माझी आई अशीच आहे (भाग ०७)

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझी आई अशीच आहे 
        (भाग-०७)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
... नानाभाऊ माळी 

संयमाच्या शिकवणुकीतून खरं व्यक्तित्व घडत असतं!संयम आईच्या उदरातून प्राप्त होतं असतो!जीवन श्वासांच्या प्रवाहात कच्चा गोळा घडत असतो!गोळा मातीचा असतो!गोळा कुंभाराचा असतो!संस्कार करुनी कच्चे तें पक्के होतं असतं!आई मुलांवर संस्कार करीत असतें!घडवत असतें!कधी ममतेने,कधी कठोर होतं सदगुणांचां रस पाजत असतें!आई प्रेरणा आणि स्फूर्तीचां ठेवा असतें!उपजत क्षमाशिलतेची पुंजी बाळगणाऱ्या आईला जगतजननी म्हणतात!आईमध्ये देवाने मुक्त्तहस्ते उदारतेची उधळण केलेली असतें!सहनशीलतेच्या देवीस आई म्हणतात!सर्वांचीच आई सहनशील असतें!.... माझीही आई अशीच आहे!💐

"गोड बोलाचे दानी ईश्वर
तू आई मुखी येतो
गळ्यातला अमृतप्याला
माणूस सुखी होतो.....!💐

खेळ चालतो वादळाशी 
सागर उधाण होतो
उभी असतें आई
धीराचा देव  होतो......!💐

सत्याचे दर्शन होता
आनंदूनी मी जातो
श्रद्धेपाशी नेते आई
रोज ईश्वरास पाहतो....!💐

संयमाचं द्वार जवळी
अंगावर वादळ घेतो
कारुण्य हृदय ममतेच्या 
मी शिकवणीला जातो..!💐

ऋण कधी कधी अतिविशाल असतं!रक्ताचं पाणी करून आई-वडील जीवन दर्शन करवीत असतात!स्वतः जळून सुखाची ओळख करून देत असतात!त्यात आई काकणभर पुढे असतें!तिच्या थोरवी पुढे तिन्ही जगाचा स्वामी भिकाऱ्यागत असतो!वात्सल्यमुर्तीची हाक प्रेमाची असतें!आपल्या जीवनाला अर्थ देणारी आई ममत्व प्रदान करीत असतें!चैतन्य निर्माण करीत असतें!आईच्या सहवासात मुलांचे दोष देखील दूर पळून जातं असतात!आनंदाच माहेर घेऊन वावरणारी आई संस्काराची पेहरणी करीत आनंद,सुखाचा सुंदर बगीचा आपल्या अंगणी फुलवत असतें!ती माता असतें!ती प्रेम सावली असतें!ईश्वर श्रेष्ठ असतें!ती आई असतें!... माझी आई अशीच आहे!💐

पंढरपूरात विठू माऊली भक्तांची परम सावली बनून युगांयुगे विटेवरी उभी आहे!भक्तीचा सोहळा श्रद्धेच्या गाभारी नांदत आहे!दयासागर
दीनदुबळ्यांचा आधार आहे!विठ्ठल च्या नयनमनोहरी दर्शनांने अवघे जीवन सफल होत असतं!अशा भक्ती सागराची ओढ कुणाला नसते?असं पारमार्थिक दर्शन दाखविणारी आई देवाहून विशालहृदयी असतें!ती कुटुंबाच्या सुखासाठी स्वत्याग करीत असतें!.. अशी आई सर्वांचीचं असतें!. माझी आई अशीच आहे!

बंधू-भगिनींनो!सन १९८४ साली मी (औरंगाबाद)संभाजीनगर येथे बजाज ऍटो कंपनीत नोकरीला लागलो होतो!पुढे त्याचं कंपनीत पर्मनंट झालो होतो!आधी राहायला एसटी डेपोच्या समोरील गल्लीत होतो!घर मालकीणचं नाव सखुबाई गुंड होतं!औरंगाबाद एसटी डेपोसमोरच असल्याने मला जवळ होतं!पुढे मी सिडको मध्ये N-9 tv सेंटर जवळ राहायला गेलो होतो!🌹

सन १९८७ साली पुण्याहून आई एकटीचं औरंगाबादला आली होती!एसटीत मोठया भावाने बसवून दिलं होतं!तेव्हा मोबाईल फोन वैगरे नव्हते!माझा पूर्वीचा पत्ता सखुबाई गुंड चाळअसा होता!पत्ता आई जवळ दिला होता!औरंगाबादच्या बस स्टॅन्ड वरून आई चालतं,चौकशी करीत जुन्या खोलीवर जाऊन पोहोचली होती!आईचं शिक्षण नव्हतं!त्यावेळेस वय असेल ६६-६७ वर्षांच्या जवळपास!माझ्या जुन्या खोलीवर, अर्थात सखुबाई गुंड यांच्या घरी आई पोहचली होती!🌹

सखुबाई मावशीनीं आईला खाऊ पिऊ घातले!त्यांच्याकडे राहायला माझे बजाज कंपनीचे बरेच सहकारी  होते!मी कंपनीत ड्युटीवर होतो!माझी ड्युटी नेहमी जनरल शिप्टची असायची!कंपनीच्या बसेस होत्या!दुपार पाळीची बस आली!माझे सहकारी ड्युटीवर आल्यावर सरळ माझ्याकडे आले!माझी आई त्यांच्या खोलीवर आली आहे असा निरोप दिला!मला एकदम शॉक बसल्यासारखे झालं!... आई!!!अन औरंगाबादला!!!तेही एकटी!!!मी तर राहायला दुसऱ्या ठिकाणी होतो!... आई तिथे कशी काय पोहचली ??अन कारण काय?? असें एक ना अनेक प्रश्न डोक्यात घोंगाऊ लागले होते!.. मी त्याचं बसने half day काढून जुन्या खोलीवर गेलो!....

आई दिसल्यावर जीवात जीव आला होता!.. आईला घेऊन मी सिडको N-9 ला गेलो!.... आई खुशीची बातमी घेऊन आली होती!आनंदाची पुरचुंडी घेऊन आली होती!माझ्या सरकारी नोकरीची ऑर्डर घेऊन आली होती!मला पुण्यातल्या खडकी अँमुनिशन फॅक्टरीत नोकरी लागली होती!मी दोन वर्षांपूर्वी परीक्षा दिली होती! त्याचं फळ घेऊन आई स्वतः पुण्याहून औरंगाबादला आली होती!तेही औरंगाबाद माहीत नसतांना आई आली होती!मुलांसाठी सर्व काही सहणारी आई असतें!मी बजाज कंपनीची पर्मनंट नोकरी सोडून पुण्यात सरकारी नोकरीवर रुजू झालो!आईचे आशीर्वाद पाठीशी होते!सर्वांचीच आई अशी असतें!माझीही आई अशीच आहे!🌹

आपल्या डोळ्यातल्या अश्रू दारातून आई ओघळतं असतें!अंगणात तुळस होऊन पावित्र्य जपीत असतें!"आई".. शब्द बोलण्यास सहज सोपा असतो!आचरणात आई जपली तर स्वर्गसूख याचं धर्तीवर असतं!...जगासोबत काळ बदलतं आहे!पण आई बदलली नाही!तिचं हृदय बदलल नाही!तिची ममता बदलली नाही!तिची त्यागवृत्ती तशीच जिवंत आहे!जीवनाचं सार वाटणारी आई आम्हाला संस्कार श्रीमंत करीत राहते!स्वतः रिते होत राहते!तिच्या ऋण उपकारांची परतफेड जास्त नाही पण तिच्या वृद्धसमयी, आजारपणात थोडीशी मन लावून सेवा केली तरी तीच्या निर्मळ हृदयातील!थरथरणाऱ्या हस्तस्पर्शी आशीर्वादामुळे आपण श्रीमंताहून श्रीमंत होतं असतो!... सर्व आई अशीच असतात!कैवल्यसाध्वी असतात! माझी आई अशीच आहे!
***************************
💐💐💐💐💐💐💐💐💐
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०६जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)