माझी आई अशीच आहें(भाग -१०)
💐💐💐💐💐💐💐
माझी आई अशीच आहें
(भाग-१०)
👏👏👏👏👏👏👏
... नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
आईने डोळे दिलेत,कान दिलेत सर्वांनां!श्वास भरीला हृदयात आईने!हात आणि पाय दिलेत मजला!पोट दिलें मज आईने आधार झालीस आई!मांसाचा गोळा मज पान्हा दिलास तू!दुडुदुडू चलतांना तुझा बोट दिलास तू!मी कोन गं आई?? तूझ्या पोटाचा गोळा मज शहाणा केलेंस तू!.. अशा आईंसाठी!!माझ्या आई साठीदेखील!💐
"आईला आई भेटते
तेथे आई जन्म घेते
काळजातली भेट ती
आलिंगण आईला देते
जन्म देत्या दोघीही
धरतीतुनी जन्म घेती
धरतीपुत्री आईचं ती
गर्भाला आनंद देती
एकमेकात मिसळती
जीव जीवात येतो
आई अन धरतीच्यां
जीवनभर ऋणी होतो!"💐
आई!!! रोज पहाटे उठून धरतीवर मातेवर माथा टेकवत असतें!म्हणत असतें,"आई तूझ्या कुशीतला ओलावा जन्मोजन्मी असाचं राहू दे!तूझ्या कुशीत माझ्या जन्माचं सार्थक होऊ दे!ऋण तुझे मजवर आई,असचं राहू दे!"... नित्यनियमाने धरती मातेची आराधना अन उपासना करणारी माझी आई अशीच आहें!
"अनुभवांचं सोनं होऊन
तेजाळत असतें आई!
अस्सल संस्कार सोनेरी
हाताळत असतें आई!
कापसाची वात होऊन
जळत असतें आई!
दिव्य ज्योतीच्या तेजातून
कळत असतें आई!
बाळाची शी-शु धुत
एकटी मळत असतें आई!
मागे पुढे उभी प्रहरी
पळत असतें आई!"👏
.........बंधूनो!आई सर्वांचीच पळत असतें!रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पळत असते!सहनतेची शिदोरी असतें आई!जगण्याची आसं असतें आई!तिच्या आदर्श वळणावर घेऊन जात असतें ती आई असतें!....बंधूनों माझी आई सुद्धा अशीच आहें!🌷
मुलांनी कुठलेही वाईट गुण
अंगीकारू नयेतं म्हणून सतत डोळ्यात तेल घालून लक्ष अन दक्ष असतें आई!सतत पवित्र
देवालयाच्या द्वारी नेत असतें आई!सदगुणांचा परिचय करून देत असतें!वाईट सोडायला भाग पाडीत असतें ती आई!.....आईचा गौरव देवाहून श्रेष्ठ आहें असा
मानतात!मुलांचीं शक्ती आणि युक्ती होतं संस्कार करीत असतें आई!..... बंधू-भगिनींनो!!!माझी आई देखील अशीच आहें!🌹
शितल चंद्र मामा बनून आईचेंच गुणधर्म वाटीत असतो!बहीण भावाचं अतूट तें नातं मुलांना अगम्य आहें!मन ओथंबून जाणाऱ्या गहिऱ्या सागरागत अथांग असणारी आई अजूनही कळली नाही हो!तिचे खोल अन गूढ गोड स्वरूप कळायला तिच्या अंतःकरणाच्या खोल खोल तळाचा शोध घेणारे अजूनही तळाशी पोचले नसावेत!अनेक कवी श्रेष्ठानी प्रयत्न करूनही तिचं खोल अंतकारण शोधू शकले नाहीत!मायचं खरं अगम्य रूप कळलंचं नाही!🌹
श्रद्धा,आस्था,विश्वास,माया अन ममतेचं दान वाटणारी आई विधात्याची कन्या आहें!विधात्याने बुद्धी वाटतांना आपल्या कन्येवर विशेष मेहेरनजर ठेवली असावी !हिरवळीचं,सहनशीलतेचं,सतत आनंद देऊन फुलणारं झाडं बनवून आईला पृथ्वीतलावर पाठविले असावं!.. अशी आई घराघरात भेटत असतें!... माझी आई देखील अशीच आहें!🌹
बाळ तापाने फनफनतं असतं!आई कासावीस होते!बाळाला कुशीत घेऊन डॉक्टरकडे पळत सुटते!... आई विनवणी करते,"डॉक्टर माझ्या सोनुल्याला आताच्या आता बरं करा!माझ हसरं, बडबडणारं सोनूला कसा शांत पडला आहें!".. आईच्या डोळ्यातले आसवं बाळाच्या जीवासाठी याचना करीत असतात!... आई अशी कनवाळू असतें!डोळ्यातल्या आसवांच्या तलावात न्हाऊ घालत असतें!आई म्हणूनच जगात श्रेष्ठ आहे!देवाहून श्रेष्ठ आहें!मेनाहून मऊ आहें!संस्काराची जननी आहें!उन्हातील सावली आहें!सर्वांची आई अशीच असतें!... बंधू-भगिनींनो!.. माझी आई अशीच आहें!💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०३फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment