माझी आई अशीच आहे (भाग-०९)
💐💐💐💐💐💐
माझी आई अशीच आहे
💐💐💐💐💐💐
(भाग-०९)
*********************
... नानाभाऊ माळी
"जीवनाची ज्ञानदात्री
पेन पेन्सिल झालीस तू
श्वास आई दिलेस आम्हा
कळातुनी व्यालीस तू
पहिला गुरु झालीस आई
देवा जवळी नेलेस तू
आभाळाहुनी विशाल काळीज
संयमी बनविलेस तू"
आपलं बालपण निर्मळ असतं!स्वच्छ पाण्यासारखं असतं!खळखळतं अन खट्याळ देखील असतं!बालपण एकदाच मिळतं असतं!तणावमुक्त असतं!पोटं भरणारी पाल्य पळत असतात!मनसोक्त खेळणे,जगणे असतं!बालपणी देव आपल्या जवळ असतो!... देव आईरूपात येऊन झिजत असतो!ममतेच अमृत ओतून माया लावीत असतो!..असं बालपण पुन्हा नाही!बालपणाला कुरवाळणारी आई असतें!स्वप्न दाखवणारी आई असतें!..राजमाता जिजाऊ असतें!श्रावण बाळाची आई असतें!पूज्य साने गुरुजींची आई असतें!उगवता सूर्य दाखवणारी ती आई असतें!🌷
काळीज दान देणाऱ्या आईचं हृदय अनमोल असतं!कोणीही विकत घेऊ शकत नसतं!करुणेच्या डोळ्यात पोहतांना तिचं मोल जाणले तर आई कळतं असतें!अंधारातं एकटीच अश्रू गळतांना मुलांसाठी ईश्वररूप धारण करत असतें!अशा सुखाच्या सावलीत आपण जगत असतो!आपल्याला काटा मोडला तर विव्हळणारी आई टचकण डोळ्यातून अश्रू गाळत असतें!आपल्या सुखासाठी अश्रू
गाळणाऱ्या आईच्या पावलांची माती आपण मस्तकी लावली तर आईचं ऋण थोडं तरी फेडता येत असतं!अशीच असतें आई!सर्वांची आई अशीच असतें!... माझीही आई अशीच आहे!🌹
"अशिक्षित आईनें शिक्षणाचं महत्व पटवून सांगावे,शिक्षित करुनी सोडावे जगाला!"... आईने शिक्षण नावाचं वाघीनीचं दूध आमच्या मनात अन गळ्यात उतरवलं नसतं तर खरंच शेतमजूर म्हणून कोणाच्या तरी शेतात राबत राहिलो असतो!शेताचा बांध कोरत राहिलो असतो!अंगावर फाटकी लक्तरं घेऊन राबत राहिलो असतो!स्वतःच्या पोटाला इतरांच्या पोटासाठी पुरेसं नं खाणारी आई आम्हास उभे करून स्वतः वाकली आहे!वाकली असतांना स्वाभिमान जपत उभी राहणारी आई आयुष्यातून एकदाच मिळत असतें!मिळालेल्या आयुष्यात आईने संस्कार धन,विचार धन!आचार धन!चरित्र्य धन,श्रद्धा आणि विश्वास धन वाटीत राहिली!... सर्वांचीच आई अशी असतें!माझीही आई अशीच आहे!
घराचा उंबरठा शिलतेच प्रतीक असतो!लग्नाआधी मुलीला आईवडिलांच्या नजरेतून पाहायची,वागायची सवय झालेली असतें!..मुलीचं लग्न होतं!माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाते!तेथे मान,मर्यादा जपून घराची लक्ष्मी होऊन जगत असतें!पोटाला नसलं तरी इतरांसाठी जगत असतें!घराच्या आड संसार सुख-दुःखाची मांडणी करीत असतें!...घराबाहेर फक्त सुख वाटणारी माऊली आई होते!...आई मुखी हसत राहते!आत दुःख गिळत असतें!तिचं सर्वांची आई असते!... सर्वांचीच आई असतें!... माझी ही आई अशीच आहे 🌷
आई-वडिलांच्या मोठया पावलांवर पाऊल ठेवून मुलं मोठी होतात!त्यांच्याच पावलांचं माप होतात!वडील थकतात!आई थकते!उमेदीच्या काळात आधार होणारे वृद्ध होतात!आधार उधार होत जातो!मुलं आधार होतात!त्यांची सेवा कर्तव्य असतं!देव्हाऱ्यातील देवासारखी पूजा केलीत तर तेचं संस्कार नातवंड देखील घेत असतात!वृद्धानां सुखाचे दोन घास आणि गोड बोलणे हवं असतं!जास्त काहीही अपेक्षा नसते!जगण्यातलं सुख आणि आनंद घ्यायचा असेल तर हृदयातून आईची, वडिलांची सेवा केल्यावर,सत्कर्माचं गोड फळ कुठल्या तरी मार्गाने आपल्या जवळ येत असतं!आई देवात्वाची जननी आहे!देव सुपुत्र आहे!... यशोदेचा कान्हा आहे!... तो मनोव्यापार अन श्रद्धा दाता आहे!आईची सेवा तोच करीत असतो!सेवा करवून घेत असतो!निरपेक्ष भावनेने केलेली पवित्र सेवा आईच्या आशिर्वादामुळे फलित होत असतें!तिच्या डोळ्यातील हळवे भाव टिपणारे मुलं भाग्यशाली असतात!... सर्वांचीच आई अशी असतें!माझी ही आई अशीच आहे!🌷
आई माहेर मागे ठेवून आलेली असतें!त्यात तिचा महान त्याग असतो!उन-पावसाळ्यात, हिवाळ्यात आपलं मन आणि काया झिजवत सर्वांना सुख देत असतें!डोळ्यात डोळे घालून ममतेचं पहिलं ज्ञान देत स्तनपान करणारी आई रक्त वाहिणी असतें!स्वतःच्या पायावर बोट धरून चालायला शिकवणारी आई ईश्वराचां अंश असतें!मुलांसाठी जग असतें!संस्काराची शाळा असतें!ईश्वराजवळी नेते!चांदोबाशी ओळख करवते!विशाल हृदयी आई वाळवंटी शितल होते!पावलो पावली संकटे हरविण्या शिकवीत असतें आई!घरोघरी एक हृदयी असतें एक आई!विश्वासाचा मोठा हात असतें एक आई!माझी आई अशीच आहे!🌷
"डोळे उघडीत रोज सकाळी
दिसते माझी आई
अंथरुणावर देह ठेवतांना
दिसते माझी आई... 🌹
डोळ्यात थांबतो झरा खोल
घरंगळुनी वाहते आई
वरती खाली श्वास चालती
माझ्या हृदयी बसली आई"🌷
***********************
💐🌷🌹💐🌷🌹💐🌷
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१३जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment