चला जाऊया गड किल्ल्यांवर
🌹चला जाऊया गड किल्ल्यांवर🌹
*************************
.... नानाभाऊ माळी
सहल!.... किती सुंदर शब्द आहे नाही का हा!!सह... अर्थात सर्व मिळून!..संगतीने!समूहाने फिरणे म्हणजे सहल म्हणूयातं!... सहल अनेक कारणांसाठी होत असतें!पर्यटन!तीर्थाटन!निसर्गाने जे जे दिलेले आहे त्याच्या सानिध्यात एकरूप होऊन जाणे!दररोजच्या ऱ्हाटगाडग्यापासून दूर कुठेतरी मनाला समाधान देणारं ठिकाण सहलीतून भेटत असतं!निसर्ग भेटत असतो!नवनवीन माणसं भेटतं असतात!स्वभाव कळतो!त्यातून आपणही घडत असतो!आपल्यात ऊर्जेचा उगम होत असतो!ऊर्जा आनंद देत असतें!आलेला शीन,थकवा पळवून लावत असतें!हिचं सहल असतें!... अशा...अशा.. अनेक कारणांनी माणसं माणसात एकरूप होऊन जात असतो!सांसारिक व्याप्यातून एक दिवस क्षणोक्षनींचा आनंद हृदयात प्राण वायू ओतून घेऊन येत असतो!हा आनंद समूहानेचं मिळत असतो! लहान मोठे सर्वचं सहलीतून शिकत आनंद मिळवत असतो🌷
जर सहल किल्ला पाहणे असेल!.. दुर्ग पाहणे असेल तर!!!!तर !!... हा साहसी आनंदच वेगळाचं असतो!ही कल्पना प्रत्यक्षात मांडून,कृतीतून या आनंदाची भेट करून देणारे ते महान व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री.बागूल सर!!!!आपल्या मुळेचं आम्ही आनंदाच्या डोही पोहचलो!माणूस निसर्गाचा एक अंश आहे!अंश निसर्गाशी तादात्म्य होतो!निसर्ग सर्व रूपांच दर्शन देत असतो!गड किल्ले मानवनिर्मित आश्चर्य आहेत!कलाकृती जीवंत राहिली!निर्माते काळानुरूप मातीलां देह अर्पण करून निघून गेलीत!दुर्ग-किल्ले इतिहासाची एक एक पाने उघडतं असतात!नजरेत भरत असतात!कुतूहल निर्माण करीत असतात!त्यातून माणूस शिकत आहे!🌷
बंधू-भगिनींनो!
अनेक किल्ला सहलींचा मनतृप्त अनुभव देणारे,आनंद देणारे बागूल साहेब कदाचित पूर्व जन्मीचे,राजे महाराजांचे सरसेनापती असावेत!... या जन्मीचे भारतीय वायू दलातील पूर्व अधिकारी आहेत!तसेच महाराष्ट्र शासनात पवन ऊर्जा खात्यात अधिकारी होते!अशा समृद्ध अनुभवांचा भांडार घेऊन बागूल साहेब वयाच्या चौसष्ठ-पासष्टव्या वर्षी देखील अत्यंत कृतिशील!कार्यशील!वक्तशीर!शिस्तप्रिय अन माणसा माणसात अमृत संजीवनी रस ओतणारे आहेत!🌹
जमिनीत बीज पेहरणे सोपं असतं!पण माणसात माणुसपण पेहरण महाकाठीण असतं!श्री बागूल साहेब त्यात पारंगत आहेतं!निष्णात आहेत!अनुभव संपन्न आहेत!माणसाच्या मनात सकारात्मकता निर्माण करणारे उत्तम मानस शास्रज्ञ आहेत!त्यांचे सर्व सहकारी शब्दबीज पेहरीत,हास्य फुलांचा आनंद देत अमृत फळं वाटीत आहेत!..निमित्त आहे आजची ११वी सहल!नगरचा भुईकोट किल्ला,टॅंक म्यूझीयम आणि चांद बीबीचा महाल पाहून!आज मन,तन,डोळे तृप्त झालेत!अन परतीच्या प्रवासास आम्ही ८५ भिन्न स्वभावी!भिन्न वयातील सर्वचं लहान थोर बसच्या सिटला पाट टेकून बसलो आहोत!बस पळते आहे!... कानावर बसच्या स्पीकर वरून छानशी गवळण,भक्तीगीत अन सैराट कानावर पडते आहे!🌹
************👏👏
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
मो.नं -७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२९जानेवारी २०२३
(प्रवासात आहोत)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment