विद्या:-ज्ञानमाता
विद्या:- ज्ञानमाता
***********************
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
.... नानाभाऊ माळी
व्यक्तीसं विद्येने विद्वत्ता येत असतें!व्यक्ती अति नम्र आणि संस्कारी बनत असतो!अहंकार आपोआप जळून जात असतो!गळून जात असतो!अहंकार सापासारखा असतो!कुणालाही दंश मारू शकतो!विद्येनें अहंकारी,घमेंडी व्यक्ती शून्य होऊन बसतें!चौदाशे वर्षं तप केलेंल्या चांगदेवांना अहंकाराने,गर्वाने ग्रासलं होतं!विद्या हीं व्यक्तीला दृष्टी प्रदान करीत असतें!नजर देत असतें!डोळस करीत असतें!'विद्या धनम सर्व धनम प्रधानम' असं म्हणतात!ज्ञान संपन्न व्यक्ती विनम्र होतं असतो 'विद्या हे रूप बरवे की झाकले द्रव्य ही!'या उक्तीचा सहचारी होतं असतो!🌹
प्रत्येक क्षण शिक्षकरुपी गुरु असतो!क्षणाक्षनांतून ज्ञानरस प्यायल्यावर चौफेर ज्ञानउजेड पसरत असतो! ज्ञानकण वेचून ज्ञानप्रकाश देणाऱ्या गुरुजनांचे आभाळा एवढे उपकार असतात!... जो व्यक्ती ज्याच्या संपर्कात आला तें तें क्षण व्यक्तिमत्व घडवत असतात!विद्या...आई सारखी असतें!आपल्या अपत्यांवरं जीवापाड प्रेम करणाऱ्या आईचं अस्तित्व आभाळाहून विशाल असतं!तसंचं विद्या...ज्ञानकण वेचणाऱ्यांवर जीव ओतीत असतें!विद्या प्रतिभेतून जन्म घेत असतें!विद्या उसाच्या रसासारखी असतें!गोड असतेंच,गोडवा पसरवत असतें!विद्या ग्रहण करणारे शिष्य गुरआज्ञा अधीन असतात!🌹
ज्ञानविद्येची तुडुंब भरलेली झोळी घेऊन हिंडणारे गुरु सतत आपल्या झोळीतून ज्ञानमोती वाटीत असतात!ज्ञान वाटता वाटता गुरु देखील शिकत असतात!अनुभव समृद्ध होत असतात!अनुभवसिद्ध होत असतात!विनयशील होत असतात!म्हणूनच गुरुजन पूजनीय असतात!अशा गुरुजनांना शिष्य सतत आपल्या हृदयात निवासाला ठेवीत असतात!आयुष्याच्या अनेक चढ उतारांवर गुरुजनांचे उपयुक्त प्रबोधन साह्यकारी होत असतं!गुरु आपल्या अनुभवांचें ज्ञान कण वेचून वाटीत असतात!तें अनुभव सिद्ध ज्ञान म्हणजेच विद्या असतें!म्हणूच सर्व रसांनी परिपूर्ण विद्या माणसांचं नेत्र होत असतें!
ज्ञान दिलं जात!ज्ञान दान होत असतं!विद्या शिकवली जाते!विद्या गुरुजनांच्या संस्कारातून उगम पावत असतें!विद्या जीव जीवश्य जीवनम असतें!विद्या दगडातून माणूस घडवत असतें!शिकविणारे गुरुजन परिपूर्ण समरस झालेले असतात!ज्ञान संपत्ती जीवनाचा सूर्य होते!शक्ती होते!ऊर्जा होते!परिपूर्ण माणूस म्हणून घडवते!आपण सज्ञानी झालो तर सकारात्मक विचारांचा संचार आपल्या मनात,शरीरात उगम पावतो!अशी विद्या जन्म जन्मातंरचं अंतर कमी करतें!विद्या युग पुरुषांना जन्म देत असतें!महामानवांना जन्म देत असतें!महामानव जीवन घडवीत असतात!समाज घडवीत असतात!राज्य आणि देश घडवीत असतात!असें युगपुरुष युगांयुगे त्या देशाच्या हृदयात असतात!आदर्श रस्ता दाखविण्याचं कार्य करीत असतात!
विद्या विनयेन शोभते!...महापुरुष घडविणारी विद्या सर्वांची माता आहें!जगदंजननी आहें!अशा ज्ञान विद्येस शरण गेल्याने समाज आणि देशहिताची भक्कम बांधणी होत असतें!आपण ज्ञान घेता घेता ज्ञान व्यापारापासून दूर राहू!अलिप्त राहू!विद्येच्या ऋणात राहू!गुरुजनांच्या ऋणात राहू!🌹
*********************
💐💐💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३९७६५००
दिनांक-२५फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment