चला जाऊया गडकिल्ल्यांवर
चला जाऊ गड किल्ल्यांवर
🌹कोराई-कोरीगड किल्ला 🌹
(भाग-०१)
🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी
माती!चिखल!पाणी!हिरवीगार झाडं!वेली!अनेक प्रकारचे पक्षी! छोटेसे-लहानसे पक्षी, मोठे पक्षी!पक्षांचा गोड आवाज!कर्णमधुर आवाज!अनेक प्रकारचे प्राणी!डोळ्याला दिसणारे अन न दिसणारे प्राणी!पशु!काही मांस भक्षक तर काही फक्त गवतावर गुजरान करणारें प्राणी!अनेक कृमी-किटक... सरपटणारे!चालणारे!उडणारे असें ...कित्येक... कित्येक पशु-पक्षी-कृमीकिटक निसर्ग निर्मितीचं वैभव आहेत!निसर्गसृष्टीचं
नयनमनोहारी दृश्य जीवसृष्टीचं अस्तित्व दाखवत असतं!..."चला जाऊ निसर्गाच्या सानिध्यात".. म्हणायला भाग पाडत असतं!🌹
निसर्गाच्या नैसर्गिक सानिध्यातील
अवर्णनीय दृश्य डोळ्यातून टिपतांना माणसासारखा दोन पायाचा, बुद्धीवादी प्राणी देखील सृष्टी सौंदर्यातं एकजीव होऊन जात असतो!हरकून जातं असतो!निसर्गातं एकरूप होतो!एकांग होतो!निसर्गाचा आशीर्वाद देखील घेतो!निसर्ग आनंदाचा सागर आहें!सागर सृष्टीचं अभिन्न अंग आहें!हीं जीवसृष्टी आहें!अन हा निसर्ग हसतो आहें!हसवतो आहें!🌹
माणूस मुळातचं निसर्गाचा एक घटक आहें, अंश असल्याने त्याच्याच सानिध्यात खुलत जातो!फुलत जातो!झूलत जातो!मनावर ताणतणावाचं ओझं दूर लोटतं असतो!ओझं दूर कुठेतरी फेकून देत असतो!निसर्ग सगुण परब्रम्ह आहें!दृश्य आहें!अतिशय सुंदर आहें!अलौकिक आहे!त्या अलौकिकतेत हवेचं अन उन्हाचं सुमधुर संगीत असतं!सौंदर्याचा खजिना मनसोक्तपणे वाटणारी सृष्टी जीवन संजीवनी आहें!निसर्ग उत्तम गुरु आहें!डाक्टर आहें !निसर्ग मानवी मनाला प्रसन्नतेच्या दारात नेवून ठेवणारा आहें!म्हणूनच निसर्ग स्वतः त्याच्या सानिध्यात बोलावीत असतो!म्हणत असतो,'या गड किल्ल्यांवर!निसर्गाच्या सानिध्यात!🌷
निसर्ग परिवर्तनशील आहें!
निसर्ग दाता आहें!माती,उंचउंच पर्वतं!खोल दरी,दरीच्या खोलगट भागातून वाहणारी नदी!नदी कधी संत वाहते!कधी उग्र रूप धारण करीत असतें!घनदाट जंगल निसर्गाचं कवच असतं!शुद्धतेच कवच असतं!प्रदूषण मुक्त असतं!म्हणून निसर्गसानिध्यात एकरूप होऊन जाण्यातील क्षण आनंददायी असतो!
निसर्ग ईश्वराचं सुंदर रूप असतं!त्या रूपात एकजीव होऊन जाण्यातलं समाधान,परब्रम्हाहून श्रेष्ठ असतं!अशाच परब्रम्हाचं पण मानव निर्मित परब्रम्हाचं दर्शन घेण्यासाठी पुण्याहून दोन तें अडीच तासांचा प्रवास करून गेलो होतो!🌹
प्राचीन काळापासून माणसाला गड-किल्ल्यांविषयी जाणून घेण्याची ओढ आणि उत्सुकता लागून राहिली आहे!अति उंचावरून आसपासचा परिसर नजरेखाली असावा, नियंत्रणखली असावा!शत्रूला टप्प्यात टिपता यावा म्हणून गड राजे रजवाड्यांच्या दृष्टिकोनातून सुरक्षित ठिकाण असावं!शत्रूपासून बचाव व्हावा,सुरक्षित राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी,आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी डोंगर दऱ्यात अति दुर्गम आणि अति उंचावर सुरक्षित ठिकाणी किल्ले बांधले गेले असतील!स्वतः सुरक्षित राहून शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी!शत्रूला नामोहरणं करण्यासाठी!पराजित करण्यासाठी मानवाने गड किल्ल्यांची बांधणी केली असावी!आम्हीहीं ८५व्यक्ती निघालो होतो!निसर्गाच्या सुंदर अंगाच दर्शन करायला निघालो होतो!ठिकाण होत लोणावळ्या जवळ असलेला!अँबी व्हॅलीच्यां डोक्यावर असलेला कोराई गड अर्थात कोरी गड किल्ल्यावर!किल्ल्यावर कोराई देवीचं मंदिर असल्यामुळे त्याला कोराई गड म्हणतात!कोणी कोरी गड म्हणतात!तर कोणी कुंवारीगड म्हणतात!🌹
उंचचं उंच पर्वत रांगा!उभट रांगडा कडा!खोल दरी अन वरती टेबल लँड सभोवती भक्कम तटबंदी असलेला किल्ला कोरीगड ट्रेकिंग आणि पर्यटकांना मोहवीत आला आहें!आकर्षित करीत आहें!
वरती हवा, खाली जंगलात वेढलेली पायवाट सृष्टीसौंदर्याची कांनंगी करून देत असतें!झाडांवर बसून टक लावून,डोळे मारणारा सूर्य येणाऱ्या जाणाऱ्याला प्रेमात टाकत असतो! सृष्टी सौंदर्याचं पावसाळा अन हिवाळ्यानंतर वेगळचं दिसत असतं!हिरवाईत थोडी सुष्कता जाणवत असतें!दऱ्या खोऱ्यातून उतावीळ होत,खाली ओढ्या नाल्यात उडी घेणारं पाणी नसतं!एखादा ओढा डोळ्यात पाणी आल्यासारखं नजरेस दिसत असतो!आपल्याला जागेवरच फिरवणारी हवा मनाला प्रसन्न करीत असतें!उन झोबांझोबिंचा खेळ खेळत असतं!🌹
गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग असतात!कधी आडमार्ग दऱ्या- खोऱ्यातून!झाडाझुडपातून!काट्याकुट्यातून असतो!दगड धोंड्यातून असतो!पांढऱ्या पिवळ्या मातीतून असतो!थोड वर चढल्यावर कुठेतरी दगडी पायऱ्या लागतात! चाहूल लागते किल्ल्याचा प्रचंड मोठा दरवाजा नजरेस पडतो!किल्ला स्वागत करीत असतो येणाऱ्यांचं!
उंचचं उंच ठिकाणी गड-किल्ला असणं म्हणजे उंच ठिकाणाहून टेहळनी करणे होय!रयतेला सांभाळणारा राजा सुरक्षित असणे!रयेतेला सुखात ठेवणे!सुरक्षित ठेवणे!शत्रूपासून रक्षण करणे!म्हणून उंच,अवघड ठिकाणी किल्ला असतो!
🌹🌹🌷🌹🌹🌷🌷🌹
"चला जाऊ गड किल्ल्यावर!"या हौशी सहलीचें मितभाषी,शिस्तप्रिय आयोजक आदरणीय श्री.वसंतराव बागूल साहेब यांच्या उत्तम सहलीच आयोजन म्हणजे १००%विश्वास असलेलं व्यक्तिमत्व!डोळे बंद करा अन निसर्गाच्या सानिध्यात सहलीला चला असा पक्का शिक्का मारलेलं.. ..... तर आज दिनांक २६फेब्रुवारी २०२३रोजी सकाळी ०६वाजता ८५व्यक्तींच्या दोन बसेस लोणावळा
कोराईगड अर्थात कोरीगड किल्ला लोणावळ्यात अँम्बी व्हॅली जवळ, उंचावर असलेला गड-किल्ला आहें!गडावर तसं पवना डॅममार्गे देखील जाता येतं!वनराईनें समृद्ध असलेला घाट माथा,वेडीवाकडी वळणे विविध जातींची झाडं अन रानमेवा पाहून नेत्र सुखावतात!मन सुखावतं किल्ल्यावर जाणाऱ्याला थकवतं !घामाघूम करतं!अशा या कोराई गडावर जाण्याचा योग्य वेळ अन काळ जुळवून आणणारे पंचांगकार, 'चला जाऊ गड-किल्ल्यांवर'चें संस्थापक आदरणीय श्री वसंतराव बागूल सर आहेत!
बस पुण्याहून मुबंई रस्त्यावर धावत होती!हवेला मागे ढकलत लोणावळ्याला पोहचली!लोणावळ्या च्यां डाव्या बाजूनें लोणावळा तलाव, भुशी डॅम, नेव्हीचं INS शिवाजी ट्रेनिंग सेंटर अन एरफोर्स स्टेशनं पार करीत घाट माथ्यावरून घनदाट जंगलातून वेडीवाकडी वळण घेत आमची बस पळत होती!रस्त्याच्या डोंगर कडेला उभी असलेली लहान मोठ्या झाडांच्या फांदया बसच्या कचेला स्पर्शून जात होत्या!bas🌷मुका घेत पळत होती!हळूच लायन्स पॉईंट पार करीत निसर्ग सानिध्याचा स्पर्श मनाला उत्साह आणि आनंद देत होता!🌹
हसरी वनराई सर्वांच्या स्वागतास तयार होती!वळण वळण घेत नागासारखी बस घाट रस्त्यावरून अनेकविध झाडांना मागे टाकत
अँम्बी व्हॅली बंगल्यावर फोकस टाकून पळत होती!मध्येचं डोंगराचा एखादा सुळका दिसतं होता!कुठेतरी टेबल लँड नजरेस पडतं होती!अतिशय मनमोहक झाडांच्या झोपळ्या बोगद्यातून गाडी पळत होती!हिरवळीच्या दर्शनाने प्रफुलीत झालेलं मन पुन्हा पुन्हा आनंद घेत होत!दुरूनच अँबी व्हॅली दिसतं होती!पेठ शहापूर गावाच्या कोराईमाता हॉटेल जवळ, हनुमान मंदिराजवळ बस थांबली!तेथेच छानसा नाष्टा केला!ताजेतवाने झालो अन सकाळी ०९ वाजता कोरीगाडाच्या मोहिमेवर निघालो!
किर्रर्र झाडांनी वेढलेली पायवाट!सूर्यदेवासहीं थोडी विश्रांती घ्यायला लावणारी झाडं!अरुंद पायवाट! दगड मातीची सुंदर नागमोडी पायवाट!मातीचीं घसरगुंडी पायवट!दगड गोट्यांची पायवट!मातीशी दगडधोंडे एकजीव झालेली पायवाट!पावलांना आव्हान देणारी पायवाट सर्व सहकार्यांना मार्ग दाखवत होती!कान झाडांचा मागोवा घेत होता!त्यातून किर्रर्र आवाज येत होता!आमच्या सर्व सहकार्यांचा "जय शिवाजी!जय भावांनीचा!"जयघोष कानावर पडतं होते!स्फूर्ती मिळत होती!भगवा झेंडा फडकत होता!....🌹
(क्रमशः पुढील ०२ ऱ्या भागात!तोपर्यंत जय शिवाजी!जय भवानी!)
🙏🌹🌹🙏🙏🌷🌷🙏
***************************
.. नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-रविवार २६ फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment