अहिराणी मायनी जत्रा

🌹🌹🌹🌹🌹🌹
अहिराणी मायनी जत्रा
🌷🌷🌷🌷🌷🌷
... नानाभाऊ माळी 

"नजर चुकाडी उजाये दखाडी
मी मव्हरें चाली ऱ्हायनू!
 कयेकनी आर टोची टाची
एकला सवरी ऱ्हायनू......!🌷

"डोयाले उजाये,कानमां वाजायें"... यांना अर्थ मन्हा डोकाम्हा काय घुसना नई भाऊस्वन ?? गोठ धाकली सें,अर्थ मोठा सें!जग मव्हरे जायी ऱ्हायन!सुधरी ऱ्हायनं!डोयालें जे दिखास,कानमां आयकी वागतंस!कव्हयं मव्हयं या दोन्ही गोठा हिरदलें भिडतीसं नई!...आते जग दुन्यामां गाजावाजा व्हवा बिगर कोंथीचं गोठ झकायेलं नई सें!पोट झोडिस्नी  इकायी ऱ्हायनी!🌷

आतेंनं मार्केट उज्जी दिखावानं व्हयी जायेल सें!दिखावालें डोकावर बसाडी मिरायी ऱ्हायनात!त्याम्हा चांगलानं भी सुपडं साफ व्हयी ऱ्हायन!तोंडं झोड्या नाची कुदी माल खपाडी मव्हरे निंघी जायी ऱ्हायनात!उजायाम्हा जे दिखाई ऱ्हायन तेचं खपी ऱ्हायन!वसरीमां जो बठेल सें  त्यालेच दुन्या इचारी ऱ्हायनीं!...यालें प्रकाश म्हंतंस!याले गाजावाजा म्हंतंस!याले प्रकाशन म्हंतंस!भवडी-भावडी उजायाम्हा उठी, वयखनं डफड वाजी!डांख्या वाजाडी दिखस त्याले प्रकाशन
म्हंतंस!च्यारी कोने ज्यांनी कानवर वार्ता यी ऱ्हायनी त्याले प्रकाशन म्हंतस! प्रकाशम्हा चमकी उठस त्याले प्रकाशन म्हंतंस!मन्ह मत बी तशीच बनी जायेल सें !🌷

उजाये दखाडसं,चार लोकेस्मा चमकस!चमक्यालें खांदवर धरी मिरावतस!नाचांडतस!गाजावाजा करी,भर चौकमां फोटूक लायी प्रसार,प्रचार करतस त्याले प्रकाशन म्हनतंस!लोकेसना कान आनी डोयास्पावूतं भिडस त्याले प्रकाशन म्हंतंस!🌹

सध्या बठ्ठा ठिकाने प्रकाशन चालू सें!जथांबन तथा अहिराणी मायना जागर चालू सें!मार्ग वालावाला सेतंस!पन जागरनं उजगरा जोरबन व्हयी ऱ्हायना!हाऊ उजागरा अहिराणी मायना आतेना आनी मव्हरला सोनानां दिनगुंता व्हयी ऱ्हायना!अहिराणी मायना चांगला दिन यी ऱ्हायनात!ह्या आनंनं लें मोल नई सें!🌹

पुस्तके प्रकाशन,अहिराणी मेळावा, अहिराणी साहित्य संमेलन,अहिराणी गाना, काव्य संमेलन.....अशा गंजज माध्यमथून अहिराणी मायना उजागरा व्हयी ऱ्हायना!उजगरा व्हयी ते भाषा दुरपाऊत पव्हची!..भाषांनीं गोडी वांनंगी म्हणीसनी गंजज भाउभन वाटी ऱ्हाययनात!हाऊ आपले अभिमान सें!... पहिले ज्यासले अहिराणीमां बोलले लाज वाटे त्या भी लोकलाजे बोली ऱ्हायनात!तोंडंम्हा बर्फीनां तुकडा धरो भाषा आते गोड वाटी ऱ्हायनी!मांगल इसरी मव्हरे जान पडी!🌹

अहिराणी भाषांनी गोडी जो वाटी त्याले या जलमम्हा पुण्यन्हा वाटा भेटनार सें!जो खांदवर धरी मायनी पालखी काढी त्यास्ले पुण्यनं आमरूद भेटनार सें!थेंब जीभवर चखाले भेटनार सें!जो अहिराणी मायनी पालखी काढी!दूरदूर पाऊत  मिरायी त्यास्ले मायना साक्षात्कार दिखनार सें!आते मायना पालखीना भोई दुरलोंग हिरदथून भवडी भावडी सेवामां लागी जायेल सेतस!०६वं साहित्य संमेलन आनी अहिराणी कॅलेंडर प्रकाशनन्हा निमित्तथून जो तो मायनी सेवा करी ऱ्हायनात!.. नद्या गंजंज सेतीस!.. बठ्ठया मीयी तापी मायले भिडी ऱ्हायन्यात!goal एक सें मार्ग न्यारा न्यारा सेतस!... बठ्ठा अहिराणी मायना भोई मायना पायवर डोक ठी एक व्हयी ऱ्हायनात!एक ताटे जी ऱ्हायनात!... खान्देश आनी अहिराणी मायना जागर करी ऱ्हायनात!🌹
जय अहिराणी!जय खान्देश
🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
***************************
... नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं- ७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१७ जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol