योग कधीतरी येत असतो

असा योग कधीतरी येत असतो!प्रसंग कधीतरी येत असतो!.. लहान नद्या मोठी सामावून घेत असतें!... प्रवाह वेगळे असतात!मूळ एक असतं!.. मुळातून वेगळे होत परत समद्रात एकाचं ठिकाणी यायचं असतं!.. वेगवेगळ्या मार्गानी प्रवास करीत!... खाचखळगे पार करीत नद्या वहात राहातात!.. सर्व चढ उतार विसरून पुन्हा एकाचं ठिकाणी समुद्रात एक होऊन जातं असतात!... कधीतरी वाटतं सृष्टीच्या नियमांचे पालन करीत आपण ही वयोमानाने मागील सर्व विसरून शेवटी या मातीवर चिमूटभर राख गोळा करून तिचं धरणीवरती आनंद निर्माण करणारं आहे!... "माझे".. "माझे".. सर्व स्वार्थत्याग करून "आमचे".... आपले झाले तर माझ्यात चिकटलेला अहंमं भाव,राग,ईर्षा,तिरस्कार सर्व गंगार्पण झाले तर!... सर्वांच्या हृदयात आनंद नाचू लागेल!सुखाचा नवा सूर्य उगवू लागेल!मद मत्सरास जाळूनी हिरवाईचा नवा साज चढेल!💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🙏🪷🪷😌😌

मी इर्षेच्या पायी
दुःखखड्डा खोदला आहे
राग लोभाच्या पायी
डोंगर बांधला आहे....

आता विसरूनी जाऊ
तिरस्कार आपसातला
डोळ्यातल्या आंसवांनी 
रांजन भरू द्या आतला 💐💐🌷🌹🙏...
........नानाभाऊ माळी

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)