघलांच्या ताब्यात गेला!पुढे शंकराजी नारायण सचिव यांच्या
आज्ञेवरून नावाजी बलकवडे यांनी कोरीगड जिंकून पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला!हा कालावधी इ स १७००च्या सुमारास असावा!इ स १७१३मध्ये छत्रपती शाहू महाराज पश्चिमकडील प्रवेश द्वार असलेला कोरीगड सारखेल कन्होजी आंग्रे यांनी घेतला!पुढे पेशवाईच्या अस्तापर्यंत अर्थात इ.स १८१८ हा किल्ला मराठा स्वराज्याचा महत्वाचा भाग होता!🌹

 पुढे इंग्रजानी १८१८मध्ये पेशव्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला!पेशवाईचा अस्त येथेच झाला!पुढे कोरीगड किल्ला इंग्रज सम्राज्याचं अंग झालं होता!अनेक घडामोडी,शौर्य,पराजय,कटकरस्थान, सत्ताभोग अशा अनेक घडामोडिंचा मूकसाक्षी असलेला कोरीगड किल्ला आम्ही आमचे प्रिय आयोजक  आदरणीय श्री.बागूल सरांच्या मार्गदर्शनाखाली पहायला गेलो होतो!अस्तास गेलेलं वैभव संध्याकाळ व्हावं तसं वाटतं होतं!माणसं जन्म घेतील!उगम पावतील!पूढे अस्ताकडे जाणारा माणूस भौगोलिक जागेवरचं असलेला
कोरीगड पाहत नेत्रातून सुख घेत परतीच्या प्रवासाला निघालो!
🌹🌹🌹🌹🌷🌹🌹🌹🌹
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२७फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blospot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol