माझी शतकी आई अशीच आहे
💐🌷💐🌷💐🌷💐🌷
माझी शतकी आई अशीच आहे
(भाग-०५)
💐🌷💐🌷💐🌷💐🌷
************************
... नानाभाऊ माळी
आई हे दैवत जगाचे
कोणीही रिते नाही
रात्रंदिन हृदयी ठेवावे
स्वतः देव गुण गाई..🌷
चंद्रासम शितल आई
काळीज काढुनी देई
जन्माचे ऋण मजवर
स्वतः ईश्वर गुण गाई..🌷
💐💐💐💐💐💐💐
बंधू-भगिनींनो!
मागील अनेक दुष्काळांनी महाराष्ट्राला, देशाला छळलेलं आहे!दुष्काळ प्राण हानी करीत असतो!त्राही त्राही माजवीत असतो!सन १९७१-७२च्या दुष्काळात जमिनीत पाणी नव्हतं!विहिरीत पाणी नव्हतं!शेतात पिकं नव्हती!पशु-पक्षी पाण्याविना तडफडून मरत होती!माणूस हतबल झाला होता!खोल विहिरीत उतरून,उकरून पाणी शोधित होता!पाऊस नव्हता, जमिनीत पाणी कुठे असणारं होतं ? पोट भरण्यासाठी जे मिळेल ते खाऊन जगणं होतं!त्या जगण्यात दूरवर कुठेतरी अंधुकसा उजेड दिसत होता!आशेचा उजेड तर नसावा??
माणसं भयंकर दुष्काळात जिवंत राहण्यासाठी पोटाला जे मिळेल ते काम शोधत होता!... ज्यांची शेती होती त्यांच्याकडे कमीतकमी थोडंफार धान्य तरी होतं!जगण्यासाठी आधार होता!.. ज्यांचं पोटचं हातावर होतं!मोलमजुरीवर होतं अशांची अवस्था अतिशय बिकट होती!दयनीय होती!कुटुंब मोठ होतं,आठ-नऊ जणांचं होतं!हाताला काम नव्हती!.....अशा कुटुंबात आमचंही एक कुटुंब होतं!सरकारी योजना होत्या नाला बील्डींग,धरणाची कामं सुरु होती!सुकडी खाऊन जगणं होतं!आम्ही मामांच्या गावाला रहात होतो!आमच्या घरात एकूण नऊ जन होतो!राबणारें पाच जन होती!खाणारी लहान तोंडं अजून चार होती!त्यात मीही होतो!🌷
दुष्काळात धरणाच्या कामावर जाऊन,ब्रासनें दगडाची खडी फोडून आठवड्याला पैसे मिळत होते!त्यातून जगणं सुरु होतं!...आई देखील धरणाच्या कामावर जाऊन ब्रासनें खडी फोडत होती!कडक उन्हात राबत होती!दगडं फुटत होते!हातोडी फोडत होती!चटका देणाऱ्या घामेंजलेल्या उन्हात खडी फुटत होती!दोन्ही मोठी भावंड आणि मोठी बहीण देखील धरणावर कामाला जात होती!लाही लाही करणाऱ्या उन्हात रोजंदारीनें काम करीत होती!हातोडीने खडी फोडणाऱ्या आईचे तळहातांना घट्टे पडत होती!
आईस मीही पाहात होतो!तळ हाताला पडलेले घट्टे पाहात होतो!त्या घट्टयानी आईचं मन घट्ट होतं गेलं असावं!..."स्वतः कष्ट उपसू पण मुलांना शिकवू"...या जाणीवेमुळे कष्टालाचं सुख मानून जगत होती!... अशी ही आमची आई आहे!स्वतः झिजणारी,इतरांना कधीही न दुखावणारी माझी आई अशीच आहे!
पूर्वी दळणसाठी खेडेगावात पिठाची गिरणी नव्हती!पहाटे लवकर उठून सर्वचं माय,आया,बहिणी,सुनबाई एक एक-दोन दोन पायली ज्वारी, बाजरी जात्यावर दळत होती!... आई रामप्रहरी लवकर उठायची!दळण दळायची!सर्वांसाठी भाकरी रांधून भाजी बनवायची!डोक्यावर भाजी- भाकरीचं गासोडं डोक्यावर घेत सकाळीच शेतात मजुरीला निघायची!दिवसभर राबून पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक करून सर्वांना जेवू घालून स्वतः शेवटी जेवत असें!असलं नसलं तरी पाणी पिऊन रात्री झोपी जात असें!दिवसभर राबून,अंथरूनावर अंग टाकल्या बरोबर गाड झोपून जायची!सकाळी पुन्हा तेचं राबणं,जगणं,होतं!अशी माझी आई आहे!
आधी छकड बैलगाड्याची जोडी होती आई-वडिलांकडे!फळं-भाजी गावोगावी जावून विकायचें!त्या त्या गावात गेल्यावर बैलगाडी एखाद्या झाडाच्या सावलीत उभी करून ठेवायचे!आई डोक्यावर पाटी घेऊन गल्लोगल्लीत फळं-भाज्या विकून,मोबदल्यात धान्य किंवा पैसे मिळायचेत!सर्व एकत्र करून पुन्हा माघारी आपल्या गावी जायला निघायचे!कधी संध्याकाळ व्हायची!कधी रात्र देखील व्हायची! किर्रर्र अंधारात रस्त्यावरून बैलगाडी पळत राहायची!आजूबाजूला जंगल होतं!रातकीड्यांचा किर्रर्र आवाज येत राहायचा!वडील.. आमचे दादा बैलगाडी हाकत राहायचे!जीव मुठीत घेऊन आई बैलगाडीत बसलेली असायची!बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज चाकांना संगीत साथ देत राहायचे!एकदा असचं डोंगराच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरून,भोकऱ बारीतून बैलगाडी घराकडे निघाली होती!रात्रीच्या किर्रर्र अंधारात अचानक खिंडीतून चार पाच व्यक्ती हातात भाला,कुऱ्हाडी घेऊन बैलगाडीसमोर उभे रहात जोरात ओरडून म्हणाले ,"पैसे आणि धान्य दे आमच्याकडे!" दादा द्यायला तयार नव्हते!आई म्हणत होती,"देऊन टाका!" अशा वादात दादांच्या हाता वर भाल्याचं टोक खट्टदिशी बसले!दादा विव्हळत होते!आईने बैलगाडीत असलेलं धान्य आणि पैसे त्या दरोडे खोरांना देवून टाकले!ते निघून गेलेत!जीवात जीव आला होता!जीव वाचला हे समजून बैलगाडी गावाकडे निघाली होती!अशा प्रसंगाना सामोरी गेलेली आमची आई आहे !.. अशा अनेक प्रसंगातून जाणाऱ्या इतर सर्व आईंसारखी आमची आई धाडशी आहे!अशी माझी आई आहे!
अशी माझी आई आहे!! 🌷
पावलो पावली चालतांना
आठवत असतें आई
शब्द मुखातून काढतांना
आठवत असतें आई...🌹
रोज डोळ्यातूनी पहातांना
दिसत असतें आई
श्वासागणिक क्षणोक्षणी
मोजीत असतो आई... 🌹
*************************
💐👏💐👏💐👏💐👏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०४जानेवारी२०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment