माझी आई तशीच आहे(भाग०३)

माझी आई अशीच आहे
💐💐💐💐💐💐
*******************
       (भाग-०३)
... नानाभाऊ माळी

 आपलं माहेर मागे ठेवून सासरी आलेली ती... नववधू असतें!जन्म माहेरी होतो!बालपण माहेरच्या मातीतं गेलेला!खेळण्या बागडण्यात गेलेला असतो!लग्नानंतर सासरच्या नवीन नात्यांशी हृदयातले धागे जोडतं एकरूप होऊन जाते!तिच्या तळ पायाला चिकटलेली माहेरची माती दिवसागणिक कणाकणानी निघून जायला लागते!नवीन मातीत पायांना सवय व्हायला लागते!नवीन धाग्यांचीं गुफंणं सुरु होते!सासरची माती चिकटायला लागते!डोळ्यातल्या तलावात माहेर बुडवत राहते!आठवणी काळजात कोंबून सासरी एकजीव होत सासरी जाते!घर सांभाळून नवऱ्यासोबत संसार ओढत जन्म मारणाच्या यातना सहन करीत तान्हूल्याची आई होते!तेव्हाच स्त्री खऱ्या अर्थाने बाईची आई होते!नवरा तान्हूल्याचा पिता होतो!🌷

आई-वडील संसारात रमलेले असतात!तान्हूल्या दुडूदुडू चालायला लागतो!बाळाच्या मुखातून आई बाबांचां पुकारा होत रहातो!आईच्या कानी बाळाचा आवाज येत रहातो!ती यशोदा मैया सारखी त्याच्या मागे पळत राहते!घास भरवत राहते अशी ही आई!तिची महती किती अन काय सांगावी?कशी वर्णन करावी?काया झिजवत ब्रम्हाडांचं सुख देणारी आई!आनंद देणारी आई त्याग मूर्ती असतें!

कानावर पडलेला पहिला शब्द  आईचाचं असतो!आई शिकवण अन संस्कार देत असतें!बालपणी सर्वचं नवीन गोष्टींची ओळख आई करून देत असतें!आई विश्व जननी आहे!मातीसारखीचं माता देखील सत्य आहे!आईच्या पदरात जगातील सर्व शास्र समावलेली असतात!ते सर्व शास्र आईच्या चरणावरती वाहिलेली असतात!...आई अशी असतें!आपल्या सर्वांची आई मायेची सावली असतें!जन्म उपकारामुळे विश्वनिर्माता देखील आईच्या चरणांवर माथा टेकवीत असतो!... आई अशी महान अन विशाल असतें!
जन्म देणारे आई वडील श्रेष्ठ असतातचं पण पुढे अनंत उपकाराची  गोड फळं मुलांच्या हातात देऊन जात असतात!🌹

संस्कार आणि संस्कृतीची ओळख करून देणारी आई ईश्वराला प्रिय असतें!निकटची असतें!उत्तम संस्कारबंधनात अडकवणारी आई पहिली शिक्षिका असतें!म्हणूनचं आईशी असणारं नातं जन्मीजंमीच असतं!आईचा बोट सुटता सुटत नाही!पण संस्कारांनी सत्कर्माकडे बोट दाखवीत आई सुस्वप्न दाखवीत असतें!🌹

आईच्या निस्वार्थी सेवा आणि शिकवणीने सुसंस्कारीत झालेलं जीवन आईच्याच चरणी समर्पित करावं!आई वडील सोबत असल्यावर कुठलीही देवळं शोधायची गरज नाही!त्यांच्या रक्ताने दिलेला श्वास अथकपणे चालू असतो!आई तूझ्या पायाची धूळ मस्तकी लावली तरी
काशी, वाराणसी ,गया अशा चार धामाचं पुण्य कमविल्या सारखंचं आहे!..🌹

सर्वचं आई-वडील तीर्थक्षेत्र असतात आपली!जवळ असून आपण दूर दूर शोधित हिंडत असतो!..इथेच त्यांची पूजा श्रद्धेनें करत राहू!.... आई तू इतर सर्व आईंसारखीचं आहेस!हळवी,कोमल,वात्सल्यमूर्ती, त्यागमूर्ती आहेस!.. आई तशीच आहे!माझी आई तशीच आहे!
************************
💐💐💐💐💐💐💐💐
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-३१ डिसेंबर२०२२
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)