MP नं आस्सल सोनं
MPनं आस्सल अहिराणी सोनं
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷
***********************
... नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!राम राम!
एक कविता मव्हरे मांडस... 🌹🙏
"गाडी पयेस मानोस पयेस
लयी पयेस गावेगाव
रस्ता धुंडी धांडी दुन्यांना
गाव काढी ऱ्हायन नाव...!🌹
परवास हाऊ चढ उतरनां
गावं मांघे निंघी जास
याद हिरदम्हा ठिसनी
वार्गी हालकी व्हयी व्हास..!🌹
थंडी वार्गी उनलें ठोकाये
वार्ग कान झोडी जास
मांगलं मांगे ठिसनी
मव्हरे पयेस तासंतास....!🌷
फिरता चाकना फफोटालें
तोंडवर उडायी जास
मव्हरे मव्हरे पयीसनी
उज्जी लायी जास आसं...!🌹
दरोज भी पयी ऱ्हायनु
येची टुची सबद चारा
खंगयी खुंगयी एक करी
मूक्ला वझानां से भारा....!🌹
एक वखतलें बांध वलांडा
घुसनू सोनानी खानम्हा
कव्याजरत वल्ला सबद त्या
मन्हा ऱ्हायी ग्यात ध्यानमा..!"🌹
भाऊंस्वन!कोंती भी वस्तू दखा जठे जे पिकस तठे ती सस्त व्हयी
इकातं ऱ्हास!पिकाडनारा पिकाडतं ऱ्हास!तो पिकाडू ऱ्हास!तो डोकावर धरी इकत फिरत नई!त्याले निस्ता पिकाडानां माव्हरा ऱ्हास!तो
पिकाडागुंता राबत ऱ्हास!मार्केटम्हा
इकावो,नई इकावो.. त्याले काय लेनं देनं नई ऱ्हास!... हायी मातरं खरं से.. सस्तायी व्हयेलंनी किंमत ऱ्हात नई!कोनी उखल्लावर फेकस!कोनी संग्रोह करी ठेवस!कोन उन दखाडी, कोल्ल करी टिकाडी ठेवस!ज्या
टिकाडी ठेवतस त्या मांगला-पुल्ला इचार करतस!जतन करी ठेवतस!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भाऊ-बहिनीस्वन!
मी कालदिन ०२डिसेंबर२०२२नां दिन पिकाडू भूमीम्हा गयथू!अस्सल सोनं पिकाडनारी भूमीम्हा गयथु!आस्सल अहिरणींना खजिना ज्यास्नी जपी ठेयेल से त्या अहिराणी पट्टाम्हा गयथु!आपुन अहिराणीनं दंडार
खटलं म्हनीस्नी धुळे,जळगाव, नंदुरबार,नासिकलें समजी ऱ्हायनुतं! बेंबीनां देठतीन आगाजा करी ऱ्हायनुतं!या च्यार जिल्हासलें अहिरानी भाषानं हुगडं कावड म्हंतंस!अस्सल अहिराणीनं सोनं पिकाडनांरी भूमी म्हंतंस!आपला डोकाम्हा खोट्टं-नाट्टं खुपसेल शिंगवरी,डुरक्या भरी, घोमाली-घामाली खान्देशनी गल्ली मैदान गाजाडी ऱ्हायनुतं!काय तर म्हने,"मधाय-बर्फी,लोनी चोपडेलं अहिराणी भाषा आम्हनाचंकडे बोलतसं!"🌹
"आम्हना आंगे तूप तपी ऱ्हायन!तुम्हनां ताकन्ह कटोरं लयी कथ फिरी ऱ्हायनातं "..या सबद काय
म्हंतंस?.....हावू तद्दनं लुच्चा-लबाडिना आव से!खे से! लांडगानीं वाघनं कातडं पंघंरी समोरलालें भ्यावाडांगंत से!..पन माले ते खरा वाघ तठे दिखना!
सोतानां डोयाघायी दखी-पर्जानी!काने डरकायी आयकी!मन्हा हिरदले खात्री पटावर!.."हावू ते खराखुरा वाघ सें भो!"अहिरानी भाषानां वाघ
खान्देशी भौगोलिक पट्टालें लायी मध्यप्रदेशम्हा डरकाळी फोडी ऱ्हायंता!🌹
मी कालदिन मध्यप्रदेशम्हा पानसेमललें जायेल व्हतु!धाकलं खेडं सें "जयगून"...पानसेमलथून दोन-तीन किलोमीटर व्हयी ते!लगीनलें गयथु!०१तारीखले हायेद व्हती!लगीन काल्दीन ०२डिसेंबरलें व्हतं!खान्देशनां तथांधडें mpनां बडवानीं जिल्हान्हा या गावे सेतस!हाऊ आदिवासी जिल्हा सें!
मायबोली अहिरानी भाषा सें!आनी यव्हारनीं भाषा हिंदी सें!खान्देशम्हा यव्हारनीं भाषा मराठी सें आनी घरघरनी बोली भाषा अहिरानी बोली सें!.. आथा अहिराणीम्हा मराठी
गुच्चूप लायीलायी घुसी जास!तशी तथा हिंदी मूक्ली नई पन बागेबागे, मांगे मांगे डोकं काढी चालतं ऱ्हास !
खेतीया,पानसेमल, दोंडवाडा, आस्वाडं, जयगून, मोयदा
आशा गंजज गावे सेतस!तथानां आदिवासी लोकेस्नी बोली सोडी ते त्यास्नी भाषा अस्सल अहिरानी सें!त्यास्ना घरनीं हायी सरकीना तुपनी अहिरानी भाषा तुम्हले म्हनो कानलें इतली गोड वाटस बस्स आयकत ऱ्हावो!एक एक सबद सोनानां तोलना!मोतीना मोलना!..आशी वाटी ऱ्हायंत अहिराणीनं आस्सल सोनं तठेचं सें!गावे गाव दरवाजाना तोंडे बठेल गोयम्म अहिरानी भाषांनी निरुंगचटक खापरनी पुरणपोयीम्हा चमचा चमचा घी वती निक्खारं हिरदनीं इशय बोलतसं!🌹
वावर,घरं,मया,गल्ली-आल्लीमां हाऊ साखर झिरा व्हायी ऱ्हायंता!मन्हा कान सासुलें सासुलें त्यास्ना मुखे जायी भिडेल व्हतातं!कालदिन ०३ तारीखले अस्सल अहिरानीनं अमृदं
मन्हा काने पी ऱ्हायंतु!माले छाती फुगी अभिमान वाटी ऱ्हायंता!
लगीनलें येलं आंगे पांगेनां खेडास्न अहिराणीनं गनगोत खल्ली आटा- साठानं वाटनं!रंगतनं वाटनं!जीव भावनं वाटनं!कायेजनं वाटनं!अहिराणी मायनां खरा गोडवा आयकागुंता तठेचं ऱ्हायी जावो आसं वाटनं व्हतं!🌹
अहिरानी मायनां आस्सल साज शिनगार तठला भाऊ-बहीन,
जेठा-मोठास्नी त्यास्ना हिरदना तिजोरी नेम्मन जपी ठेयेल सें!गंजज राज रजवाडा उनात आनी ग्यात व्हतीन!भाषावर नांगर,वक्खरं फिरावा व्हयी!तलवार-तोफा चालन्या व्हतीन!बठ्ठासलें सहीन करी
अहिरानी भाषा जित्ती ठेवानारा त्या हजारो वरीस्न्या पिढ्यासलें!त्या हिरा मोतीस्ना पायवर डोकं ठी नमन करस!आनी खान्देशी भाऊभनलें हात जोडी रावानायी करस एक दाव mpम्हा जायीस्नी अहिराणीनं सोनं उकरी दखा!झामली दखा!खंदी चाफली दखा!.. उज्जी चमचम चमकनारां सोनानां आंगे जायी दखा!तठेंग अहिरानी माय येऊ देवावू नई!
मन्हा पाय निंघी नई ऱ्हायंतात!पानसेमल-शिरपूर लाल परी उनी!एसटी उनी बयजबरी पाय व्हडी सीटवर यी बटनू!... दोंडवाडे-.. मालकातर..बोराडीमार्गे शिरपूर उनू!.. आज सक्खाय सव वाजानी शिरपूर-पुणे एसटी धरी परवासम्हाचं अहिरानी मायनं कायेज हुघडी आपला मव्हरे मांड!काय चुकायनं व्हयी ते धाकला समजी कांना डोया करी,माफ करज्यात!🌹
🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
***********************
.... नानाभाऊ माळी
मु.पो.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०३डिसेंबर२०२२
nanabhaumali.blogspot.com
http://bit.ly/
Comments
Post a Comment