०६वं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

०६ वं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन!
🌹🌹🌹🌹🌷🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी 

राम राम मंडई!🙏
गावमां जत्रा ऱ्हायनी का बठ्ठास्नी मज्या ऱ्हास!वान वानन्ह्या जिन्नसा देखाले,खावाले,खेवाले भेटतीस!जत्रा कधी सरोचं नई आसं वाटत ऱ्हास!बठ्ठा भेटतस!आंगे पांगेनां, गाव गावंनां मानसे भेटतंस!वरीसभरन्या मनमां खंगयी खंगयी संगयेलं सुख दुखन्या गोष्टीस्ना उजागरा व्हयी जास!..
भाऊ-बहीनीस्वन!... आशीच जत्रा धुयाले भरी ऱ्हायनी!हायी जत्रा अहिराणी कवी, कलाकार, साहित्यिकस्नी सें!इचारन्ह भालकुतं लयनार,वाटनारस्नी सें!२१आनी २२जानेवारीलें हायी जत्रा भरनार सें!

बठ्ठा खान्देशम्हा नवाजेल सें हायी जत्रा!जत्राम्हा आल्लग आल्लग दुकानें मांडेल ऱ्हातीन!जिन्नसा मांडेल ऱ्हातीन!संस्कृतीनं गोयमं गोया व्हयी!जिन्नसा रांधनारा सोतानं हाते रांधी खावाडथीन!... कवितानी श्याक उज्जी न्यामिनी ऱ्हास!आल्लग आल्लग कवितानी चव ते काय सांगू नका तुम्हीन!एक एक कवी हारपाटे ताजी ताजी कविता रांधी!रसिक चाटोऱ्यासले दोन्ही कुखा तट
व्हवालगून खावाडतीन!कुमचाडी, वरपडी रसिक चाटोऱ्या मन भरा पाऊत डेंडाऱ्या दितीन!एक एक कवी येडानंगतं खावाडतं ऱ्हाई!कवीनं मन कवितामां आडकेल ऱ्हास!हार खेपे वाढ-घट करी,कवितानं मुखडं सजाडत ऱ्हास!पंधा पंधाथीन मव्हरे सरकत ऱ्हास!🌹

खान्देशनं भालकूत..."सहावं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन"...खान्देशन हिरद सें!जन्मताच ज्या लेकरूनां काने मायना सबद पडतंस, "ललु नको मन्ही सोनानी चिडी!"... आखो,"जपी जायरे मन्ह सोनं!"..मव्हरे तिचं भाषा गये!काने!मने!डोये उतरतं ऱ्हास!खलबत्ताम्हा कुटी कुटी जसं भुक्ट व्हस ते पोटे पचालें हालक ऱ्हास!भाऊस्वन अहिराणी भाषांन आस्सल कुटेल भुक्ट आपला मायनी
डोकाम्हा भरेल सें!रात-दिन,जाग-
जपम्हा ते हिरदथून आक्सी मुखे बाहेर येत ऱ्हास!.. आनी भाऊस्वन ०६वं अहिराणी संमेलनमां आपला मायना गौरव सें!मांगलं काहीतरी पुण्य करेल व्हयी म्हणीसन हाऊ दिन देखाले भेटी ऱ्हायना!🌹

२१-२२जानेवारीलें... सक्कायं पाह्यरे हेट्या पिव्येधमक उजाये पडी!धीरे धीरे आखो थोडा येयथीन हेट्या लाल भुधुंग गोया वर वर सरकत ऱ्हायी!उगता यांयनं दर्शन माय अहिराणीलें व्हयी!तिन्हा लेकरे,ज्या खांदवर, कंबरवर,पलोन्हा खाले,हातनां बोटले तंनंगी-बिलगी सेतस त्या बठ्ठा वाकी- जिमीनंवर डोक ठी सूर्यदेवनं दर्शन लिथीनं!.. सूर्यसाक्षी बठ्ठा अहिराणीनां लाल मंग मायले पालखीवर बसाडी मिरवणूक काढतीन!ज्या मायनी अक्षर-सबद वयख करी दिन्ही त्या अहिराणी
मायनां संस्कार खान्देशी लेकरेस्वर व्हयेल सेतस त्या मायना पायवर डोक ठी आशीर्वाद लिथीन!...मंग दिनभर मायन्हा आगाजा व्हत ऱ्हायी!🌹

अहिराणी मायना कायेजन्हा लाल दूर दूरथीन यीसनी "मायन्ही माले काय दिन्ह!"... "मायन्ही माले कसं वाडे लावं!"...."मायना उपकार जनम जनम पाउत फिटावूतं नयी!"... कोनी मायना इतिहास खंगयी काढी!कोनी चालीरिती,संस्कार,सण,इचार आचारवर बोलतीन!कोनी कविता थून मायना जागर करतीन!कोनी गाना म्हनी मायना गौरव करतीन!...२१-२२जानेवारीलें धुये अहिराणीनं पंढरपूर सें!... दर्शन लेवागुंता माय!बहीण!भाऊस्वन बठ्ठा येणार सेतस!गोया व्हयी,गोयमं करी इज्यात!... दर्शन ली पुण्य कमायी जाईज्यात!.. असा मोका आक्सी येत नई!.. थंडी-हिवायामां मायनी पालखीलें हात लायीज्यात!🌹

💐जय अहिराणी!जय खान्देश💐
*****************************
💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹
*****************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता. शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु. हडपसर, पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१८जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)