भिडे वाड्यातून मी सावित्रीबाई फुले बोलते आहे 🙏

💐💐💐💐💐💐💐💐💐
भिडे वाड्यातून मी सावित्रीबाई बोलते आहे
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
(आज ०३जानेवारी २०२३ ज्ञानज्योती!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस!... त्या निमित्ताने आर्जंव 💐💐)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

"कित्येक वर्षं झालें असतील नाही का?काळ नाडा बांधून मागे मागे ओढला जात आहे!जुनं मोडकं ते होत चाललं आहे!भूत काळ संबोधून मोडक्याला अडगळीत ठेवलं जात आहे!हिचं तर खरी वाताहत आहे!भूतकाळ इतिहास असतो!वर्तमानाचां पाया असतो!पायावर इमारत उभी असतें!भक्कम पायाचा आधार आज निराधार झाला आहे!भिडे वाड्याचां इतिहास अदृश्य केला जात आहे... होय मी भिडेवाड्यातील शिक्षिका सावित्रीबाई फुले बोलते आहे!🌹

स्रियांसाठी सर्वदूर अंधार पांघरलेला होता!ज्ञानाच्या भिंतीआड कित्येक भोंदू लपून बसले होते!अज्ञानाची भिंती कठीण दिसत होती!तूटता तुटत नव्हती!फुटता फुटत नव्हती!होती पोकळ पण अभ्यद्य असल्याचा आव आणला जात होता!विद्या नावाच्या हातोड्यानें आज्ञानी भिंत भुई सपाट केली गेली!... तेव्हा..किती .. किती.. त्रास झाला असेल म्हणून सांगू?अंगावर सर्व काही झेलत,सहन करीत आज्ञानीनां ज्ञान उजेड दाखविला होता!ज्ञान उगवत्या सूर्यासारखा असतं!डोळ्याला, मनाला आणि नजरेला स्पष्ट दिसतं असतं!कितीही अंधार पांघरा छोटया फटीतून ज्ञानकिरणे बाहेर पडत असतात!त्या कित्येक किरणाचां मिळून अखंड उजेड होतो!... सूर्य होत असतो!ज्ञानसूर्य होत असतो!.. शिक्षणापासून अलिप्त ठेवलेल्या स्त्री मनाचा हुंकार कठीण बांध तोडून लोंढा वाहात राहिला!बुरसटलेली स्त्री द्वेष्टी सर्व एकवटून उभी राहिली होती!प्रचंड विरोध झाला होता!हातात ज्योतीचा उजेड घेऊन बाहेर पडलेलो होतो!अंधार भेकट निघाले होते!ते भिंती पलीकडे उडी मारून पसार झाले होते!होय मी त्याचं भिडेवाड्यातील सावित्रीबाई फुले बोलते आहे!🌹

उजेडाची,प्रकाशाची विशाल मशाल घेऊन आमचे हे....ज्ञानसूर्य!तात्यासाहेब ज्योतीराव फुले अंधारातून निघाले होते!त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून मीही भक्कमपणे पावले टाकत सोबतीला निघाले होते!अंधारातून अनेक आवाज येत राहिलें!कानंठळ्या बसतील एवढा आवाज होता!कानाला घट्ट झाकले!कानात बोळा कोंबला होता!ओरडणारी भुताटकी भीती दाखवत राहिली!भीतीवर मात करीत तात्यासाहेबांसोबत चालतं राहिले!दृष्टीदानाचा दिवस उजाडला होता!ज्ञानदृष्टीचा दिवस उजाडला होता!स्रियांना दृष्टी देण्याचा दिवस उजाडला होता!डोळस करण्याचा दिवस उजाडला होता!तो दिवस होता ०१ जानेवारी १८४८!... होय!!!होय!!!याचं वाड्यात स्रियांसाठी पहिली शाळा सुरु केली होती!अतिशय त्रासातून,कष्टातून,विपरीत परिस्थितीतून शाळा सुरु केली होती!..तेव्हापासून विद्याज्ञानाने स्रियांच्या डोळ्यासमोरून अंधारात दूर पळू लागला होता!नजर मिळाल्याने अर्थ कळू लागला होता!... मी भिडेवाड्यातील शिक्षिका सावित्रीबाई फुले बोलते आहे🌹

डोळस होणारी प्रत्येक स्त्री,वाचू लिहू लागल्याने पुस्तके,ग्रंथ वाचू लागली होती!... कोणी शेण फेकतं होत,कोणी चिखल फेकतं होता,कोणी शिवीगाळ करून हिनवितं होते!पण ज्योतीरावांच्या सोबतीने अंगावर पडणारं शेण-चिखलही प्रिय वाटू लागलं होत!समोर उद्देश ठेवला होता!"स्त्री सुशिक्षित तर समाज शिक्षित बनणार होता!"..अंधाराची जळमटे पांघरलेल्यानां ते पाहवत नव्हतं!... क्रांतिसूर्याच्या शिकवणीने जीवनाचा उद्धार होणार होता!... मी आणि फातिमा शेख इथंच या वाड्यात अंधारतील जळमटे काढीत बसलो होतो!आज मी... मीचं या भिडेवाड्यातील सावित्रीबाई फुले बोलते आहे!🙏🌹

"स्त्री" स्वतःच्या पायावर उभी राहू लागली होती!पुस्तकी वाचनाने डोळ्यांची कवाडे उघडली जावू लागली होती!मनःरूपी पंखात शक्ती संचारली होती!पुस्तकाने ज्ञानामृत मिळत होते!ज्ञानकण प्राप्त होऊ लागले होते!मानवनिर्मिती अंधारात ज्योती बनून उजेड देत हिंडत होती!भिडेवाडा भक्कम पायावर उभा होता!शूद्र,अतिशूद्र,स्रियांना वंचित ठेवणाऱ्या मनुवाद्यांशी संघर्ष सुरूच होता!विविध ठिकाणी शाळा सुरु केल्या जात होत्या!केशवपण विरोधातही लढाई सुरूच होती!!तेव्हा उच्च वर्णीयात पुनर्विवाह मान्य नव्हता!केशवपण केलेल्या स्रिया शारीरिक शोषणाच्या बळी ठरत होत्या!त्यांना अपत्य प्राप्ती झाल्यावर मरण यातनांना सामोरे जावं लागतं असें अशा स्रि्यांसाठी अनाथालय सुरु केलें!त्यांच्या त्या मुलांचे संगोपन होऊ लागले होते!... त्यातीलच एका अभागी महिलेचा मुलगा यशवंतला दत्तक घेतला होता!... होय आम्ही शाळा सुरु केलेल्या त्या जीर्ण,मोडकळीस आलेल्या भिडे वाड्यातून सावित्रीबाई बोलते आहे!

दुःखीतांच्या उद्धारासाठी,दुःख काय असतं!लढाई काय असतें!संघर्ष काय असतो!मानसिक छळ काय असतो!अपत्य नसल्याचं दुःख काय असतं!मूल दत्तक घेऊन जीवनाची लढाई लढत!हे सर्व सहन करीत क्रांतिसूर्याच्या साक्षीने सर्वांवर मात करीत आले हो!एकट्याच्या सुखासाठी संपूर्ण मानव समाजाला दुःखाच्या दरीत लोटणे शक्यच नव्हतं!स्वतःच्या सुखावर पाणी ओतीत!!अखंड समाजाचं दुःख स्वीकारून!!दुःखीतांना आप्त मानीत दास्यत्वाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या..क्रांतिसूर्याची पत्नी याचं भिडे वाड्यातून आवाज देत आहे!.. होय मी सावित्रीबाई फुले बोलते आहे!🙏

जेथून अज्ञानाची कवाडे मोडून ज्ञान इमारत उभी केली!स्त्री उजेड पाहू शकली!नवा सूर्य पाहू शकली हा वाडा अज्ञान मुक्तीचा साक्षीदार आहे!०१जानेवारी १८४८चं ते वर्षं होत!तेजाळल्या डोळ्यात उगवत्या सूर्याचं दर्शन घेत "स्त्री" ग.. म.. भ..ची शब्द ओळख करून घेत होती!आंधळ्यानां दिव्य ज्ञानाप्रकाश दिसू लागला होता!.. आई,बहिणी,माता अंधःकारातून बाहेर पडू लागल्या होत्या!...कित्येक वर्षं लोटली!विज्ञान युग,जेट युग सुरु झाले!भारतीय स्रिया चंद्रावर जाऊ लागल्या!..क्रांतिसूर्यानंतर ज्योतीला ज्योत पेटवीत संघर्षप्रवास सुरूच ठेवला होता आम्हीही काळासोबत  प्लेगच्या साथीतं देह ठेवला!.... सर्वचं ज्ञानी होत राहिले!.. भिडेवाडा गतकाळापासून पाऊणे दोनशे वर्षं मुखसाक्षी बनून उभाच आहे!मोडकळीस आला आहे!वास्तुतील एक एक वस्तू ऊन पावसात तग धरून उभी आहे!न्याय मागते आहे... होय.. मी आज याचं वास्तुतुन आवाज देत आहे!.. मी सावित्रीबाई फुले बोलते आहे!🌹

वाड्यासमोर गणेश भक्तांची प्रचंड मोठी रांग दिसते आहे!ज्ञान देवतेचं दर्शन घेत आहेत!बुद्धी देवतेचे दर्शन होत आहे!ज्ञानदैवत"दगडूशेठ गणपतीला".. रांगेने दर्शन मिळतं आहे!बुद्धिदेवतेला प्रार्थना करीत आहे!.' ज्ञानसूर्याची शाळा "भिडेवाडा" मोडकळीस आला आहे!वसेचा वासा मोडकळीस आला आहे!राष्ट्र राष्ट्रीय स्मारकासाठी न्याय मागतो आहे!मानवतेच्या न्यायासाठी.. लढणारं ज्ञानमंदिर अंधारात आहे!ज्ञानभक्त येत आहेत!मोडकळीस आलेली जीर्ण शिर्ण अवशेष डोळ्यातल्या कोपऱ्यात टिपून निघून जात आहेत!... भिडेवाडा!प्रत्येकाच्या हृदयात आहे!इतिहासाची साक्ष आहे!त्यात बहुजनांची अस्मिता आहे!पाने मागे चाळली जात आहेत!पाऊणे दोनशे वर्षं बंदिस्त पाने इतिहास उलगडली जात आहेतं!०३जानेवारी,माझा वाढदिवस आहे!माझा जन्म साताऱ्यातील नायगावचा!ज्ञानसूर्यासोबत घट्ट लग्नगाठीतून ज्ञानामृत पाजित उभी राहिली होती!दीन दुबाळ्यांची सेवा करीत प्लेगच्या साथीत १०मार्च १८९७ साली साथ सोडून निर्मिका चरणी देह अर्पण केला!या मातृभू वरती ठेवला!.. वंचितांचां संघर्ष संपला नाही अजून!!... या पडक्या वाड्यातून माझा आवाज तुम्हा सर्वांच्या कानी पडत आहे!.. मी सावित्रीबाई फुले बोलते आहे!भिडे वाड्यातून सावित्रीबाई फुले बोलते आहे!"🙏
*************************
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०३जानेवारी २०२३
(सावित्रीबाई फुले जयंतीदिन)
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)