माझी आई अशीच आहे
माझी आई अशीच आहे(भाग -०२)
💐💐💐💐💐💐💐
*********************
(भाग-०२)
.... नानाभाऊ माळी
गाव खेड्यात,शहरात सर्वांची आई एक सारखीचं असतें!आई श्रीमंत किंवा गरीब नसते बंधूनो!ती मुळातचं श्रीमंत असतें!हृदयाने श्रीमंत असतें!...कदाचित श्रीमंत बाप असेलही !श्रीमंत मुलगाही असेल!आईचं हृदय श्रीमंतीच्या पलीकडचं असतं!🌹
केवळ आकाशाच्या कागदावर अथांग समुद्राच्या शाईनें तिची श्रीमंती लिहून होत नसते!तिच्या हृदयाचां आकार अतिविशाल असतो!देवादि्कांना ही हेवा वाटावा अशी श्रीमंत असणाऱ्या "आई" सोबत आपण रहात असतो!अनमोल श्रीमंतीच्या हृदयात साक्षात्कारी ईश्वर निवासी असतो!आई फक्त देतचं असतें!आपल्या जन्मापासून देत असतें ती!असलं नसलेलंही देत असतें!आयुष्यभर हृदय सांडणारी आणि मुलं फक्त वेचणारी असतात!
आई स्वतः काळीज रिते करीत राहते!सर्वांचीच आई अशी असतें!
दानपात्र हृदयी घेऊन मुक्त्तहस्ते वाटत राहते!तिला कुठला आला स्वार्थ?मुलांचं भलं व्हावं हाच तिचा स्वार्थ असतो!... बंधू-भगिनींनो माझीही आई अशीच आहे!🌹
मुलं गल्लीत खेळतात,हुंदडतातं!आई घरात असतें!कामात असतें!तिचे कान आणि डोळे सतत आपल्या बाळाकडे लागलेले असतात! बाहेर खेळता खेळता मुलाचा रडण्याचा आवाज कानी पडल्यावर!घरात कामात असलेली आई हातातलं काम सोडून मुलाच्या दिशेने पळत सुटते काळजातून देखील आई पळत असतें!...त्या क्षणी ती घायाळ वाघीणी सारखी दिसते!बछड्याची आई आक्रमक होते! बाळासाठी धावत सूटते!बाळ दिसल्या बरोबर आधी उचलून कुशीत घेते!कुरवाळते!काळजाला लावते!कोणीतरी बाळाला जखमी केलं असेल तर हळहळते!विव्हळते!तळमळते!चवताळल्यागत होते!🌹
बाळाला लागलेलं असेल!रक्तभबांळ झालेला असेल!तिला वाटतं तिचंच रक्त सांडलेलं आहे!... आक्रमक बाळाला जखमी करणाऱ्याच्या अंगावर धावून जाते!भांडायला उभी राहते!काळजाच्या गोळ्यासाठी आई वाघीन होते!असं काय असतं हो आई जवळ एवढं?स्वतःजवळच सर्वचं देत सुटते!थोडा तरी स्वार्थ ठेवावा कि नाही पण कुठला आला स्वार्थ?आई जवळ धगधगत काळीज असतं!पैशात ही श्रीमंती मोजली जाईल? सर्वांचीच आई अशी असतें!बंधूनो माझीही आई अशीच आहे!🌹
आई नावाचं तीर्थ सर्वांना पवित्र करीत सुटतं!निर्मळ,सकारात्मक विचारांचं तीर्थ शिंपडावं!तीर्थ सांडू नये!हृदयातल्या खोल गाभाऱ्यात नेऊन ठेवावं!मनोभावे वंदन करीत दररोज या दैवताची पूजा करीत राहावी!आईचं हृदय अतिशय कोमल असतं!अतिशय विशाल असतं!तिच्या विशाल हृदयाचा दैवी साक्षात्कार बालपणी क्षणोक्षणी येत रहातो!आई बाळाला न्हाऊ,धोऊ घालून छोट्याशा पाळण्यात टाकते!अजूनही खेड्यापाड्यात घरातल्या दोन्ही खांबानां दोर बांधून ऊबदार गोधडीचीं झोळीतं बाळ इकडून तिकडे झोक्यात येर झाऱ्या करीत असतं!झोका हलविण्यासाठी एक दोरी मागे पुढे ओढून आई अंगाई गीत गात असतें!तिच्या आवाजाचां गोडवा कानी पडत असतो!बाळ काही क्षणात झोपून जातं!वात्सल्यरुपी आई दैवी रूपात घरात निवासाला असतें!...सर्वांचीच आई देवाचं प्रतिरूप असते हो!...बंधू -भगिनींनो माझीही आई नेमकी तशीच आहे!🌷
लहानपणी आम्ही दोन्ही भावंड भांडत होतो!मारामाऱ्या करीत होतो!आई घरातून बाहेर आली!पहाते तर गल्लीत मुलं भांडताहेत!आई आमचं भांडण बघून काही क्षण आमच्याकडे बघत राहिली!अश्रू गाळीत राहिली! आईने अचानक कोपऱ्यातली काठी उचलली,घरात गेली!स्वतःच्याच अंगावर काठीने मारू लागली!ते पाहून आम्ही भावंड हतबल झालो!भांडण मारामाऱ्या संपवून आईच्या पायांवर डोकं ठेवून माफी मागितली!शिकवण देणारी आई वंदनीय आहे!..आई अशी असतें!मनोभावे तिची सेवा केली, तिचं ऐकलं तर महापूण्य आपल्या झोळीत पडत असतं!... माझी आई अशीच आहे!
************************
💐💐💐💐💐💐💐💐
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३०डिसेंबर२०२२
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment