लग्न सोहळा: काल आणि आज

लग्न सोहळा:काल आणि आज
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹
************************
... नानाभाऊ माळी 

बंधू-भगिनींनो!
आपण अनेक विवाह समारंभाना गेला असाल!अनेक वर्षांपासून जात असाल!खरं म्हणजे विवाह पार पाडणे म्हणजे अनेकांच्या कष्टाचं गोड फळ असतं!अनेकांचे हात असतात!वधू आणि वर एकत्र येण्यासाठी अनेकांचे हातभार असतात!मंगल सोहळा पार पाडण्यासाठी आई वडिलांपासून नातेवाईक,आप्त,स्नेही, मित्र, सहकारी,सर्वांचीं मेहनत असतें! विवाह दिव्यत्वाची प्रचिती असतें!विवाह स्वप्नातील चंद्र असतो!त्याची शीतलता अनुभवण्यासाठी कडकडीत उन्हाळी सूर्याचटका घ्यावा लागतं असतो!विवाह आनंद सोहळा आहे!मंगल सोहळा आहें!धार्मिक सोहळा आहें!संस्कृती सोहळा आहें!सनातन सोहळा आहें!पवित्र सोहळा आहें!विश्वास आणि निष्ठेने समर्पित जीवन सोहळा आहें!विवाह दोन जीवांचा विश्वास सेतू आहें!....🌹

मी लहानपणापासून लग्न सोहळा पाहत आलो आहें!काळ बदलतो आहें!काळासोबत पैशाचं झाड मोठं झालें आहें!पैशांच्या वजनात विवाह सोहळा पार पाडले जात आहेत!
जुनं मागे पडतं आहें!पैसा मोजून आनंद मिळवू पाहत आहेत!🌹

लग्न!... दोन नात्यांचीं जोडणी!दोन नात्यांची बांधणी!दोन नात्यांची मांडणी!प्रेमाच्या दोन नात्यांनां पवित्र रेशीम धाग्यांनी,हृदयातली घट्ट गाठ मारणे असतं!... लग्न दोन जीवांचें मनोमिलन असतं!..लग्न लोकसाक्षी आशीर्वाद असतो!लग्न देवा -ब्राम्हणाचां आशीर्वाद असतो!लग्न नात्या गोत्यांनी दिलेला आशीर्वाद असतो!लग्न पती-पत्नी होण्याची सामूहिक मान्यता असतें!🌹

विवाह मंगलकार्य...संस्कृती,धार्मिक अन पवित्र मंगल संस्कार असतात जे नियमात बांधलेलेले असतात!त्यासं समाज आणि धर्म मान्यता असतें!अशा मंगल विवाहास आपण बऱ्याच वेळेस हजेरी लावत असतो!मंगल ध्वनी कानी पडत असतात!मंत्रोच्चार कानी पडत असतात!वधू-वर त्या पवित्र संस्कारांनी प्रेम बंधनात बांधले जात असतात!सप्तपदी ही दोघांच्या विश्वास,श्रद्धा,मर्यादा, एकनिष्ठ राहण्यासाठीचीं शपथ असावी!

"आपण दोघेही एका पवित्र धाग्यात बांधले गेलेंलो आहोत!आयुष्यभर साथ संगत देत वैवाहिक जीवनाचा आदर्श निर्माण करावयाचा आहें!"... असा विश्वास पती-पत्नीनीं निर्माण करावयाचा असतो!असा विवाह!असं लग्न आयुष्यभर विश्वास सुगंध देत एकमेकांच्या आधाराने उद्धार करून घेत असतात!विवाह नवनिर्मितीचं माध्यम असतं!त्यातून वारसा प्रदान करण्याची पारंपरिक पद्धत असतें!विवाह समाजात ताठ मानेने जगण्याची लक्ष्मण रेषा असतें!सामाजिक बंधन टिकून राहण्यासाठी विवाह ही धार्मिक मान्यता आहें!हम रस्ता असतो!🌹

लग्न... प्राचीन काळापासून चालत आलेला शुद्ध संस्कार आहें!... त्यात काळानुरूप बदल होत आहेत!विवाह सोहळ्यात बदल घडत आहेत!समाज आधुनिकतेच्या मागे धावू लागला आहें!नागरिकरानाची गती वाढली आहें!गती सोबत धार्मिक विधी पुढे सरकत आहेत!परंपरेसोबतचं नव्या चालीरितीचीं भर पडत आहें!पारंपरिक वाद्य जाऊन बँडवाजा आला,उत्तम संकल्पना आहें!पण आधुनिकतेंच्या नावाखाली पावित्र्या पासून दूर चाललो आहोत!🌹

विवाह सामाजिक बांधिलकीचीं शिकवण असतें!आदर्श समाज रचनेची नैतिक घडी बांधणारी संस्कारी पद्धत आहें!आज अनेक बदल घडत आहेत!विवाह कार्यात व्यावसायिकता आलेली आहे!इव्हेंट्सनें शिरकाव केला आहें!संस्कारापेक्षा देखाव्याचं प्रदर्शन मांडलं जात आहें!लग्न मंडपातील नवरदेव नवरी पेक्षा सत्कार समारंभात रममान झालेले सामाजिक कार्यकर्ते मंडप व्यापून घेत आहेत!लग्नाचं मुहूर्त दुपारी १२-३०चं असेल तर लग्न दुपारी २-००वाजता लागतं आहें!🌹

गाव गल्लीतील,दारासमोरील लग्नाचा मंडप मंगल कार्यालयात कधी गेला तें कळले देखील नाही!गल्ल्याचं महत्व कमी होत असतांना हातभार लावणारे कार्यालयात हात बांधून बसायला मोकळे झाले आहेत!त्यामुळे एकोप्याचा अभाव जाणवू लागला आहें!लग्न पवित्र बंधन असतांना लग्नाआधी स्टेजवर ऑर्केस्ट्रा आलेला आहें!माणसावाचून काम आडून रहात नाही!पण मनाने माणसं दूर जाऊ लागली आहेत!पैशात मार्केट कॅपचर करता येतं असतं!पण विशाल सहृदयता त्यातून निघून चालली आहें!मंगलाष्टकाच्यां वेळी पवित्र अक्षदा रुपी अनंत आशीर्वाद नवरा नवरीच्या अंगावर पडतं असतांना वऱ्हाडी गप्पा मारण्यात दंग असतात!विवाहरूपी पारंपरिकता सोडून विवाह या भारतीय संस्कृतीच्या पायालाचं हादरे बसू लागले आहेत!इव्हेंट्सचं तकलादू चिखल विवाहाला बेगडी रूप देत आहें अन पारंपरिकतेला सुरुंग लावून ढासळण्यास मदत करीत आहें!🌹

विवाह म्हणजे आनंदाचा,उत्साहाचा प्रसन्नतेचा सुरेख क्षण असतो!वैदिक विधी मंत्रोच्चार कानावर पडत असतात!संस्कारी उच्चार संस्कृतप्रचूर असल्याने काही अर्थ कळत नसले तरी मनाला मांगल्यरुपी पवित्र ध्वनी पवित्रतेच्या जवळ नेत असतात!नवरदेव-नवरी जीवनाच्या पहिल्या पायरीवर चढत असतांना शुद्ध संस्कारांनी धर्मकर्तव्याची पहिली पायरी लग्न असतं!मंगलाष्टक कानी पडतं असतांना त्यातील अर्थ जीवन संदेश देत असतात!यजमान कार्यात मग्न असतांना,पैशांची तरतूद करून जीवन सफलतेच्या इतिकर्तव्यातून व्यक्ती सिद्ध होत असतो!... "लग्न करून पहा मग कळेल!"या दिव्याचा प्रत्यक्ष
अनुभवासाठी वधू आणि वर माता- पित्यांची देखील परीक्षा असतें!ती परीक्षा पास होण्यासाठी माता-पिता धडपडतं असतात!पळत असतात!...नवरदेव-नवरी एकमेकांच्या प्रेम ओढीने आनंद तरंगावर तरंगत असतात!स्वप्न रंगवत असतात!आकाशातील चांदण्या तोडून आणण्यासाठी swapn🌷पाहत असतात!ज्याला लग्नाचा अर्थ कळला,त्याप्रमाणे वागतो,तडजोड स्वीकारतो तें सुखी कुटुंब असतं असं म्हणतात!🌷

लग्न दोन जीवांचं मिलन असतं!संसार सागराचा तट असतं!पती-पत्नी दोघांनी हिमतीने, विश्वासाने,सागरात तरुण जाण्याची तयारी असतें!समजूतदार व्यक्तिमत्वा आकाराला येण्याची घटना असतें!आपण लग्न सोहळ्याची रूप पाहत असतांना त्यातील काळानुरूप बदल स्वीकारतांना परंपरेला धक्का लागणार नाही याची जाण ठेवली तर धार्मिक विधीचं पावित्र्य राखलं जाईल!🌹
*************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१२फेब्रुवारी२०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)