घरट्याचे बाबा रतन माळी सर

घरट्याचे बाबा रतन माळी सर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************

...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
माणूस जन्माला येतो!कोणी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत असतो!सर्व काही उपलब्ध असतं!मुखातले शब्द बाहेर पडले की उचलणारे........अशा वैभवसंपन्न,वैभशाली घरात काही  जन्माला येत असंतात!काहींना अनेकदा ओरडल्यावर एखादी वस्तू मिळते!असें मध्यमवर्गीय,त्यांच्या घरी जेमतेम असतं!पण तडजोड करून मुलांचे लाड देखील केलें जातात!... तर काहीजन अशा ठिकाणी जन्म घेतात ज्यांच्याकडे दोन वेळचं जेवण देखील नसतं!.. अतिशय गरीब!झोपडीत राहणारा!...पालाच्या झोपडीत राहणारा!दोन वेळचं पोट भरण्यासाठी राबराब राबणारा!... जे मिळेल ते शिळे-पाकळे  अंगावर धड कपडे नाहीत!पोटासाठी वणवण अशा ठिकाणी जन्म घेणाऱ्याचा काय दोष असावा?जन्म घेणं आपल्या हाती नसतं!सर्वस्वी अनाकलनीय खेळ म्हणूयात!🌷

जन्म कुठल्या घरात घ्यावा,कुठल्या घरात व्हावा हे काही आपल्या हाती नसतं!....पण मिळालेल्या जन्माच सार्थक करून घेणं हे निश्चितचं आपल्या हाती असतं!कष्ट,मेहनत, जिद्द,उद्देश,कामाप्रति आस्था,प्रेम यामुळे यशाचं द्वार उघडतं असतं!...याचं बाबी माणसाची प्रतिमा निर्माण करीत असतात!कर्तृत्व निर्माण करीत असतात!शून्य पाहिलेला व्यक्ती पुढे कर्तृत्ववानाचा शिक्का घेऊन हिंडत असतो!🌹

'घरटं' पाखराचं असतं!घरट्यात लहान लहान पिलं असतात!पूर्णतः
परावलंबी असतात!निराधार असतात!... अशी बरीच माणसं पुण्यातल्या,हडपसरमधील रस्त्याच्या कडेला पालाची झोपडी बांधून रहात असतं!अशा निराधार व्यक्तींची मुलं कशी रहात असतील बरं?मुलांचं शिक्षण नाही,धड पोटाला अन्न नाही!अशांच्या घरी जाऊन आदरणीय आप्पासाहेब रतन माळी सरांनी.. बाबांनी लहान लहान मुलांसाठी "घरटं" नावाची संस्था साधारण सन २००७ साली स्थापन केली!पालकांना समजावून सांगितले!मुलांचं भवितव्य घडविण्यासाठी पालक मुलांना बाबांच्या स्वाधीन करायला राजी झाले!घरट्याला, संस्थेला मूर्त रूप आले!🌹

पुणे महानगर पालिका आर्थिक साह्यनिधीतून हा प्रकल्प आदरणीय माळी सर मोठया परिश्रमातून चालवीत आहेत!जिद्दीने चालवीत आहेत!कन्या सौ.स्मिता दिदी वाघ आणि जावाईबापू प्राचार्य रवींद्रजी वाघ सर यांची भक्कम साथ,साद माळी सरांना लाभली आहे!४२पटसंख्या असलेल्या मुलींच्या या घरट्यात वयोमानानुसार सर्वचं मुलींचं उत्तम संगोपन होत आहे!🌹

मुलींना निवारा मिळाला!आश्रय मिळाला!आधार मिळाला!.. जेवण आणि कपडे मिळत असून निवासी घरट्यात मुलींची उत्तम काळजी घेतली जात आहे!अशा या घरट्याची काळजी वाहणारे "बाबा" आदरणीय रतन माळी सर स्वतःच्याच मुलांपेक्षा उत्तम काळजी घेत आहेत!निराधार मुलींचे बाबा पुण्यात आले तेव्हा फक्त अंगावर एका ड्रेस होता!स्वतः बालपणी अतिशय बिकट परिस्थितीतून गेल्याने भूक,भाकरी,गरिबीचा चटका माणसाला शिकवीत असतो!माणूस मोठा झाल्यावर पूर्व परिस्थितीची जाणीव जिवंत असेल तर करुणामयी,कनवळूवृत्ती त्या व्यक्तित्वाला सजवीत असतें!🌹

सर्वांचे 'बाबा' आदरणीय रतन माळी सर दीन-दुःखीतांच्या अदृश्य हाकेला धावून गेलेत!.... घरटं उभं राहिलं!घरट्यातील लहान मोठी पाखरं आनंदाने खेळताहेत!बागडताहेत!..
बाबांना मनापासून आनंद होतो!समाधान मिळतं!त्यांच्यावर आपल्या घरच्या मुलांसारखेच संस्कार घडवीत आहेत!विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करीत असतात!त्या मुलांना विविध शाळामध्ये सामावून घेण्यात आले आहे!मुक्त निवास,जेवणाची व्यवस्था आणि शिक्षणाच्या उत्तम सुविधेमूळे "घरटं प्रोजेक्ट"नावारूपाला आलेलं आहे!🌹

०१ जानेवारीला बाबांचा ७३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला!दरवर्षी फक्त घरट्यात आपला वाढदिवस साजरा करणारे बाबा जीवन शिक्षक आहेत!ज्ञान सावली आहेत!विचारधन आहेत!...ज्ञानी ज्ञान देत असतात!त्यातून शिकून, नवीन घेत..पुढे जाऊया!अशा महान तपस्वीच्या,ज्ञानऋषींच्यां चरणी आपलं डोकं ठेऊया!... आशीर्वाद घेऊया!... आपला वाढदिवस दररोज साजरा व्हावा!आपण शंभर वर्षांहून अधिक वर्षे आम्हाला आशीर्वाद देत रहावा!... हिचं ईश्वरचरणी प्रार्थना आहे!🌷🌷
**************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०२ जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)