राज्यस्तरीय युवा संमेलनाची ऊर्जा

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राज्यस्तरीय युवा संमेलनाची ऊर्जा 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**************************
... नानाभाऊ माळी 

युवा शक्ती देशाचा पाया असतो!युवा शक्ती देशाची ऊर्जा असतें!युवा शक्ती  निर्मितीचां आरंभ बिंदू असतो!स्वप्नांची विशाल उमेद असतें!स्वप्न सत्यात उतरंवणारी प्रचंड ताकद असतें!युवा शक्तीला व्हिजन असतें!युक्ती असतें!उर्मी असतें!जोश असतो!देशाप्रती प्रचंड अभिमान असतो!गरुडझेप घेणारी युवाशक्ती विधायक कार्यातून सिद्ध करीत असतें!विशाल स्वप्न पाहणाऱ्या युवाशक्तीकडे प्रतिभा आहे!थोर महापुरुषांच्या आदर्श मार्गावरील पताका घेऊन चालणारी युवाशक्तीला जागृती करणारे धडपडे युवक असतात!युवक विशिष्ठ उद्धेशांनी झपाटलेले असतात!त्यात मा. प्रवीणजी महाजन साहेबांसारखे स्वतंत्र चळवळ उभी करणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व देखील असतं!🌷

युवा पिढीचे प्रेरणास्रोत!युवकांचा स्फूर्ती झरा,विश्व तत्वज्ञ!स्वामी विवेकानंद!छत्रपती शिवरायांच्या मनात स्वराज्याची  ज्योत पेटविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती!....राष्ट्रीय युवा दिनाच्या त्रिवेणी संगमावर उभे असलेल्या तरुण युवक-युतींचे विशाल, महा संमेलन काल १५जानेवारी २०२३ला मकरसंक्रांत दिनी पूण्यातल्या पत्रकार भवनात पार पडले!🌹

युवकमित्र परिवारचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रवीणजी महाजन साहेब आणि त्यांचे सर्व समन्वयक मित्रांचे  कौतुकास्पद!अभिमानास्पद!गौरवा स्पद कार्य प्रत्येकाला डोळस करून गेलं!त्यांच्या अथक परिश्रमातून!योगदानातून उभी राहिलेली ही सामाजिक चळवळ अर्थात "युवक मित्र परिवार"ही संस्था तरुणांसाठी स्फूर्तीदायी ठरली आहे!समाजातील वंचित घटकांसाठी उभी राहिलेली ही संघटना युवकांची प्रेरणास्रोत बनली आहे!युवकांना योग्य दिशा देणारा आणि उद्धीष्ट घेऊन चालणाऱ्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वास नमन करतांना  सार्थ अभिमान वाटत आहे!

स्वतःचा वेळ!कार्याप्रति निष्ठा!झपाटलेपण!निर्व्याज सेवा!वंचित घटकांपर्यंत पोहचण्याची तळमळ!लोक सहभाग!... मिळालेल्या प्रतिसादातून कार्यास झोकून देणारी वृत्ती असणारी व्यक्तिमत्व युवक मित्र परिवारातून जन्माला येत आहे!थोर तत्वज्ञ!विचारवंत!युवाशक्ती आदर्श स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान आहेत!

सायकल बँक ही संकल्पना महाराष्ट्रातील गावोगावी!ग्रामीण विभागापर्यंत राबवणारे प्रवीणजी महाजन साहेब वंचिताचे आदर्श ठरले आहेत!सर्व स्वयंसेवक,समन्वयक वापरून टाकून दिलेल्या सायकली ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या पर्यंत पोहचतात!त्या सायकली गोळा करून दुरुस्त करवून घेतात!पुन्हा त्याचं सायकली ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या अतिशय गरीब विध्यार्थ्यांना,शाळा लांब असणाऱ्या विध्यार्थ्यांना वाटप करीत असतात!वंचितांना सामाजिक बांधिलकीतून सेवा देणारी "सायकल बँक" ही संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणून वंचितांच्या गरजेला साह्यकारी ठरली आहे!स्वयंस्फूर्तीने या कार्यास झोकून देणारे युवक "युवक मित्र परिवाराचे"स्वयंसेवक झालेले आहेत!
युवक मित्र परिवार महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात,आदिवासी भागात, गाव तांड्यात गरीब विद्यार्थ्यांना साह्य करीत आहेत!महत्वाची सामाजिक चळवळ आणि तळमळउभी केलेली आहे!हुंडा बंदी कायदा असूनही विवाहितांचें बळी जातं आहेत!त्यावर चळवळ उभी करणार आहात!आपण स्वप्न पाहणारी आहात!स्वप्न साकार करणारी आहात!ज्ञानऋषी आदरणीय रतन माळी सरांचा आदर्श निर्माण करणारी आहात!आपण कार्याची नशा घेऊन जगत आहात!उर्मी आणि लगन घेऊन वाटचाल करीत आहात!आपणास कामाची भूक तर आहेच समाजाच्या प्रगतीसाठी आट्टहास आहे आपल्यात!🌹

गाव तेथे ग्रंथालय,वाचनालय असावे असं शासकीय धोरण असतं!समाज जागृतीतून!गावातून विकासाची पहाट उगवत असतें!वाचनातून माणूस डोळस होतं असतात!देशप्रवाहात येऊन ज्ञानगंगा वहात राहते!...शासकीय यंत्रणा कार्यरत असतेचं पण अतिशय गरजू घटकांपर्यंत ही ज्ञानगंगा आभावानेच पोहचत असतें!गावात वाचनालय आणि ग्रंथालय असेल तर ज्ञानदानाचा पाया घट्ट-भक्कम भिंतीवरती उभा रहात असतो!अत्यंत गरीब आणि गरजूनां पाहिजे तसा लाभ होतं नसतो!.. मा प्रवीणजी महाजन आणि त्यांच्या "युवक मित्र परिवाराने" शहरात, गावागावात फिरून जुनी पुस्तके,जुने ग्रंथ,रद्दीत टाकून दिलेले पुस्तकं,काहींना घरात अडगळ असणारी पुस्तकं असतील अशा घरी पोहचून ती पुस्तकं गोळा करून,..पुन्हा नवीन दुरुस्ती,कव्हर चिटकावून,वाचनास योग्य असलेली पुस्तके ग्रामीण भागातील गावात ग्रंथालयांना वाटप करीत आहेत!ही स्वप्नवत संकल्पना कृतीतून राबवत असतांना कितीतरी हातांचा हातभार लागतं असतो!हे एकट्याचे काम नाही खिशातून पदरमोड करणारी ध्येयवेडी माणसं एकत्र येऊन कार्य करतात तेव्हा समाज जागृती होतं असतें!युवमित्र परिवार हे अवघड कार्य राज्यभर करीत आहे!वंचित घटकांपर्यंत पोहचून त्यांना साह्य करीत आहेत!मदत करीत आहेत!

अलीकडे संगणक युगाने क्रांती केलेली आहे!ज्यांच्याकडे पैसा आहे तो संगणक विकत घेतो!आधुनिक ज्ञान भंडाराचा स्वतःसाठी लाभ घेत आहेत!जनरेशन बदलतं!माणूस नव्यापाठीमागे धावू लागतो!जुनी वस्तू अडगळ होऊन जाते!शहरात अनेक ठिकाणी हे चित्र दिसतं असतं!परंतु ग्रामीण भागात या आधुनिक सुख सुविधा अजूनही पाहिजे तशा पोहचलेल्या नाहीत!ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये संगणक पोहचलेला नाही!गरजूना लाभ घेता येत नव्हता!अत्यंत गरजू विध्यार्थी आधुनिक ज्ञानापासून वंचित रहात आहेत अशा शाळांसाठी शहरातील अनेक व्यक्तींकडे,संस्थेकडे जुनी टाकून दिलेली संगणक भंगारात पडून होती त्यासाठी युवक मित्र परिवाराने आवाहन केलें की 'गरजू विध्यार्थ्यांना आपल्याकडील टाकून दिलेली संगणक दिलेत तर आम्ही दुरुस्त करून ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाटप करू!'...आवाहनास प्रचंड प्रतिसाद मिळतं गेला!..युवक मित्र सहकार्यांनी दारोदारी जाऊन बंद पडलेले संगणक गोळा केलेत!दुरुस्त करून पुन्हा तें ग्रामीण भागातील अनेक शाळांना वाटप केलेत!शाळा आणि गरजू विध्यार्थ्यांना याचा लाभ होतं आहे!🌹

युवकांनी ठरवलं तर काहीही घडू शकत!आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो!ही भावना बळावली, जनजागृती झाली तर प्रत्येक गोष्ट शासनानेच केली पाहिजे असा अट्टाहास राहणार नाही!शासन त्यांच्या परीनं समाज कल्याण हेतू सेवा पुरवीत असतंच!आपण काय देणे लागतो याची जाण आली तर देशाचं विकास मॉडेल घरातूनच बनवलं जाईल!बलदंड भारताचें स्वप्न पाहणारी व्यक्तिमत्व झापटलेली असतात!सत्कर्म ध्येय डोळ्यासमोर ठेवलं तर त्याचं फळ गोड असतं!'युवक मित्र परिवार'.. देशहितासाठी समर्पित होणारी चळवळ आहे!मा.प्रवीणजी महाजन साहेब आणि त्यांच्या सहकारी मित्रांचे हृदयातून गौरव करावा तेवढा कमीचं होईल!चंदन झिजत असतं!झिजता झिजता सुगंध देत असतो!सोनं तापवून पुन्हा शुद्ध होतं असतं!नवी झळाळी घेऊन पिवळे धमक सोनं अस्सलतेचं प्रतिनिधीत्व करीत असतं!युवक मित्र परिवार अशीच चळवळ आहे!🌹

काही माणसं स्वतःसाठी जगत असतात!खात पीत असतात!आपल्याच स्वकेंद्रित जगण्यात समाधान मानीत असतात!नाही तर काही लोक स्वतःपूरते मुर्दाड जीवन जगत असतात!तेचं त्यांचं जग असत!... जग खूप विशाल आहे!...आपण ...दुसऱ्यांसाठी तेही गरजू गरिबांसाठी,गरीब विध्यार्थ्यांसाठी पदरमोड करून,वेळ दवडून!साह्यतेसाठी पळत आहात!हिंडत आहात!देशाचं,या समाजाचं काहीतरी देणे लागतो म्हणून आपण हे निर्मळ,निरपेक्ष भावनेने कार्य करीत आहात!आपण निर्व्याज्य सेवेतून समाजां समोर मोठा आदर्श ठेवत आहात!बंधूनो..हिचं खरी ईश्वर सेवा आहे!असं जगण्यात वेगळीच मजा असतें!सेवारत अनुभव मनाला समाधान देणारा असतो!आनंद देणारा असतो!युवा शक्ती देशाची संपत्ती आणि ताकद असतें!🌹

समाजाप्रती हृदयातील ओलावा असावा लागतो!!काहीतरी देणे लागतं असतो!जीवंत कृतिशील माणसांची लक्षण असतात!आपण महान कार्य करून आदर्श ठेवीत आहात!..🌹

युवक मित्र परिवारसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या अनेक उत्तुंग व्यक्तीमत्वाचां गुणगौरव सोहळा काल रोजी आयोजित केला होता!स्वतः योगदान देणाऱ्या अनेक सन्माननीयांचा सन्मान अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता!🌹

ज्यांच्या २५ शाळा आहेत अशा  "महात्मा फुले विद्यानिकेन संस्थेच्या तरुण अध्यक्षा,निर्गवी व्यक्तिमत्व हरहुन्नरी मा.सौ.स्मिताताई वाघ मॅडम यांनी कार्यक्रमांचं उदघाटन केलें आणि उत्तम मार्गदर्शन देखील केलें!
जेष्ठ उद्योजक आणि मार्गदर्शक उत्तम वक्ते...मा श्री.गोविंद सुमन केशवराव डाके सर अध्यक्ष म्हणून लाभले , कर्मवीर,ज्ञानऋषी आदरणीय रतन माळी सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते!प्रमुख वक्ते मा.वैभवजी मोगरेकर सर,मा.डॉ. प्रमिलाताई तेलवाडकर मॅडम,मा.श्री.किशोरजी कुलकर्णी सर,यांच्या उत्तम मार्गदर्शनाचा लाभाने उपस्थित युवक भारावून गेले होते!.. युवक मित्र परिवारचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रवीणजी महाजन साहेब आणि  आणि मा सचिनजी म्हसे सर...समन्वयक बंधूच्या अथक त्यागास नतमस्तक होऊन नमन करतो!


 मित्र मा.श्री.प्रवीणजी महाजन साहेब वयाने लहान आहेत!फक्त ३२वर्षांचे आहेत!शासकीय सेवेत अभियंता आहेत!सामाजिक जाणीवेने
झपाटलेले युवक आहेत!तरुण आहेत!त्यांच्या सोबत सर्वचं युवक मित्र तरुण आहेत!स्वप्न पाहणारी आहेत!स्वप्न सत्यात उतरविणारी आहेत!देशाची धुरा खांद्यावर घेणारी आहेत!नवीन व्हिजन आहे!
स्वप्न कृतीत उतरवणारे आहेत!हाती घेतलेलं कार्य तडीस नेणारे आहेत!अंगात ऊर्जा आहे!शक्ती आहे!युक्ती आहे!उर्मी आहे!जोश आहे!देशाप्रती भक्ती आहे!आपल्यात गरुड झेप घेण्याची उर्मी आहे थोर विचारवंतांना महान तत्वज्ञानिना आदर्श आहेत तें आहेत स्वामी विवेकानंदजी!🌹
  
आपलं योगदान स्फूर्तीदायी आहे!आदर्श घेण्यासारखे आहे!युवाशक्ती देशाची ताकद आहे!भवितव्य आहे!भावी नेतृत्व म्हणुन युवाशक्तीकडे पाहिले जात असतं!आपल्यातील जिद्द आणि आस्था स्वप्न साकारासाठी ताकद आहे!ही ताकद सन्मार्गाला लावून देशाच्या उज्वल कीर्तीत आपलं विशाल योगदान आहे!युवक देशाचं भवितव्य असतात!युवकांमध्ये जोश असतो!जोश प्रगतीचं प्रतीक असतं!आपण उमेदीच्या वयात उमेदवारी करीत आहात!गरुडभरारी घेत यश शिखर सर करतांना खाली वाकून आर्थिक दृष्टया गरीब घरातील मुलांना देखील उभे करीत आहात!आपल्यात  प्रचंड प्रतिभाशक्ती आणि ऊर्जा आहे!🌷

युवमित्र संस्थापक  श्री प्रवीणजी महाजन साहेब आणि सर्वचं समन्वयक मित्रांचे कौतुक करतो!अभिनंदन करतो!आपल्या अथक मेहनतीस नमन करतो!स्वतःच्या खिशातून पैसा आणि वेळ खर्च करणाऱ्या युवा मित्रांचे शब्द सुमणांनी गौरव करतो!आपणास स्फूर्ती देणाऱ्या महापुरुषांना देखील नमन करतो!🌹

स्वतः जगतो स्वतः मरतो
हे स्वार्थी ढोंगी सोहळे
दुसऱ्यांसाठी जगण्यातूनी 
 गरीब देतील दुवा थोडे..!

मीचं मजेत जगत आलो
 गेले राहुनी दुर्बल मागे
 अश्रू एकदा पुसूनी पहा रें
उभे राहतील मागे दोघे..!

रोज पायपीट शाळेसाठी
असतें निर्धनाचें जगणे 
ज्ञानघेण्या रोज जावूनि 
उघडूनि द्यावी नवी पाने..!

उघडतील ज्ञानडोळे तयांचे
मिळूनी साथ द्या रें सारे
पोटापुरते जगणे आपुले
खालूनी वाहू द्या रें वारे..!

***********************
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१६जानेवारी२०२३
nanabhaumali.blospot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)