४०वे राष्ट्रीय एकात्मता सांस्कृतिक महासंमेलन-२०२३

***************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
४०वें राष्ट्रीय एकात्मता सांस्कृतिक महासंमेलन-२०२३
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***************************
.... नानाभाऊ माळी

पुण्यातील स्वारगेटजवळ असलेलं "गणेश कला क्रीडा मंच" पुणे फेस्टिवलसाठी प्रसिद्ध आहे!पुणे फेस्टिवल महाराष्ट्रात,देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे!.. अशा फेस्टिवलला नाव मिळवून देणारं!नावलौकिक मिळवून देणारं हे सांस्कृतिक मंच आहे!... याचं भव्य दिव्य ठिकाणी पुण्यातल्या हडपसर येथील "महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचं" ४०वे राष्ट्रीय सांस्कृतिक महासंमेलन काल दिनांक ०६जानेवारी रोजी पार पडले! आपल्या १० ते १५ मिलिमिटर व्यासाच्या छोट्याशा डोळ्यातल्या दुर्बीणीतून या संमेलनाची विशालता मावत नव्हती!🌷

भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वात विश्वास देणारी आहे!आपली वाटणारी आहे!विविधतेतून ऐकतेच दान देणारी आहे!दर्शन देणारी आहे!...अनेक जाती!अनेक धर्म!अनेक भाषा!अनेक वेशभूषाचां भारत देश समता,शांती,एकतेचं एक हृदय घेऊन जगात मिरवत असतं!म्हणून या सांस्कृतिक महासंमेलनास राष्ट्रीय संमेलनचं म्हणावं लागेल विविध गुण दर्शन आणि वैशिष्ट्यानी परिपूर्ण आलेलं हे संमेलन भारतीय मूल्य आणि परंपरांची ओळख करून देणारे ठरले!देशाच्या कानकोपऱ्यातील सर्वचं महाविद्यालय आणि शाळा गँदंरिंग माध्यमातून भारत दर्शन करवीत असतात!... महात्मा फुले विद्यानिकेत संस्थेच्या सर्वचं महाविद्यालय आणि शाळांनी गणेश कला क्रीडा मंच येथे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्तीचं काल असंच विशाल दर्शन करवून दिलें!🌷

धर्म आणि जाती त्याची प्राचीन धरोवर असतें!अलौकिकता मुळापासून जन्म घेत असतें!याच्या वरती देश असतो!देश या सर्वांना एका धाग्यातून विनत असतो!ऐकतेचा हा धागा विविध राज्यांची विविधता विनीत एकसंघ देशाचा आदर्श जगाला देत असतो!भारत देश असा विशाल आहे!भारत देशातील सर्व राज्य अशी आहेत!धर्म आणि भाषांची विविधता अनेकतेतून एकता मांडीत असतो... हेचं मांडण्याचं काम "महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या सर्व शाळा आणि कॉलेजांनी केलं!🌹

संस्थेच्या अध्यक्षा मा सौ. स्मिताताई वाघ मॅडम!सचिव..मा प्राचार्य रवींद्रजी वाघ सर,संस्थेचे संस्थापक आदरणीय रतनजी माळी सर तसेच संस्थेचे सर्व शिक्षक-कर्मचारी वर्ग यांची प्रचंड मेहनत यांतून दिसून आली!त्यांच्या सेवेचं कौतुक करावं तेवढे ठेवढे थोडेच होईल!सर्व विद्यार्थी आपल्या कलागुणांनी भारत देशाच्या विविधतेच दर्शन करून देत होते!अनेक नृत्य प्रकारांनी भारत देशाची अखंडता दाखवून एक वेगळाच संदेश देत होते!जोश अन शक्ती देशाच्या अखंडतेच प्रतीक आहे!त्याचं दर्शन शाळेतीन मुलांनी करून दिले!डोळे तृप्त होतं गेले!मन तृप्त होतं गेलं!आनंद आणि उत्साहानें भरलेल्या वातावरणात गणेश कला क्रीडा मंच मधील पाच हजार प्रेक्षकांची दाद घेत राहिले!अखंड टाळ्यांचा वर्षाव होतं राहिला!🌹

संस्कृती प्राचीन असतें!चालीरिती सोबत पारंपरिकता टिकवून ठेवत संस्कृतीच मूळ शोधण्याचं काम सांस्कृतिक महोत्सव करीत असतात!संमेलनं करीत असतात!भारतातील आदिवासी मूळ निवासी आहेत!त्यांच्या चालीरिती आणि जीवन प्रणाली प्राचीनतेची ओळख आहे!त्यांचां नृत्य प्रकार अतिशय सुरेख आणि मनाला भावणारा असतो!अशा अनेक आदिवासी नृत्यांनी काल दर्शन घडविले!🌷

भारतातील अनेक राज्यांची भाषा आणि परंपरा काही अंशी भिन्न आहेत त्या मांडून देव,देश आणि धार्मिक संस्कृतीचं दर्शन घडवून जगातलं आश्चर्य नजरेतून टिपून घेत होतो!जमीनीशी,निसर्गाशी घट्ट नाते सांगणारी अनेक आदिवासी नृत्यप्रकार मनावर राज्य करीत राहिला!पारंपरिक नृत्यविष्कारांनी या महासंमेलनातून भारत दर्शन होत राहिलं!मन तृप्त होत राहिलं!डोळ्यातून टिपलेला भारत हृदयाला प्रफुल्लित करील राहिला!

गुजराती,कश्मिरी,आसामी,तामिळी, मणिपूरी,राजस्थानी,उडिया नृत्य प्रकार भारतीय संस्कृतीक
विरासततेचं दर्शन घडत होतं!विविध कलाविष्काराने मन प्रसन्नतेच्या शिखरावर पोहचत होत!शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं आपल्या सहज सुंदर,कला, नृत्याभिनयातून विद्यार्थ्यांनी संमेलनाची रंगत वाढवली!

महाराष्ट्राची लावणीनें जगाला वेड लावले आहे!अशी बहारदार लावणी नृत्यातून मुलांनी आपल्या कला गुणांचं उत्तम दर्शन करविले!महाराष्ट्रातील दैवत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाणे अवघे राष्ट्र प्रेरणा घेत असतं!पोवाड्याच्या माध्यमातून नसानसातून विरांची शिरवीर महापराक्रमाची ओळख अनेक नृत्यातून होतं होती!राष्ट्रभक्तिपर गीतातून स्फूर्ती संचारतं होती!४० वे राष्ट्रीय महासंमेलन संस्कृती दर्शन होतं!देश दर्शन होतं!महाराष्ट्र दर्शन होतं!विचार दर्शन होतं!मनाच्या खोल कप्प्यात ठेवून सर्वोच्च आनंदाचा ठेवा घेऊन घरी निघालो होतो!🪷
💐💐💐💐💐💐💐💐
"माणूस रोज उठतो आहे!
जगणं जगतो आहे.....
थोडया परिश्रमानें आणुनी रंगत
ऐकतेच दान मागतो आहे!भारत माझा अखंड राहो म्हणुनी पुढे निघतो आहे!".... 💐
***************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***************************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०७ जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol