प्रसिद्धीची हाव
#पुष्प_१७वे!...
🌹#प्रसिद्धीची_हाव🌹
***********
....#नानाभाऊ_माळी
बंधू-भगिनींनो!🌹
कार्य कर्तृत्वाच्या सिद्धीसाठी प्राचीन काळापासून मनुष्य धडपडत आहे!सिद्धी प्राप्ती नंतर जगाच्या पाठीवर ही बाब पोहचवली गेली असेल!त्यासाठी माध्यम म्हणून बऱ्याच साधनांचा वापर केला गेला असेल!संवेदनानां पंख फुटले असतील आणि वाहत्या पाण्यागत!वाहत्या वाऱ्यागत मनाची अस्वस्थता एका पासून दुसऱ्या पर्यंत पोहचवंली गेली असेल!..कार्यकर्तृत्वाचा प्रचार प्रसार झाला असेल!जाहिरात केली गेली असेल!🌹
गावाच्या वेशीवर कधी ढोल बडवून तर कधी घंटानाद करून जागरण झाले असेल!पूर्वी लखोटाच्या मध्यमातून माहिती पोहचवली गेली असेल!तंत्रज्ञानासोबत वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमातून आपल्या गुणांची माहिती पुरवली गेली असेल!जाहीरात करून लोकसंग्रह वाढत गेला असेल! लोकांच्या माहितीसाठी कार्यवृत्तांत पोहचवला गेला असेल!आता सोशल मेडियाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे!मला वाटतं त्याला प्रसिद्धी म्हणावं!🌹
प्रसिद्धी मनातली महत्वाकांक्षा असते!भूक असते!तिची हाव असते!प्रसिद्धी गाजराची पुंगी असते!प्रसिद्धी कामिनी असते!प्रसिद्धी स्वप्नातील दामिनी असते!प्रसिद्धी मोहिनी असते!भुलभुलैया असते!खुणावत असते महत्त्वाकांक्षेसाठी!प्रसिद्धी लोभसवाणे हसत असते!कधी मनोभंग झालाचं तर रडवीत ही असते!🌹
प्रसिद्धी मोहमाया असते!ती खुणावत असते मधहोशीसाठी!डीवचित असते मनाला कधी बिळातली नागीण बनून!दुष्कृत्यावर पांघरून घालून कधी दुर्गुणांच्या पडद्याआड बेगडी जाहीरात बाजी करून प्रसिद्धी नाचवीत असते माणसाला!कधी सद्गुणांची पाठराखण देखील करीत असते!पाप चव्हाट्यावर आणत असते!प्रसिद्धी नाचवत असते तिच्याच तालावर माणसाला!
प्रसिद्धीच्या झोतात कित्येक माणसं झोकात उंचशिखरावर पोहचलेली आपण पाहिली आहेत!अतिमहत्वाकांक्षेने हवेत उडणारे!तरंगणारे कुप्रसिद्धीने जमिनीवर सुद्धा आदळले आहेत!इतिहास साक्षी आहे त्याचा!🌹
प्रसिद्धी चंचल असते!कधी-कधी प्रसिद्धी डोळे बंद करून बसलेली असतें मांजरागत शिकारीसाठी!गुणवाणाकडेही डोळे झाक करीत असते!त्यांच्या कर्तुत्वाला नजरंअंदाज करीत असते!तिसरा डोळा सत्याचा घट्ट बंद करून ठेवत असते कधी कधी! अनितीची काळीकुट्ट कारस्थाने जिंकणारे देखील दिसतात प्रसिद्धीच्या आड!🌹
काही भामटे प्रसिद्धीच्या वलयांकित परीघात हळूचं शिरतात!स्वतःचीच पोळी भाजतात!प्रसिद्धी मग त्यांच्या भोवतीच फिरत राहते!कधी त्यांच्या पायाची दासी होते!जेव्हा दासी होते तेव्हा आदर्श मूल्यांचा ऱ्हास होऊ लागतो!काळी बाजू झाकत अर्थरूपाने त्याच्या संगे कॅमेरा होऊन भटकत राहते!आदर्श तत्वांची पायमल्ली होत रहाते!तेथेच अनितीची विषारी फळ यायला लागतात!ही फळ बेमालूमपणे जनतेतं वाटली जातात!समाज बधिरतेकडे वाटचाल करतो!अशा वेळेस मूल्यांचा ऱ्हास होत जातो!🌹
कधी-कधी प्रसिद्धी बळासमोर हतबल होऊन अवगुणांचाचं प्रसार करत बसते!असाहयपणे हसत बसते!अशा वेळेस सत्य पराजित होत राहत!असत्याचा विजय होत जातो!खोट्या स्तुती सुमनांनी माणसाला आंधळे बनवीत असते!सत्तांध बनवीत असते!मूल्यहीन,आदर्शहीन व्यक्ती समाजाचा आरसा बनतात!त्या आरशात स्वतःच स्वतःला शोधत बसतात!आतल्या आत मस्तीत जगतात!सत्तेच्या धुंदीत इतरांना तुडवीत बसतात!प्रसिद्धी त्यांच्या हातातील बाहुले बनते!अगतिक आंधळी प्रसिद्धी मग सत्याचा आरसा फोडू शकत नाही!….प्रसिद्धीच्याचं मधहोशीत जगणारे हळूहळू परीघाबाहेर पडलेले दिसतात!🌹
....अशा वेळेस एखादा सत्पुरुष जन्माला येत असतो!अनितीची सडलेली पानं,मुळे उपटून फेकून देत असतो!प्रसिद्धी खाडकन शुद्धीवर येत असतें!सज्जनांच्या भोवती फेर धरीत सत्याचा विजय घडवून आणत असते!🌷
बंधू-भगिनींनो!
प्रसिद्धी असते तरी काय?तर स्वहित साधून कर्तृत्वाची जाहीरात करणे!मार्ग अनेक असतात!वर पासून तळागाळाच्या लोकांच्या मनांवर बिंबविणे! माणसं त्या कृतीचा गुलाम होणे किंवा पाठीराखे होणे!हे त्यांच्या जाहिरातीचं फळ असत!त्यातून प्रसिद्धी प्राप्त होत असते!अशी विचारसरणी हव्यासी,लोभी, सत्ता पिपासू असते!अवगुणांचं प्रदर्शन करत बसते!व्यक्ती छद्मी हसते!प्रसिद्धी त्यांच्या तिजोरीत जावून बसते!🌹
बंधू-भगिनींनो!
माणूस बदलला!गरजेनुसार त्याच्या जीवनातं आमूलाग्र बदल घडत गेला!अधिकारशाहीचं तंत्रज्ञान विकसित झालं!बळी तो कान पिळी या न्यायाप्रमाणे मनुष्य राज्य करू लागला असावा!बळ असलेल्याची!ताकद असलेल्याची वाच्यता जनमानसात झाली असेल! राज दरबार भरवून कार्यवाच्यता पोहचती केली जात असावी!...अर्थात आपल्या शक्तीची प्रसिद्धी व्हावी हाच उद्धेश असावा कावेबाज व्यक्तींचा!🌹🌷
कार्याची जाहिरातबाजी करणे म्हणजेचं प्रसिद्धी म्हणूया!काहीजन प्रसिद्धी लालसेपोटी करतात!हव्यासातून प्रसिद्धी मिळवतात!🌹
काहींचं कर्तृत्व मात्र आकाशा एवढं विशाल असतं!त्यांच्या कार्यात कार्यमग्न असतात!त्यांना प्रसिद्धीची गरजचं नसते!वेळ ही नसतो!त्यांचं कार्य कर्तृत्वचं सिद्ध करून सांगत असतं!ते महान असतात!ते मुळातचं प्रसिद्ध असतात!🌹
काळ बदलत गेला! माहिती तंत्रज्ञानाचे प्रवेशद्वार उघडले गेले!सत्ताकेंद्रित युगाची सुरुवात झाली!...माणसाच्या चांगल्या आणि वाईटाची देखील माहिती पुरविली जाऊ लागली!कर्तृत्व चांगले किंवा वाईट असेलही पण मानवी मनावर अधिराज्य करणाऱ्या बातम्या मनावर राज्य करू लागल्या!कधी एकांगी बातम्या कानावर येवू लागल्या! ती चवीने वाचली जावू लागली!ऐकली जाऊ लागली!चढाओढीतं मूल्यांचं घुसळण सुरू झाले!वर्चस्ववादातून सत्याचा अंश शोधणे कठीण जाऊ लागले असेल!प्रसिद्धीची वार्ता लोकमनावर आदळू लागली असेल!तोच तोच पणाचा सत्ताकेंद्रित स्तुती सुमनांचा वर्षाव त्या व्यक्तींवर होऊ लागला असेल!ताकदीची!शक्तीची शर्यत सुरू झाली असावी!सत्ता,संपत्ती,अन प्रसिद्धीच्या हव्यासातून!बळातून! प्रकाशझोत स्वतःकडे वळलेल्या व्यक्ती अवगुणांचा प्रसारक बनत असतात!🌺
बंधू-भगिनींनो!
प्राचीन काळापासून रावण,कंस, शकुनी वैगरे व्यक्तिरेखा अवगुणांचे द्योतक होती!माहितीतून माहिती काढत गेल्यावर प्रसिद्धी झोतात आलेले अनेक गुणवान व्यक्तिमत्व सुद्धा होवून गेले!या महामानवांना विचार धारा बदलण्याचा ध्यास होता!सद्गुणांचा प्रचार करायचा चंग बांधला होता!कदाचित अजून ही अशा व्यक्तींमुळेच सत्व टिकून आहे!या महामानवांनां मानवी मनात दबलेला अगतिकतेचा!गुलामीचा प्रचंड स्फोट बाहेर काढायचा होता!सगुणांचा प्रसार करायचा होता!सद्गुणांची पेहरणी करायची होती!शाश्वत सतमूल्य जतन करायची होती!लोक समूहातून लोकांपर्यंत पोहचायाचं होत!🌹
बंधू-भगिनींनो!
विश्वास आणि श्रद्धेतून जीवन शाश्वती बहाल करायची ओढ महान व्यक्तींच्या अंगी बनलेली होती! म्हणून जनसामान्यांना एकत्र करून सामूहाचे नेतृत्व करून,समूहापर्यंत जीवन मूल्य रुजवयाची होती!त्यासाठी थेट तळागाळात काम करणाऱ्या अशा व्यक्तित्वाला जाहिरातीची गरज पडली नसेल!ते महापुरुष मुळातच प्रसिद्धी शिखरावर होते !लोकांना आदरणीय होते!🌹
प्रसिद्धी शिखरावरील स्वयंप्रकाशित महापरमात्मे श्रीराम,श्रीकृष्ण,गौतमबुद्ध,महावीर,गुरुनानकदेवांसारखे तेजस्वी सूर्य लोकसमूहाचे अढळ श्रध्दास्थान बनत गेले!त्यांना सुदृढ मानव समाजाच्या उत्थापनाचा ध्यास होता!मुळातचं ते वलयांकित होते!प्रसिद्धी त्यांच्या पुढे-मागे फिरत होती!जनमानसावर त्यांचे उद्धारक म्हणून प्रतिमा होती आणि आज ही आहे!त्यांची पाऊले प्रसिद्धीच्याही पुढे होती!मानव कल्याण सिद्धी घेऊन आलेले ते प्रसिद्ध परमात्मे आहेत!प्रवाहाच्या विरुद्ध जावून प्रसिद्धी पासून लांब असलेले महान व्यक्ती चिंतनात्मक संदेश देत असतात!
बंधू-भगिनींनो!
पृथ्वीवरील मानवप्राणी अन्न,वस्त्र आणि निवारा सारख्या प्राथमिक गरजा भागविण्याच्या नादात, हव्यास जन्माला आल्याने त्यांच्यात स्पर्धा वाढली असावी!स्पर्धेतून सत्ता बळकावली जाऊ लागली!जेत्याच्या प्रचंड ताकदीची दहशत जनमानसावर उमटल्याने 'जेता' प्रसिद्धी झोतात आला असावा!अशी काही उदाहरणे जगाच्या पाठीवर घडलेली आहेत!..ती कुप्रसिद्ध म्हणून गणले जाऊ लागले!ती त्यांची शापित प्रसिद्धी होती!प्रसिद्धी कधी वरदान असते तर कधी शापित देखील असते!🌹
कर्तृत्ववान माणसाचं लक्ष मानव कल्याणातचं गर्क असतं!
ते प्रसिद्धीच्या मोहात कधी अडकत नसतात!
हव्यासी माणसाच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरलेली असते!त्याची ती नशा कधी-कधी जमिनीवर ओढून आणत असते!अन स्वतःचाचं कपाळ मोक्ष करते!प्रसिद्धी त्याच्यापासून कित्येक किलोमिटर दूर जाते!
अनेक खेळाडू!कलाकार!राजकीय नेते,अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत व्यक्ती असतील!..विशिष्ट पदावर पोहचण्यासाठी प्रचंड चढाओढीतून!स्पर्धेतून पुढे यशशिखरावर पोहचलेले असतात!ते स्थान टिकवण्यासाठी आपल्या गुणांचं सातत्य टिकवून ठेवावं लागतं असतं!ते स्थान प्राप्त झाल्यावर प्रसिद्धी मिळालेली असते!प्रसिद्धीच्या मोहात अडकल्यावर आपल्यातील कार्यगुणांना वाव मिळत नाही!..प्रसिद्धीच्या पुरात अशा व्यक्ती पूर्णतः व्हावून गेलेल्या आहेत!प्रसिद्धीच्या महापुरात जो अढळ राहील!सात्विक राहील तोच टिकून राहील!कुठलं ही स्थान अढळ नसतं!यश टिकवून ठेवता आलं पाहिजे!यशाची नशा असावीचं!यश साजरे करताना जनमानसांचा आदर राखला गेला पाहिजे!🌹
माणूस प्रसिद्धी शिवाय जगूचं शकत नाही!हे मोहजाळ आहे! माणसाला घडवत असतं!चढवत असतं!अस्मान ही दाखवत असतं!प्रसिद्धी कधी प्रेमिका होते!जिवापाड प्रेम करते! तिच्या वलयात वावरणारे संयमाने वागले तर सोबत असते!बेईमान झाला तर अद्दल घडविते!प्रसिद्धी मनाला सुखद धक्का ही देत असते!!ती हवीहवीशी वाटते!प्रसिद्धी लडिवाळ प्रेमिका असते! सद्गुणांची सहचारिणी सुद्धा असंते!प्रसिद्धी जनमुखात असेल तर व्यक्ती विश्वपरीचीत होतो!खरं म्हटलं तर ती एक नशा आहे!चढली की लवकर खाली येत नसते!उतरत नसते!....मनुष्य तिचाच गुलाम होतो आणि तिच्या अडून दुष्कृत्य करायला लागतो!
प्रसिद्धीपासून अंतर ठेवणारा योग्य नाय देत असतो!ती व्यक्ती समाज मान्य होते!हव्यासापोटी प्रसिद्धी मिळवणारा आपलं स्थान टिकवून ठेवू शकत नाही!प्रसिद्धी गुणवान आहे!रूपवान आहे!तिच्यात अति गुरफटला की ऱ्हासाचे दार उघडले जात असते!स्पर्धक आयताच भेटत असतो!
प्रसिद्धीच्या मोहात जास्त न अडकता दिलेले कार्य मन ओतून करीत रहाणे याच्यासारखे सुख नाही!समाधान नाही!🌹...
बंधूंनो!..पुन्हा भेटूया पुढील पुष्पासोबत!तोपर्यंत नमस्कार!
🌹*******🌹
.....#नानाभाऊ_माळी
लेखक, कवी
#साहित्यसम्राट
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६/
९९२३०७६५००🌺🌷
दिनांक-२०डिसेंबर२०२०
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment