जिद्द, श्रद्धा असलेलं व्यक्तिमत्व श्री सुनिलजी डांगमाळी आणि श्री शिवरकर!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जिद्द  श्रद्धा असलेलं व्यक्तिमत्व
श्री. सुनिल डांगमाळी आणि श्री शिवरकर!
💐💐💐💐💐💐💐💐💐
*************************
.... नानाभाऊ माळी 

.....कर्तृत्वाची ऐशी तैशी!.... कर्तृत्व कसं असावं? कर्तुत्वाला पंख फुटतात!माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहें!... त्याच्या शारीरिक रचनेमुळे तो बुद्धी आणि शरीराने श्रेष्ठ आहें!अशा कर्तृत्वाचे धनी आहेत श्री सुनिजी ...

वयाची ५३वर्ष पूर्ण केलेलें सायकलपट्टू श्री सुनील डांगमाळी सर हे त्यातील एक कर्तृत्वाने व्यक्तिमत्व!भक्तीचीं शक्ती श्रद्धेजवळ नेत असतें!.. नामस्मारणातील शक्ती अपार आहें!... अशा भक्तीवर विश्वास आणि श्रद्धा असणाऱ्या श्री सुनिलजी हे सुंदरतेच्या जवळ नेणारे व्यक्तिमत्व आहें!🌹

सायकलिंगमध्ये नाव कमविणाऱ्या सुनिलजी यांनी पंढरपूर तें पंजाब असा २४००किलोमीटरचा प्रवास अचंबित करणारा आहें!त्यांचं अनुभव कथन म्हणजे जीवन प्रवास काय असतो याचं उत्तम बोलके बोल मनाला पोहचलें!.... भक्तीची कीर्ती कशी असतें??? संत नामदेव महाराजांच्या भूमितील सायकल पट्टू पंजाबातं गेल्यावर श्री सुनिलजी यांच स्वागत अतिशय उत्साहानें केलें होते!.... 🌹

नामस्मरण जीवनाची पहिली पायरी असतें भक्तीजवळ पोहचण्याची!श्री सुनिलजी भक्तीची महिमा सांगत असतांना प्रत्यक्षात विठ्ठल दर्शनसकाळी "लवकर उठावे, अंघोळ सूर्य उगवण्याच्या आधी झाली पाहिजे!"असं आवर्जून त्यांनी सांगितले!....🌹

प्रवासात अनेक समस्या असतात!त्यांना तोंड देत!समोरे जात पुढे जायचं असतं!... सायकलिंग करतांना पंजाबमध्ये थंडी देखील खुप असतें!.. "अडचणीवर मात करत पुढे जायचं असतं!".. असं सुनिलजी बोलत होते!🌹

उत्तम योगासन करणारे सुनिलजी वयाने ५३वर्षांचे आहेत असं जाणवलं देखील नाही!...३०-३५वर्षं वयाचे दिसणारे सुनिलजी ५३वर्षांचे कसे??? ही योगाची शक्ती आहें असं तें आवर्जून सांगत होते"वेळीचं जागे व्हावे!व्यसनापासून दूर राहावे!"असें आवर्जून सांगतात!🌹

बाहेर दूरचा प्रवासात निघाल्यावर पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात!तरीही प्रवासासाठी नेहमीच मुखसंमत्ती देणाऱ्या त्यांच्या पत्नी आदर्श आहेत!सतत त्यांना आधार देत असतात!🌹🌹🙏🌷
सायकलीवर लांब लांबचा प्रवास करणारे सुनिलजी डांगमाळी हसरं, बोलकं व्यक्तिमत्व आहें!अनेक अनुभवांचा भांडार घेऊन फिरणारे श्री सुनिलजी प्रॅक्टिकल आहेत!🌷

सतत प्रवास करणारे सुनिलजींच्या पाठीशी मातोश्रीचें आशीर्वाद आहेत!एक आदर्श माता अशी असावी जी मुलाच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारी असतें!आई सतत डोळ्यासमोर असतें!आईचे पाय सतत डोळ्यांसमोर असतात असं सुनिलजी सांगत असतात!.... आई देवानंतर दुसरे ठिकाण आहें जवळचे!निकटचे!... आईच्या आशिर्वादामुळे सुनिलजी अनेक प्रयोगशील सायकलिंग प्रवासात करीत आहेत!योग शिकवीत आहेत!🌹🌹

सुनिलजी यांचे मित्र श्री शिवरकर देखील उत्तम सायकलपट्टू आहेत!पंढरपूरच्या वारीचं अतिशय भावनिक वर्णन करणारे श्री.शिवरकर आपल्या अनुभतीचे अनेक प्रसंग नमूद करतांना माणसाने कधीही खचून न जाता आपण आपलं आचरण शुद्ध ठेवायला सांगतात!"शुद्ध शाकाहारी झालात तर आरोग्य उत्तम असतं!"... असं तें सांगतात!...🌷

प्रवास म्हटला की दिवस आणि रात्र असतें!... प्रवासात सूर्य मावळला तर पुढे काय?? असा प्रश्न निर्माण होत असतो!...पण माणुसकी जीवंत असणारी माणसं या जगात आहेत!.. आपल्यावर कठीण प्रसंग आला तर धावून येतात!... "शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी!".. असं तुकाराम महाराजांच्या जीवनाचा आदर्श घेऊन जगणारे आणि सतत प्रवास करणारे श्री सुनील डांगमाळी आणि श्री शिवरकर साहेब असें तरुण आहेत जे स्फूर्तीस्थान आहेत आपले!आपले आदर्श आहेत!भक्तीची शक्ती जीवनाच्या वाटेवरील श्रद्धास्थळ आहेंतं!🌷

श्री सुनिलजी यांनी अनेक योगासन-प्राणायाम करून दाखविली!दोऱ्यांच्या उड्या मारून दाखविल्या!आहारा विषयी मार्गदर्शन केलें!शुगर फ्री जीवन जगण्याचा सल्ला देतात!... अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सुनिलजी डांगमाळी जीवन शिक्षक आहेत!आरोग्य शिक्षक आहेत!भक्तिमार्गाचे डोळस विज्ञान शिक्षक आहेत!जेष्ठ नागरिकांनी त्यांनी केलेल्या कृतीचं अनुसरण केलं तरी आयुष्य आनंदमय!सुखमय!भक्तिमय होईल असं वाटतं!आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी दिशादर्शक आहें!🌹

आई वडिलांचे ऋण!समाजाचं ऋण!सत्वशील मार्ग अवलंबून फेडता येतं असतं असं सुनिलजी सांगतात!देव मानवात शोधावा!चांगलं जे आहें तें देत राहावं!समाधान आणि तृप्तीचा आनंद काही और असतो!शुद्ध मनात शुद्ध विचार जन्म घेत राहिले तर आपलें आचार-विचार देखील सकारात्मक होत राहातात असं सुनिलजी म्हणतात 🌷

सायकल जीवन आहें!प्रवास थोडा आहें!सत्कर्माच्या द्वारी जाणारे सुनिलजी शांत,संयमी व्यक्तिमत्व आहें!.. समाजाचं काहीतरी देणं लागतो!तें देऊन उतराई व्हावं असं मानणारे सुनिजी माणसं जोडण्याचा संकल्प राबवित आहेत!डॉक्टर काकांचं भलं करण्याऐवजी आरोग्य संपन्न राहण्यासाठी जगावं 🌹

.. आपणास पुढील प्रवासासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷💐
**************************
🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷💐
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११९२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१५फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)