कल्याणची साखर गडानेवाटली
कल्याणची साखर गडाने वाटली
*************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
....नानाभाऊ माळी
नमस्कार!बंधू-भगिनींनो!
किल्ला आणि गड म्हटले की शौर्याची आठवण होते!अंगात शूरवीरांची शक्ती संचारते!पराक्रमाचा इतिहास डोळ्यातून हृदयात जाऊन बसतो!महान योध्याचां पराक्रम आपली स्फूर्तीस्थान बनून जातं!त्यांचा त्याग अन बलिदान संपूर्ण समाजाला प्रेरणादायी असतं!शिकवण असतें!
"चला जाऊया किल्ल्यावर"....किती सुंदर संकल्पना आहे!!... हे वाक्य साहसी वृत्तीचं प्रतीक आहे!.. या संकल्पनेला जन्म देणारे सदगृहस्थ निश्चितच निधडया छातीचा असावा!धाडशी वृतीचा असावा!संयमी पण करारी असावा!शिस्तीचां भोक्ता असावा!लोकांच्यामध्ये धाडसवृत्ती निर्माण व्हावी म्हणून मार्गदर्शक असावालं!..... हो बंधूनो!ते स्वतः एरफोर्सचें सेवानिवृत्त अधिकारी आहेत!नंतर महाराष्ट्र शासनात
अपारंपारारीक ऊर्जा खात्यात अधिकारी होते!सर्वोच्चपद भूषविणारा व्यक्ती शिस्तप्रिय असणारचं!आई वडिलांचे संस्कार आणि इमानदारीने काम करणारा व्यक्ती काही विशेष स्वप्न घेऊन जगणारे असतात!राष्ट्रभक्तीने प्रेरित असणाऱ्या व्यक्ती समाज प्रबोधनकारी असतात!...त्या शिस्तप्रिय गुरुजनांचे नाव आहे..... आदरणीय श्री. वसंतराव वेडू बागूल सर!लोकांच्यामध्ये नावीन्यपूर्ण धाडसाला चेतविण्याचे महान कार्य बागूल सर करीत आहेत!🌹
श्री बागूल सरांनी जन्म दिलेल्या
अपत्यांचं नाव आहे.... "चला जाऊ किल्ल्यावर!".... हे नाव आरोग्याची काळजी घेतं!शरीर तंदुरुस्तीची काळजी घेतं!लोक समूहाला जन्म देतं!समाजाच्या आरोग्याची काळजी घेतं!समाज तंदुरुस्त रहावा म्हणून म्हणून देशप्रेमी,समाजप्रेमी बागूल सरांनी लोकांना प्रेरित करीत गड- किल्ल्यांवर घेऊन जातं आहेत!गड-किल्ल्यांचा इतिहास सांगत आहेत!राजे छत्रपती शिवरायांच्या महान कार्याची,पुरुषार्थाचीं!कर्तृत्वाची!राज्यकारभाराची नावीन्यपूर्ण पद्धतीने ओळख करून देत आहेत!.... माध्यम आहे.."चला जाऊया किल्ल्यांवर!"..🌹
बंधू-भगिनींनो!आज दिनांक २५डिसेंबर!रविवारचा दिवस!महिना अखेर,वर्षाअखेरचां रविवार!अनेक घटनांचीं नोंद असणारा रविवार!...अनेकदा संधी येऊनही जाता आलं नव्हतं!पण आज रोजी ती संधी आदरणीय बागूल साहेबांनी दिली!.. आज रोजी "चला जाऊया किल्ल्यांवर"या उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील किन्हई-वाठार दरम्यान असणाऱ्या कल्ल्यान गड आणि साखरगडावर जाऊन आलो!
पुण्याहून जवळपास १२० किलोमीटर अंतरावर जेजुरी-नीरा मार्गे साताऱ्याच्या वाठार जवळ असणारा कल्ल्याण गड खूप उंचावर आहे!चालतं जातांना साधारण तीन तास येऊन जाऊन वेळ लागतो!वेड्या वाकडया,नागमोडी रस्त्याने जातांना आपली परीक्षा बघतो!चालतांना छत्रपती शिवरायांचा आणि जय भवांनीचा जय घोष करीत भगवा झेंडा फडकवत,थकवा न येता गडावर पोहचलो!गड सर 🙏करण्यातला आनंद समाधान देणारा होता!उत्साह वाढविणारा होता!साधारण कमीत कमी तीन वर्षं वयापुसून ते वयाची ७८-७९वर्षं गाठलेली जेष्ठ महिला आणि पुरुष होते!एकूण संख्या ९०च्या वर होती!
एकजूट!एकजीनसीपणा!वेळेच नियोजन अशा सर्व बाबतीत परिपूर्ण आलेले असलेले आदरणीय बागूल साहेब आणि त्यांचे अनेक जेष्ठ सहकार्यांना मनापासून दाद द्यावीशी वाटते!आपण कार्यकुशल सहल आयोजक आहात!मॅनेजमेंट गुरु आहात!.. असो!... गडावर गेल्यावर एक गुहा आहे!साधारण पन्नासएक मिटर लांब आणि उंची ४फुटांपासून ७ फुटांपर्यंत आहे!चालतांना थंडगार गुडघा भर पाणी गुहेत आहे!गुहेत तीन मुखी दत्त महाराजांची मूर्ती बसवलेली आहे!गुहेतून बाहेर आल्यावर पुन्हा पायऱ्या चढत वर गेलो!वरती सपाट पठार होत!
पठारावरं खोल बारव(साधारण ३०फूट व्यासाची विहीर) पाण्याने भरलेली दिसली!वरून हिरवंगार शेवाळ आपलं अस्तित्व दाखवत होत!शेजारीच कल्याणस्वामी महाराजांचीं समाधी दिसली!.. बाजूला गणपती आणि गोरक्ष महाराजांचं मंदिर दिसलं!तेथून पाठरावरील फड फड कणारा झेंडा किल्ल्याची ओळख करून देत होता!
कित्येक वर्षं मागे निघून गेलीत!किल्ला जागेवरच अनेक पिढ्यांचा वारसा घेऊन उभा आहे!पडका होत होत ढसाळत उभा आहे!पिढ्या येतील जातील!मानवाचं आयुष्य असतं तरी किती???कल्याण गडाच्या गत इतिहास अन स्मृती हृदयात एकत्रित ठेवल्या अन खाली उतरलो!जेष्ठ मंडळी सर्वांना स्फूर्ती देत होते!आम्ही जय घोष करीत गडाच्या पायथ्याशी आलो!उत्तम जेवणाचा आस्वाद घेतं पुन्हा
बसमध्ये बसलो अन साखर गडाकडे प्रयाण केलं!कल्याण गडापासून अवघ्या १०-१२किलोमीटरवर असलेल्या साखर गड म्हणजे शिल्पकलेचा अतिशय सुरेख नमुना आहे!unesco मध्ये प्राचीन शिल्प कलेचा गौरव झालेला साखर गडावर देवी अंबाबाईच मंदिर आहे!भक्तांच्या नावासाला पावणारी माता आंबाबाई श्रद्धेचं,भक्तीचं ठिकाण आहे!संपूर्ण दगडात बांधलेला साखरगड माणसाला तेथील भव्य वैभवशाली
शिल्पकलेंच्या मोहात पडल्या शिवाय रहात नाही!देवी अंबाबाईच
श्रद्धापूर्वक दर्शन घेतलं!विस्मयकारक,अप्रतिम वैभवाचं मनःपूर्वक दर्शन घेतं कल्याणचीं साखरगडावर वाटीत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो!.. जीवनातील अजून एक ठेवा पुन्हा हृदयाच्या खोल कप्प्यात श्रद्धापूर्वक बंदिस्त करीत पुण्याच्या परतीच्या प्रवासाला निघालो!🪷🪷💐
जीवनात प्रत्येकाने आपल्या इतिहास कालीन शक्ती स्थलांचा अभिमान बाळगला पाहिजे!जीवन परिपूर्णतःकडे घेऊन जायला हवे!मी आभार मानतो आदरणीय श्री बागूल साहेबांचा!त्यांच्या टिमचा!त्यांच्या टिम spirit चां!..."चला जाऊया गड किल्ल्यांचा"... आभार!..
आपल्यामुळे नवीन दृष्टी प्राप्त झाली!नवीन नजर आली!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२५ डिसेंबर२०२२
Comments
Post a Comment