१००वर्षांच्या आईस नमनं माझी आई अशीच आहे(भाग -०४)
🌹🎂🌹🎂🌹🎂
१०० वर्षांच्या आईस नमन
💐🎂💐🎂💐🎂💐
माझी आई अशीच आहे
(भाग-०४)
*********************
... नानाभाऊ माळी
शंभर नंबरी सोन्यास दीर्घायुष्य असतं!शुद्ध असतं!सतशील असतं!कसोटीला तोंडं देत तापवून अति शुद्ध झालेलं असतं म्हणून ते noble असतं!कितीही काळ लोटला तरी ते टिकून असतं!गंजून ऱ्हास होत नसतं!म्हणून सोनं २४कॅरेट असतं!तसं माणसाचं दीर्घायुष्य म्हणजे शंभर वर्षांच असतं!शतक महोत्सवी वर्षांचं असतं!आई सोन्यासारखं रूप घेत आज रोजी १००वर्षांची झाली!०१ जानेवारी १९२३ रोजी शंकर-सायतरा या महान आई- वडिलांच्या,या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेणारी "द्रौपदाआई".. आज ०१ जानेवारी २०२३ रोजी १०० वर्षांची झाली!आज आईचा १००वा वाढदिवस आहे!🌹
बंधू-भगिनींनो!जी व्यक्ती आयुष्यभर इतरांसाठी आपलं आयुष्य झिजवत असतें!राबत असतें अशा व्यक्तीसाठी साक्षात परमेश्वर झिजत असतो!राबत असतो!कष्टाला फळं येतात, असं म्हणतात!१० मुलांना जन्म देणारे आमचे आई-वडील!अतिशय कष्टाळू,भाजीपाला डोक्यावर घेऊन, विकून, गुजरान करणारं दाम्पत्य!हात मजुरी करणारे आई-वडील!शेतात मजुरी करून दिवस काढणारे आई-वडील!नंतर तिघे बहीण भावंडाचं निधन झालं!त्यांच्या आयुष्याची दोरी कदाचित वैकुंठा पर्यंत वाढली नसेल!अपूर्ण असेल!देवाघरी गेलेत!सन १९८०च्या गुडीपाडव्याचां सण साजरा करणारं होतो!वडील आजारी पडले!वडलांचं नाव नथूदादा!... दादा आजारी पडले,आजारातूनं उठलेचं नाहीत!त्यातचं त्यांचं निधन झालं!दुःखाचा मोठा डोंगर पार करणारी "आई" दोन मुली आणि पाच मुलांना उभी करणारी "माय"!सुसंगतीचा ध्यास करणारी माय आयुष्यभर मोलमजुरी करत मुलांना उभारी देत जगत राहिली!शिकवत प्रोत्साहन देत राहिली!स्वतः झिजत राहिली!आसवांना डोळ्यातल्या खोल तलावात साठवत राहिली!ओघाळणारे अश्रू लपवत राहिली!....आज आईचा १००वा वाढदिवस आहे!आज आई १०० वर्षांची झाली!कष्टाळू आनंदाचं १०० वर्षांच झालं!आई तुला नमन!🌷
आई संस्कार शिकवीत असतें!सद्गुण देत असतें!सात्विक जीवन शिकवीत असतें!जगणं शिकवीत असतें!आई हाडाचे काडे करत चांगलं तेचं देत राहिली!सतमार्ग दाखवीत,आम्हाला वाईट संगतीपासून अलिप्त ठेवत राहिली!माय आमची देवाहून काकणभर मोठी आहे असं हक्काने सांगतो आहे!देवाची ओळख आईनेचं करून दिली आम्हाला!आई देवस्वरूप का नाही?आई कनवाळू आमची!आई वात्सल्यमूर्ती आमची!दुःख गिळणारी आई!डोळ्यात आसवं जिरवणारी आई!सर्वचं सहन करणारी आई!सर्वांना समान वागणूक आणि न्याय देणारी आई देवस्वरूपचं आहे!..... बंधूनो!... आज आईचा १०० वा वाढदिवस आहे!🌹
बंधू-भगिनींनो!आईस अनेक उपमा दिल्या जातात!...'आकाशाहून विशाल आई!'... 'सागराहून खोल आई'..देव स्वरूप आई'...'आई नावात महाकाव्य सामाविलेली आहेत'... 'गंगा स्वरूप आई'...'वेद स्वरूप आई'...'अमृताचा झरा आई'...
'करुणामयी आई'... 'विशाल सावली आई'... 'तीर्थक्षेत्र आई'... 'चारही धाम आई'.... 'ममता मयी आई'...'पहिला गुरु आई'...'कल्पतरू आई'... 'जीवन धागा आई'... 'तिन्ही जगाच्या 🌷स्वामीची आई'... 'जीवन ज्योती आई'.. 'दुधावरची साय आई'...अशा उपमा दिलेल्या आईला ठाऊक नसेल अशी महान आई असतें!... अशा माझ्या आईचा आज ०१ जानेवारी २०२३ रोजी १००वा वाढदिवस आहे!तुला शतजन्म नव्हे तर जन्मोजन्मी नमन करतो आई!🌹
आई तू असचं का वागत राहिलीस सांग बरं??यातना स्वतः सहन करीत,दुःख लपवीत, फक्त ध्येयानंद वाटत राहिलीस!कधीकोणाशी तुलना नाही!कधी मतभेद नाहीत!!सर्वानां उगवत्या सूर्याचं दर्शन करून देत राहिलीस!अंधार स्वतः पांघरतं राहिलीस!काळीज देत राहिलीस!हृदयातल्या सन्मार्गाच दान देत राहिलीस!आई... तू सुख आणि आनंद आमच्या झोळीत ओतत राहिलीस!स्वतः झिजत राहिलीस!तुला चितरण्यास समुद्राची शाई देखील अपूर्ण होईल आई!....आमची कोरडी खारीक अन सुरकुतलेल्या १०० नंबरी सोन्याचं नाव आहे 'आई'!... आज तुझा १००वा वाढदिवस!आई तू आज शंभर वर्षांची झालीस!... तरीही तूझ्या हृदयातल्या देवघरातून!तूझ्या पवित्र गाभाऱ्यातून 'सर्वांच कल्याण व्हावे' असा ध्यास करीत बसतेस!पहाटे लवकर उठल्यावर आज ही 'धरणी मायला'दोन्ही हात टेकवून,वाकून नमस्कार करतेस!... काय मागत असतेस आई आता?... आई तूझ्या आशिर्वादाची शक्ती आणि भक्ती महान आहे!आम्ही घराबाहेर पडल्यावर,आमच्या जिवाच्या भल्यासाठी आज ही दिवसभर देवाजवळ प्रार्थना करत बसतेस!आई थोर तुझे उपकार!
पुनर्जन्म असेल तर देवाला विनंती करतो, "जन्मोजन्मी याचं मातेच्या पोटी जन्म दे!आम्हास उत्तम संस्कार करून घडवणाऱ्या याचं मातेच्या पोटी जन्म दे!".... तूझ्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्ताने देवास
आर्जंव करतो!विनंती करतो!प्रार्थना करतो..या पुढे .. जोपर्यंत आईचे हात,पाय,मन,बुद्धी, वाचा आणि कान शाबूत आहेत तोवर आयुष्याची प्रदीर्घ दोरी वाढवं देवा!
💐🎂💐🎂💐🎂💐🎂
************************
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
आपणा सर्व आप्त,मित्र, जेष्ठ,हृदयातील स्नेहीजनांना नव वर्षाच्या अनंत शुभेच्छा!.. हे वर्षं सुख,समृद्धी,आरोग्यदायी जावो याचं शुभेच्छा!
💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११९२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०१जानेवारी२०२३
(नववर्षांरंभ)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment