खेळातून राष्ट्रभक्तीची उभारणी

खेळातून राष्ट्रशक्तीचीं उभारणी
************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी 

बंधू-भगिनींनो!
खेळ शरीर तंदुरुस्तीची ओळख असतें!खेळ माणूस जोडण्याचं माध्यम असतं!खेळ समाज,देश
एकजूट करण्यासाठी किमयागार असतो!खेळातून खिलाडूवृत्ती जन्म घेतं असतें!sportsmanship माणसाला कित्येकदा अवघड निर्णय घेतांना साह्यकारी ठरत असतें!... प्रत्येक माणसातील खिलाडूवृत्ती उद्भवणाऱ्या समस्यावंर उपाय
शोधित असते!आपलं जीवन खिलाडूवृतीचं अभिन्न अंग असतं!माणूस माणसाशी माणसासारखा वागला पाहिजे!खेळात निकोप स्पर्धा असतें!जिंकायची जिद्द असतें!मात्र त्यात ईर्षा नसते!चूक धाडसाने मान्य करण्याची प्रवृत्ती तयार होत असतें!

खेळ आनंद देत असतो!खेळ मैत्री बनवत असतो!खेळातून माणसं माणसात पेहरता येतात!माणसं जिंकता येतात!माणसं कळू लागतात!खेळ व्यक्तींची ओळख होते!खेळण्यातून जिज्ञासूवृत्ती प्रबळ होत असतें!त्यातून नवीन कल्पनांचीं सिडी भेटते!सीडीवर चढून अदृश्य ते पाहू शकतो!.. म्हणून खेळ योग साधनेचं उत्तम माध्यम आहे!मंनचक्षुतून दिव्य प्रभात तेवत असतें!

खेळ मन शुद्धीच उत्तम औषधं असतं!खेळ शरीर तंदुरुस्तीचां गुरु असतो!खेळ आत्मइंद्रियांना जागृत करीत असतो!बालपणापासून खेळाची आवड असल्यावर निकोप समाजाची उभारणी होत असतें!राज्य आणि देश प्रगतीपथावर जात असतात!खेळामुळे व्यक्तीसोबतच देशाचीं विशिष्ट ओळख निर्माण होत असते!खेळ शाळेत शिकविले जातात!शाळा उत्तम बाळकडू पाजून चांगले खेळाडू राज्य आणि देशाच्या स्वाधीन करीत असतात!शाळेतील शिक्षक कला गुणांना प्रोत्साहन देत खेळाडू घडवीत असतात!शिक्षक मेहनत घेऊन बलशाली भारतास खेळाडू प्रदान करीत असतात!नावलौकिक कमावून मुलं उज्वल भवितव्याकडे वाटचाल करीत राहातात!🌹

बंधू भगिनींनो!शाळा आणि
महाविद्यालय खेळाला प्राधान्य देत उत्तम खेळाडू घडवीत आहेत!पुण्यातल्या हडपसर येथील 'महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या' विविध २५ शाळा आहेत!त्या अंतर्गत पुण्यातल्या भोसरी येथील 'श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलमध्ये' दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी विविध खेळांचे आयोजन केले गेले हॊते!संस्थेचे संस्थापक आदरणीय रतन माळी,अध्यक्षा सौ.स्मिताताई वाघ, सचिव प्राचार्य रवींद्रजी वाघ सर तसेच संस्थेचें सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक योगदानामुळे या खेलकुदच आयोजन झालं होत!

खेळाडू घडत असतात!मनाने,तनानें बुद्धिमत्तेनें सुदृढ विद्यार्थी घडत असतात!तयार होत असतात!विद्यार्थ्यांमध्ये खेळातून खिलाडूवृत्ती शिकविणारी 'महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था' ही उत्तम खेळाडू घडवत आहे!आदर्श समाज घडवीत आहे!🌹

खेळाडू मैत्रीचं आमंत्रण घेऊन हिंडत असतो!अशा अनेक खेळांचं औपचारिक उदघाटन दिनांक २६डिसेंबर रोजी अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले!खेळामुळे उत्साह आणि प्रसन्नता टिकून राहते असं अनेक मान्यवरांनी प्रतिपादन केले!.. कार्यक्रमाचं उदघाटन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे माजी शिक्षण मंडळ सभापती श्री.विजयजी लोखंडे साहेब,माजी स्थायी समिती चेअरमन  तथा नगरसेवक श्री संतोष आण्णा लोंढे,पिंपरी-चिंचवड शहर महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष श्री पी.के.महाजन साहेब,उपाध्यक्ष श्री नकुल महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले! 🌹

रक्त शुद्ध करणारा खेळ नेहमीच शुद्ध विचारांना जन्म देत असतो!मानसिक तंदुरुस्तीतून शारीरिक ऊर्जेचीं निर्मिती होत असतें!सुदृढ शरीरामुळे प्रेम जिव्हाळा टिकवून रहातो!खेळ उपासना आहे!खेळ मेहनत आहे!खेळ जीवन जगण्याची किल्ली आहे!... आपण खेळातून शिकत राहू!सुदृढ व्यक्तिमत्वातून बालशाली राष्ट्र बनवू!प्रगतीकडे वाटचाल सुरु ठेवू!आपल्या शक्तीचीं साठवण करून ठेऊ!राष्ट्र उभारणीस खेळातील ऊर्जा वापरत राहू!जय हिंद!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२७ डिसेंबर २०२२
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol