अहिरानी मायनी गोडी चंखाले तुम्ही भी या
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अहिरानी मायनी गोडी चखालें तुम्ही भी या!
💐💐💐👏👏👏💐💐💐
*****************************
... नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
घरमा सण ऱ्हायना!लगीनयावं ऱ्हायनं!उच्छाव ऱ्हायना!पोरं-पोऱ्यांना साखरपुडा ऱ्हायना का घरदार उजयी जास!घरना उजयी जातंस!पयापाय-शिनभागडं बठ्ठ आंगवर लिसनी भुंजायी भी जातंस!कार्य डोकावरनं वझ ऱ्हास!कार्य पुरं व्हवागुंता,आनंदी फुले फुलागुंता, पाम्हेरन्या कुसल्या जिमीनम्हा घुसीघासी व्हढी तानी कष्टानी पह्येरनी करनी पडस!...आनंनं जीव वती कामना भेटस!फय न्यामीन गोड ऱ्हास!कष्ट लेनारा हिरदथून समाधानी व्हयी जास!कष्टानं "चीज व्हयन" हाऊ आनंनं सूर्यानं उजाय इतलं सत्य ऱ्हास!.. भाऊस्वन!सहाव अहिरानी साहित्य संमेलनगुंता आसचं कष्ट आनी पयपय बठ्ठा आयोजक जेठा मोठा करी ऱ्हायनात!🌹
धुये अहिरानी भाषांनी खान सें!हेटला -वरला-कस्मादे पट्टाना येटोयांमा
बठेल "धुये"...बठ्ठासलें जोगेनं वाटस!धुये म्हणजे धूळ नई!!!...फफुटा नई!नेम्मन सांगालें गये तें "धुरंदर"
म्हनता यी!एकथून एक नवाजेल महापुरुष धुयानी माटीवर डोक ठी मोठ्ठल्ला व्हयेलं सेतस!धुये बठ्ठा भाऊभन हिरद वाटस!कायेज वाटस!धुयाना भायेर जग दुन्याम्हा आल्लग आल्लग क्षेत्रमां कार्य करनारा रंगतभाऊ धुयानी देणगी सेत!🌷
धुयानी पांझरा माय कई जुगथीन व्हायी ऱ्हायनी!काठवर बठेल धुयानी पानी परान सें!गंगा माय सें!पानींना उक्कय फोडी व्हायी ऱ्हायनी!धुयाले जगाडी ऱ्हायनी!धुयाले येयलं मानसे एकजीव व्हयी ग्यात!गंजज शिकी सवरी मव्हरे चालना ग्यात!धुयानी माटी कपायले लायी ग्यात!मोठल्ला व्हयी नाव काढी ऱ्हायनात!धुये शिक्शन नं माहेर सें!धुये जुनं सें!कात टाकी नवं रुपडं ली ऱ्हायनं!गंजज इतिहासकार,शास्रज्ञ,समाजसेवक, राजकारणी,अर्थतज्ञ धुयानी माटीम्हा वाडे लाग्नात!सोतानं नाव काढी मव्हरे ग्यात!..पूज्य साने गुरुजी-पूज्य विनोबा भावे धुयाले ऱ्हायेलं सेतस! अशा कितला महापुरुसनं नाव लेवू!!!..याचं धुयाले आते सहावं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन भरी ऱ्हायनं!पुण्यना दिन उगी ऱ्हायना!🌹
धुये लोकसंख्यामां फुगनं!विचार आचारम्हा फुगनं!गोर गरीबस्नी रोजी रोटीगुंता फुगनं!घरेसमुये फुगनं!खयखय व्हानारी पांझरामाय
खडक डाबरा डाबरास्मझार दिखाले लागी गयी!वावू चोरी-दपी खडकलें सोडी निंघी गयी!खडकेस्ना पिंजरा व्हयेलं नदी बठ्ठ सहीन करतं मुत्र्या- मात्र्या लवन व्हयी व्हायी ऱ्हायनी!... जुनं सोडी नवाना मांगे लागेल धुये काँक्रेटछाप व्हयी गये!जग बदली ऱ्हायन!धुये बदली ऱ्हायन!... धुयाले २१-२२जानेवारीलें ०६वं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन भरी ऱ्हायन!अध्यक्ष सेतंस... "आप्पान्या गप्पा" मारनारा प्रसिद्ध साहित्यिक,आदर्श शिक्षक, आदरणीय आप्पासाहेब रमेश बोरसे सर!🌹
अहिराणीना गोडवा दखना-आयकनां व्हयी तें धुये जिल्हानां कानाकोपरे फिरी येवो!वऱ्हा नंदुरबार जिल्हा, दक्खनंलें कसमादेपट्टा,हेट्या आमयनेर,चाईसगावं,भडगाव, धरणगाव,येरंडोलनां मव्हरे गोडवाना सुगंध पसरेल दिखास!वार्गी व्हास तशी भाषा व्हात ऱ्हास!जुन्नाट सोनं अहिर भाषा अस्सल खनंखनत नाणंमुये टिकी व्हायी ऱ्हायनी!
सक्कायम्हा बाप पोरेंस्वर सुटस तव्हयं भाषांना आवतार दखो!गावमा भवाडा उना जानू!माय आमाय-कोमायी, जीव-लायी पोऱ्याले आपला पदरखाले झाकस तव्हय अहिरानी भाषा निरुंगचीटिंग व्हयी जास!जीव लायी मया करस! बाप पोरले
दनंकारत नयी,तव्हयं त्यानं दगड कायेज बर्फी कस व्हयी जास!पोऱ्यालें एक डोया म्हायीनं काढी दुसरा डोयाम्हा घाली देखत ऱ्हास!दनकारत ऱ्हास!पोऱ्या पट्यारा व्हयी काना डोया करी लेस!तर्हे दि वट्टावरथून पाय उखली वावरना रस्ते पयेत सुटस!बैलसलें चारा पानी करी! गाड धुरायी कामले लागी जास!.. तठे अहिरानी भाषा आथी-तथी उधयेतं ऱ्हास!🌷
अस्सल सोनं आंगवर घालेलं भाषा रुपवती व्हयी साज शिनगारम्हा उठी दिखस!...भाऊस्वन कालदिन सनवार-आयतवारलें मायनां रुबाब दखा आयकालें या!मन गरायी जायी!मायनी पालखी डोयानं पारनं फेडी दि!....तठे खुडा दिखी!बाजरीनी हाव दिखी!मट्यारं,बदग दिखी!डबूकडयास्न बट्ट दिखी!
ढासलं दिखी!पाटोड्या दिखतीन!
वावरनी व्हाती लांघी दिखी!
चिखोलम्हा चिवडेल चावडेलं तय पाय दिखतीन!थंडीनां कडाका दिखी!हुबा गहू दिखी!हारंभरा दिखी!उनन्हा चटका दिखी!पावसायानी गरपीट दिखी!बठ्ठा रंजेलं गांजेलं सवसार दिखी!आपुन जे जगी
ऱ्हायनुतं त्यांना नेम्मन आरसा सहावं अखिल भारतीय साहित्य संमेलनम्हा दिखी!डोयाभरी दखसूत!कानवरी तृप्त व्हसूत...आसं न्यामीन संमेलन "खान्देश साहित्य संघना मेढ्या प्रा.डॉ.सदाशिवराव सूर्यवंशी सर यांसना टिमन्हा भू कष्टातून व्हयी ऱ्हायन!हाजेरी लायी मन मोके करुत!🌹
👏👏👏👏👏👏👏👏👏
****************************
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२० जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment