माझी आई अशीच आहें (भाग-१३)
💐💐💐💐💐💐💐
माझी आई अशीचं आहें
(भाग-१३)
💐💐💐💐💐💐💐
**********************
... नानाभाऊ माळी
बालपणी बाळ आईच्या अंगावर खेळत असतं!बाळ ओरडले की आई उचलून घेते!बोट धरून घेते!कडेवर घेते!दूध पाजते!बालपणी बाळ सर्व अधिकार वसुल करीत असतं!मूल रडणार नाही,डोळ्यात अश्रू येणार नाहीत आई इतकी काळजी घेत असतें!आई हृदयातून जीव लावत असतें!जिवंत झरा असतें!मुलांवर माया,ममता,करुणा,परोपकार, त्यागवृत्ती नावाचीं संस्कारी अन गुणकारी औषधं मनातल्या जिभेवर ठेवीत असतें!सर्व काही ओतत असतें!💐
आईच्या कृतीत कसलंही बेगडीपण नसतं!उसने नसतं!उपकाराची भावना नसते पण जीव ओतून मुलांना जपत असतें!मुलांचे पाय तिरके पडू नये म्हणून क्षणोक्षणी जागरूक असतें!सर्व कसं पारदर्शी पाण्यासारखं असतं!पुढे मुलं मोठी होतात!संस्कार आणि आणि वयाने, विद्येने मोठी होतात!हळूहळू आईचा बोट सुटत जातो!तिचा हात सुटत जातो!तिच्या मागे पुढे पळणारा मुलगा मोठा होतो!आईला कळत देखील नाही!पण काळाच्या पळत्या चाकासारखं असतं सगळं!वेळ काळाच्या गुणोत्तर सोबत वय वाढत असतं!मुलं मोठी होतात!..लग्न होत!..💐
घरात सुनबाई येते!मुलाचं हक्काने करणारी पत्नी येते!आई हळूहळू व्यापातून दूर होण्यासाठी प्रयत्न करीत असतें!मुलांच्या लहानपणापासूनच्या सर्व आवडी निवडी पाहणारी,जपणारी आई सून- मुलातं अडथळा नको,अडचण नको म्हणून दूर जाऊ पाहते!दूर दूर होत जाते!मुलगाही आईला फक्त विचारीत असतो,'आई 'ती' कुठे आहें?ती कुठे गेली?दिसतं नाही? ".. ती म्हणजे पत्नी असतें!सर्व बदलतं जातं असतं!हळूहळू मुलगाही संसारात रमू लागतो!आईची गरज पाहिजे तेवढी भासत नसते!आई मनाने दूरदूर जाऊ पाहते!अंतर वाढत जातं!💐
हळूहळू आई शरीराने दूर जात असतें!मुलगा संसार सागरात डुंबत असतांना आई किनाऱ्यावर एकटीच दिसते!कोरडया पायाला किनाऱ्यावर ढकलत असतें!पाय कोरडाचं राहून जातो!आई देवाचं रूप असतं!देवाने पाठवलेलं प्रतिरूप असतं!आपण या देवत्वापासून दूर दूर जाऊ लागतो!जी एक वेळ उपाशी राहून मुलांचं पोट भरत होती, त्या आईचे पाय हळूहळू दूर मागे राहू लागतात!ज्या आईने संस्कार शिकविलेत ती आई दूर जाऊ लागते!ज्या आईने कष्ट घेतलेतं तिला अंतर देऊन जगण्याची स्वप्न पाहणारा मुलगा जगात यशस्वी होऊन ही अपूर्णचं रहातो!स्वतःला शोधित असतो!ज्या दैवताच्या संस्कार आशीर्वादाने मुलगा मोठा होतो!त्याचं आईसाठी शब्द बोलायला, वेळद्यायला वेळ नसतो नसतो!🌹
श्रद्धेचा देव्हारा हृदयात घेऊन फिरणारी 'माय'आतड्याला पीळ देऊन मुलांना जीव लावत असतें!मुलांना घडवत असते!माय कुंभार होते!माय माळी होते!माय सुतार होते!... माय संस्कारशिल्पी होते!मुलं बुद्धीने विद्वत्ता सिद्ध करीत असतात!आई विद्वत्तेचं विशाल झाड असतें!तिची विद्वत्ता काळजातून असतें!काळजाच्यां पदरात विद्वत्ता नांदत असतें!विशाल काळजाला अनंत संस्कार फळे लदलदलेली असतात!लागलेली असतात!ती फळं मुलांना देण्यासाठी आई आतुर असतें!मुलं वेडेवाकडे तोंडं करून घेत असतात!त्यावेळेस त्यांना त्या संस्कार फळांचं मोल माहीत नसतं!अशी माय,अशी आई घराघरात असतें!कोमलतेचें, हळवेपणाचें,सतवर्तनाचे मांगल्याचे चरित्र घडविणारी आई खरं म्हणजे ओसरीत,ओट्यावर, पुढच्या दारी आलेंलीच नसते!कोमलतेचं हृदय घेऊन हिंडत असतं!माजघर नाहीतर मागील कळकटलेल्या,मळकटलेल्या घरातचं दुःख सहत राहीली!हृदयातले अश्रूफुले डोळ्यातल्या कडांवरं येतं चार भिंतीवरं शिंपीतं राहिली!💐
आई...काजळलेल्या अंधारातं एकटीच आपले एकटेपण चार भिंतीनां सांगत राहिली!एकांतात उसासे टाकत राहिली!घर घडवत राहिली!शेवटी मनाचा आधार शोधत राहिली!'आई'.. शब्द कानावर पडावेत म्हणून कान देत राहिली!वय अधू असतं!उताराच्या शिडीवरून उतरण सुरु होते!तरीही आई मुलांवर अतोनात जीव लावत असतें!ईश्वर निर्मित ही त्यागमूर्ती अशीच असतें!.. आई अशीच असतें!मुलांसाठी सर्व सहन करीत जगणारी माय घराघरात असतें!.. माझी आई अशीच!💐
"..वेदनेला किनार असतें दुःखाची
किनार किनाऱ्यावर उभी असतें
काळजाचं दान देणारी आई
...तरीही हसत उभी दिसतें!💐
स्वार्थार्थ कळला नाही कसा
सुंदर स्वप्न आई पाहत असतें
मुलं रक्त वाहिन्या होतांना आई
धमणीतून त्या वाहत असतें!💐
आई दिसते हृदयातून वाहतांना
गोठलेल्या रक्तासं जाग येतं असतें
सळसळ उर्मीचा ताटवा फुलतांना
आईचं अंगी बाग होतांना दिसते!"💐
आई आपल्या हातांनी स्वयंपाक करून खाऊ घालते!तिचं पाककलेंतील कसब अन्नातं उतरतं असतं!आपण पोटात टाकत असतो!तिची प्रसन्न मुद्रा अन्नातं उतरते!काहीही नाही!फक्त मिर्च्या कापून साधी फोडणी दिलेली भाजी सुद्धा चव देत असतें!पोट भरत असतें!भूक अपूर्णच असतें!अशी चव आईच्या हातांना असतें!काय कारण असावं असं?आई मुलांचं पोट जाणते!आहार जाणते!आरोग्य जाणते!नस जाणते!आई जीव ओतणारा रस असतें!घरोघरी अशीच आई असतें!तिचं मोल जाणणारे मुलं-सुनबाई-नातवंडे असतील तर त्या घराचा स्वर्ग होतो!स्वर्ग आनंद आणि उत्साह प्रदान करतो!... आमची आई अशीच आहें!🌹
"वीट दिली विठ्ठलाला
पुंडलिक झालासे संत
माय बापाच्या सेवेने
विठ्ठल उभा एकांत!💐
बाप असतोचं हो श्रेष्ठ
माय असतें तरी विशिष्ठ
रात्रंदिन राबती दोघे
झालेसे अति अति कष्ट!💐
पंढरी आहें देव्हारा
माय-बाप उघडती दार
कधी देव येती पोटाला
घरी देऊनी जाती सारं!💐
ज्याला कळली हो आई
आई मायेचा सागर
कधी करते उपवास
जगत जननीचा जागर!💐
आई असतें चंद्रकोर
आई नभाची चांदणी
निळ्याभोर आकाशी
आई असतेंचं वंदनीय!💐
आई भक्तीचं साधन
आई देवाचं महादान
माय-बाप रें काशी
भक्त पुंडलिकाचं पान!💐
....आई जगण्याची शिदोरी!आई डोळ्याचं पारणं!आई देवी धारण!आई संतांची बहीण!संत करीतात गुणगान!आई....आई श्वासातील वेळ!आई श्वासातील काळ!काळ पळतो घोड्यावर!घोडा गाठीतो तळ!तळ आईचं बळ!बळ जोडीतो नाळ!नाळ जोडते नाते!नाते ममतेचं!तेथे निवासाला असतें आई!... माझी आई अशीच आहें!💐
हाडाची काड करणारी आई श्रीमंत असतें!त्यागातून श्रीमंती मिळते!आई श्रीमंत असतें!फक्त आई श्रीमंत असतें!काळजाचं दान देणारी आईचं श्रीमंत असतें!आईचं अशी एक असतें जिथे आनंदाची बाग असतें!बागेत उमलणारी फुलं आईच्या अंगा खांद्यावर खेळणारी मुलं असतात!आईच्या नावाने मुलं श्रीमंत होतात!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई अशीच आहें!💐
"वाहतो हरीपाठ येथे
... परब्रम्ह उभे केलें
आईचा वंश मोठा
परब्रम्ह द्वारी आले!💐
आईची जागा कोणीही घेऊं शकत नाही!आई असतें मायेचा सागर!जीवनाचा आधार देणारी आई फक्त आणि फक्त एकच असतें!तिचे उपकार आभाळाहून मोठे असतात!उन रखरखते असो वा कडाक्याची थंडी आई मुलांची आधार असतें💐
शीतलता प्रदान करणारी आई जीवनात संयम शिकवीत असतें!तिची छाया विशाल असतें!आई ईश्वराकडून मिळालेली दान पेटी आहें!आपण फक्त दान स्वीकारित जायचं!आई कुशीत घेणारी अनंताची दान पेटी आहें!मुलं सगळंच सुख दुःख तिच्या पदरात टाकत असतात!आई हृदयात बसतं असतें!अनेक सुख दुःख सहन करणारी आई देत देत स्वतः रिते होत रहाते!तरीही मायेचा आधार होते!स्वप्नातलं देणारी आई सत्यात दान पेटी असतें!
आई तिजोरीची चावी असतें!संस्काराची चावी असतें!आई महाकाव्य आहें!जे अमृतात न्हाऊन निघालं आहें!आई वाचून जीवन अपूर्ण आहें!पूर्णतेच्या सेतू असणारी आई जगत जननी आहें!सारे तीर्थ तूझ्या चारणात आहेंतं!अशीच माझी आई आहें!💐
🙏💐💐💐🙏💐💐💐🙏
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२०फेब्रुवारी २०२३
Comments
Post a Comment