आज आईचा १००वा वाढदिवस!माझी आई अशीच आहे(भा ग-०८)
**************************
आज आईचा १००वा वाढदिवस
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझी आई अशीच आहे
(भाग-०८वा)
***************************
... नानाभाऊ माळी
"उपकार तुझे शतजन्मीचे
झाकुनी पदरातुनी.....
नऊ मासाच्या कळा सोशिल्या
टाहो फुटला उदारतुनी.....!
मातृत्व कसे हे फुलूनी गेले
झोपलो ऊबदार कुशीत कधी
नयन माझे दिपूनी गेले....
आलो नव प्रकाशा आधी
कडेवरी घेता घेता
ममता ओतलीस मजवरी
तूझ्या पाठीचा केलास घोडा
हक्क मझा तुजवरी....!"
आज आई १००वर्षांची झाली!आम्ही
भाग्यशाली आहोत!आईनें १२०० महिने पार केले आहेत!हे आमचं महासौभाग्य आहे!शुद्ध निर्मळ मनाची आई!साध जीवन जगणारी आहे!मुलांनाचं संपत्ती मानणारी आई!आईच्या कष्टाने,त्यागाने खूप काही शिकवलं आहे!आज १००वर्षांच निरोगी जीवन जगत असतांना सतत "सर्वांचं भलं आणि कल्याण"व्हाव ha आशीर्वाद देणारी आमची आई,१००वर्षांची झाली आहे!आम्ही आईच्या सावलीत वाढलो,घडलो,शिकलो! हृदयातून हृदय वाटणारी आई कधी चिडली नाही!सतत सन्मार्गाची शिकवण देत राहिली!तिचा भाबडा स्वभाव वाटीत राहिली!.. बंधूनो सर्वांची आई अशीच असतें!आई अशीच आहे!🌹
सूर्य,चंद्र अन ताऱ्याचं अस्तित्व आईच्या जन्माशी निगडित आहे!आई या समस्त अस्तित्वाची जननी आहे!"आई" शब्द चिरकाल,
त्रिकाल अमृतरूपातटिकून असणारं आहे!कणाकणात असणारं आहे!आईच्या विशाल हृदयासमोर आकाश,प्रकाश ठेंगणे राहणार आहे!प्रत्येक व्यक्तीचा पाया आई असतें!पाया भक्कम असेल तर कळस उंचावरून,दूरवरून आपली ओळख करून देत असतो!आई नावाची भक्कम तटबंदी मुलांच्या जीवनाची सुरक्षा असतें!आई श्रीमंत असतें!आईच्या श्रीमंतीपुढे कुबेर देखील दरिद्री भासत असतो!हृदयाची श्रीमंती घेऊन हिंडणारी आई कस्तुरीगत इतरांना सुगंध वाटीत असतें!पण तिला ठाऊक ही नसतं!मुलाचं जीवन आईच्या अमृत स्पर्शाने समृद्ध झालेलं असतं!आई जन्माने कोमल आणि उदार हृदयी असतें!सर्वांचीच आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹
माझे दोन्ही थोरले बंधू... आदरणीय बाबुलाल आण्णा आणि आदरणीय रतन आप्पा(रतन माळी सर)अतिशय कष्टातून शिक्षण घेत होती!गावात पुढील शिक्षणासाठी शाळा नव्हती!दुसऱ्या गावी निजामपूर-जैताने येथे शिक्षण घेत शनिवार-रविवारी त्याचं गावात मोलमजुरी करीत,पैसे
जमवून वह्या-पुस्तक विकत घेत असतं!आई-वडील गावी मोल मजुरी करून धान्य अन थोडेफार पैसे पाठवत असतं!आई-वडिलांना शिक्षणाचां अर्थ कळला होता! अशिक्षित जरी होते,स्वतः केलेलं मोलमजुरीच कष्ट मुलांना पडू नये!मुलांनी भरपूर शिकावं ही इच्छा होती!सतत आईचं हृदय मुलांच्या भवितव्यासाठी चिंतीत असायचं!कितीही कष्ट पडलेत तरी मुलं शिकावीत हेचं स्वप्न आई-वडिलांचं होतं!आईचं होतं!बंधूनो इतर सर्व आईंसारखी माझीही आई आहे!🌹
आईचा पदर खूप मोठा असतो!स्वतःच सुख-दुःख घेऊन हिंडतानां तिच्या पदरातं मुलांच्या कितीतरी चुका झाकून ठेवीत असतें!पदरात चुकांची घट्ट गाठ मारून नवीन उमेद मुलांना देत असतें!सर्व विसरून माफीनाम्याची पाटी घेऊन हिंडणारी आई जगात श्रेष्ठ असतें!सर्वांची आई अशीच असतें!खरंच माझीही आई अशीच आहे!
हिवाळ्यातील उब आई!उन्हाळ्यातील सावली झाली!पावसातील छत्री झाली!दुधावरील साय आई!पहिलं जगाचं चित्र दाखवणारी कॅमेरा आहे माझी आई!माझ्या मनात जे विचार पेहरलेत शुद्ध तूप माझी आई!देवाची ओळख करून देणारी पहिला गुरु माझी आई!समुद्राचं खोल पाणी आहे माझी आई!माझ्या जीवनाची श्वास झाली हृदय माझी आई!माझ्या जीवनाची ज्ञानदात्री पेन पेन्सिल माझी आई!वाहत्या झऱ्यांसारखे अस्सल निर्मळ पाणी आहे माझी आई!संपूर्ण घराला सावली देते वडाचं डेरेदार वृक्ष माझी आई!हिमालयाहून विशाल काळीज वाटीत असतें आई!.. अशीच आहे माझी आई!🌹
"सागराची शाई करता
कसले खारट पाणी
जीवनात अमृत भरणारी
सरस्वतीची गोड वाणी...!
चमचम तारे लेखणीत भरावे
आकाशी लिहावी कहाणी
चरण तुझे रोजच धुवावे
माझ्या अश्रू नयनानी.....!
तूझ्या जवळी येतो जेव्हा
आभाळ दिसतेस मजला
काय लिहावे तुजवर मी
आई आभाळ ही झिजला..!"
आई आज तुझा वाढदिवस!तूझ्या पायांवर माथा टेकतो!तूझ्या
अमृतस्पर्शी आशीर्वादाने मी धन्य धन्य झालो
***************************
💐🎂👏💐🎂👏💐🎂👏
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०८जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment