चला जाऊ गड-किल्ल्यांवर भाग-०२
चला जाऊ गड किल्ल्यांवर (भाग-०२)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी
वेळ हाती सेकंद घेऊन
क्षणाक्षणांनी पळते आहे!काळ वेळेचा जन्मदाता,आम्हा सर्वांना खेळवतो आहे!निघून गेलेली वेळ कधी पाठीमागे येत नसते!निघून गेलेली संधी पुन्हा पुन्हा येत नसते!तरीही संधीचं पुनर्वसन करता येतं असतं!वेळ शिस्तप्रिय शिक्षिका असतें!उत्तम शिक्षिकेचा शिष्य झाल्यावर विकास नावाचं सुंदर स्वप्न साकार होत असतं!विकास मनाचा,बुद्धीचा,सत्कर्माचा, अध्यात्मिक विचारांचा होत रहातो!मानवी जीवन सकारात्मक दृष्टिकोनातून फुलतं रहात!🌷
प्रसन्नतेचा खळखळून वाहणारा झरा रोमरोम पुलकित करीत असतो!श्रमातून घाम निघत असतो! समाधान घामाचं मिळतं असतं!शरीर मनाला आतून बाहेरून धुत असतं!धुतलेलं निर्मळ,स्वच्छ शरीर प्रसन्नतेच्या फांदीवर जावून बसतं असतं!अशाचं प्रसन्न क्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य विधीने
लिहिलेल्या दिवशी आम्हाला मिळालं होतं! 🌷
प्रसन्नतेचं ताट आमच्या पुढ्यात मांडणाऱ्या पाकशास्त्रीनीं आमच्या मनाचा,तनाचा,बुद्धीचा,विचार शक्तीचा अभ्यास करून मांडले होते!निष्णात बुद्धीशास्त्री सकस ज्ञानदाता असतो!निसर्ग माणसाला मोहवीत असतो!बोलावित असतो!निसर्ग सकसतेचा आरसा असतो!अशा आरशात आमचं स्वतःचचं मुखकमल पाहण्यासाठी उत्सुक होतो!....निमित्त होतं अ.नगरच्या भुईकोट किल्ला सहलीचं!निमित्त होतं आशिया खंडातील एक नंबर cavalary tank museum पाहण्याचं!निमित्त होतं चांद बीबीचा महाल पाहण्याचं!🌹
पुण्याहून दोन बसेस निघाल्या होत्या!८५ निसर्गप्रेमी त्यात बसले होते!निसर्ग जीवसृष्टी निर्माता आहे!त्या निर्मात्याची लेकरे आम्ही अ.नगरच्या दिशेने निघालो होतो!सारथ्य करणारे होते हसरे,बोलके व्यक्तिमत्व आदरणीय श्री.वसंतराव बागूल सर!
.....ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या अ. नगर शहराच्या भुईकोट किल्ल्यात प्रवेश केल्यावर कळलं,हा किल्ला इ.स १४००च्या आधीचा आहे!बुरुज आणि तटबंदी काळ्याशार पाषाणात भक्कमपणे बांधलेली पाच ते सात फूट रुंद दगडी भिंत नजरेत भरते!निजामी राजवटीच्या अनंत प्राचीन पाऊल खुणा जागोजागी दिसतात!
अरबी-परशियन शिल्पकला इतिहासालां नोंद घेण्यास भाग
पाडतात!सध्या मिलिटरीच्या ताब्यात असलेला हा भुईकोट किल्ला प्राचीन कलाकृतीचा ठेवा आहे!🌹
नगरमध्येचं भारतातील मिलिटरीचं आशिया खंडातील सर्वात मोठे cavanary tank meuseum अर्थात रंनगाडा म्युझीयम आहे!पहिल्या महायुद्धा पासून ते आता वापरात असलेली जवळपास ६३प्रकारचे वेगवेगळे रणगाडे(टॅंक)मांडलेले आहेत!तसेच मिलिटरी विषयी अद्यायावत वस्तू प्रदर्शनी देखील मांडली आहे!तसेच भारतीय बनावटीचे तेजस विमानाचं अतिशय सुरेख अन सुबक मोडेल मांडलेलं आहे!ही प्रदर्शनी पाहायची असेल तर चार तास वेळ देऊनच यावं इतकं उत्तम म्युझियम आहे!.. गर्वाने छाती फुगून येते असें रणगाडे भारताकडे होती आणि त्यांच्या बळावर आपण युद्ध जिंकलेली आहेत!... मन तृप्त होतं गेलं! मनातलां गर्व देशाभिमान जागृत करीत राहिला!🌷
अ.नगर जवळच एक तीन मजली वास्तू उभी आहे!दगड चुण्यात बांधलेली षटकोनी आकाराची ही वास्तू चांद बीबीचा मकबारा आहे असं मानतात!जमीनींवरील घुमटात मझार दिसतात!दगडचुनानीं बांधलेली ही वास्तू निजामी राजवटीच्या प्राचीन खानाखुणा आहेत!पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेली ही वास्तू अजून ही उत्तम स्थितीत उभी आहे!पर्यटकांच आकर्षणाचं केंद्र आहे!पुरातन वास्तू इतिहासातील पाने उलगडत असतात!त्यातील ही काही पाने इतिहास उलगडतो आहे!घटीत घटनांची साक्ष देत आहे!🌷
बंधू-भगिनींनो!... दुर्ग-गड-किल्ले येणाऱ्या पिढीला संदेश देत असतात!.. या ऐतिहासिक वास्तू पाहून आपल्या बुद्धीच्या कल्पनेला पंख फुटत राहतील!अशा या वातावरणात मन प्रसन्न होतं राहिलं!मन सुंदर होतं राहिलं!सुंदरतेच्या स्वप्नवत इमल्यांनी चेहऱ्यावरील सुरकुत्यांना नवी पालवी फुटत राहिली!तृप्त क्षणानां कवेत घेत, परतीच्या प्रवासात आम्ही सर्व सहयोगी आदरणीय बागूल साहेबांसोबत नाचतं राहिलो!मन करा रें प्रसन्न म्हणत राहिलो🌹
********************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३०जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment