०६वं अहिरानी साहित्य संमेलन!!!कोन कोनवरं लिखू!!!(भाग-०२)
०६वं अहिरानी साहित्य संमेलन
!!!! कोन कोनवर लिखू !!!!
(भाग-०१)
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी
राम राम मंडई!
सनवारनां राम पाह्येरें,बठ्ठ धुये आंग वरन्या पंघरेंलं झावरी झटकी-झूटकी उठी ऱ्हायंत!कोंबडांना बांग
आयकाले उना नयी!.. टाइमवर ड्युटी बजाडालें,पयलां सारखा कोंबडा भी नई ऱ्हायनात आते!तद्दन आयशी व्हयी जायेल सेंतस त्या!लोके तरी मोबाईल दखाना नावथीन जल्दी उठी ऱ्हायनात!...सनवार व्हता!मारोतीनां वार व्हता!हिरदले धिवसा व्हता!श्रद्धान्हा थाट व्हता!हेट्या अंधारानी कायेज मव्हरे पयी ऱ्हायंती!जिमीनम्हायीन उजायानां धिवसा नजरे पडी ऱ्हायंता!🌹
महानगर पालिकानां खांबवर रातभर उजगरा करी उजाये देणारा लाईटे धीरे धीरे डोया झाकी म्हलांयी ऱ्हायंतातं!हेट्या उजायांना जनम व्हयी ऱ्हायंता!कथ्या-मथ्या ऱ्हायेलं चिडया,चिवचिव करी
उजायाम्हा संगीत भरी ऱ्हायंत्यात! निसर्गालें डोया देणारा शेंदुर्या,हेट्या जिमीनथून वर यी ऱ्हायंता!एकदम कव्याजरत गाजरनी मायेक दिखी ऱ्हायंता!हुगडा डोयास्मा बसी ऱ्हायंता!डोया त्याले पियी ऱ्हायंतातं!हिरदम्हा बसाडी ऱ्हायंतातं!
सनवारनां सूर्यदेवनं दर्शन व्हयी ऱ्हायंत!... तो भी धुयानी थंडी झटकी सहावं अहिरानी साहित्य संमेलनलें प्रकाश देवागुंता,आशीर्वाद देवागुंता आभायलें साटा लायी चटचट वर चढी ऱ्हायंता!कालदिन सनवार व्हता!मायनां दिन व्हता!अहिरानी मायनां दिन व्हता!
"वैष्णव जन तो जानीये.... यीर परायी......जानी जे!"... राष्ट्रपिता महात्मा गांधी यासन भजन सक्कायम्हा सत्यानं पवित्र दर्शन करी देत ऱ्हास!... धुयानां गांधी पुतळा!गांधी चौक!सक्काय आठ वाजा फाईन फुली ऱ्हायंता!चांदनींनं झाडले लिबकिब धव्या बरफ फुले फुलो तश्या गांधी पुतळानां आंगे पांगेनां भाग माय बहिणाबाईनां लेकरेस्थूनं फुली ऱ्हायंता!अहिरानी मायना
लेकरेस्थून फुली ऱ्हायंता!🌹
मायनां लेकरेसलें निवतं देयेल व्हतं!धुयाना मेढ्या, खान्देश साहित्य
संघनां मेढ्या आदरणीय डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सरस्न वल्ला कायेजन्ह निवतं व्हतं!गंजज दुरथून बठ्ठा गोया व्हयी ऱ्हायंतात!गोवा,गुजरात,मध्यप्रदेश आनी महाराष्ट्रानां काने कोपरे बठेल अहिरानीं मायना 'लाल'! भोई!धुरकरी!झेंडा धरी!बठ्ठा बठ्ठा एक एक करी गोया व्हयी ऱ्हायंतातं!मायना पलोनां आसरेगुंता!बोट धरागुंता माय,भाऊ,बहिनी..सवरी-सुवरी येलं व्हतात!.....🙏
(क्रमशः.. आखो भेटतंस पुल्ला भाग ०२म्हा)
🌹तवलोंग राम राम मंडई🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
**************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२२जानेवारी२०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment