सुधारक संत गाडगे महाराज
सुधारक संत गाडगे महाराज
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
... नानाभाऊ माळी
नमस्कार बंधू-भगिनींनो!
थोराचं थोरपण त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असतं!त्यांचं आयुष्य मानव समाजाच्या उद्धारासाठीचं असतं!त्यांचं जगणं मानव कल्याणासाठीचं असतं!झिजून झिजून चंदन उगळत असतं!आपला देह झिजून आयुष्य सुहासिक होऊन गेलं असतं!महात्म्यांचं पावित्र्याहून श्रेष्ठ असतं!तेचं संत होतात!तेचं महापुरुष होतात!तेचं श्रद्धास्थान होतात!🌷
संत निर्गुण सेवक असतात!संत सगुण मार्ग वाटाड्या होतात!संत मार्गदर्शक असतात!समाजाचां उजेड होतात!जगण्याची आसं होतात!भवसागरातील नाव होतात!उन्हाची सावली होतात!संत देवदर्शनाचा
हमरस्ता होतात!संत दुःखीतांचां आधार होतात!🌷
संत सामान्यांचें प्रेरणास्रोत असतात!कधी सात्विक वृत्तीचां अमृतकलश होतात!सद्गुणांचा जागर करीत तिमिराला पिटाळीत असतात!म्हणून संत श्रेष्ठ असतात!देव आणि
दुःखीतांसाठी सेतू होतात!अशा संतांच्या पायावर लीन होत माथा टेकवायचा असतो!संत शब्दामृतातून समाज घडवीत असतात!आपल्या अवीट गोड वाणीतून ज्ञान वर्षाव करीत असतात!शब्दवचन अन कृतीतून निस्सीम तेजपुंज होतात!..गाडगेबाबा समाज सुधारक संत होते!🌷
सदगुणांचा जागर आपल्या कृतीतून आचरणातून समाज प्रबोधन करणाऱ्यां महान आत्म्यांना संत म्हणत असतात!दीन-दुरितांचे तिमिर दूर लोटणारे संत गाडगेबाबा प्रबोधनकार होते! खापराचां, गाडग्याचां तुकडा डोक्यावर!फाटक्या चिंध्या अंगावर!हातात झाडू घेऊन गावं स्वच्छ करणारे विज्ञानवादी संत गाडगेबाबा होते!अंधश्रद्धेचां कडाडून विरोध करणारे,स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे संत गाडगेबाबा होते!बुरसटलेल्या चालीरितीनां विरोध करून वैज्ञानिक तथ्य सांगणारें प्रबोधनकार संत गाडगेबाबा आयुष्यभर समाज जागृती करीत राहिले!🌹
०३फेब्रुवारी १८७६ साली अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील छोटयाशा शेंडगावात जन्मणारा "डेबू" स्वछता,अंधश्रद्धा,व्यसनमुक्तीसाठी निर्मळ सेवेतून संपूर्ण आयुष्य समर्पित करतो!गोर गरिबांची सेवा, दीनदलितांची सेवा करीत या महापुरुषाने महात्म्यपद मिळवले!गावोगावी भजन कीर्तनातून जन सामान्यांचं जगणं सुकर केलं!या महात्म्याने घरदार सोडले!संपूर्ण मानव समाज हेचं कुटुंब समजून लोक वर्गणीतून अनेक गावात धर्मशाळा,वस्तीगृह बांधली!स्वतः मात्र आयुष्यभर अंगावर फाटक्या चिंध्या लेवून जगत राहिले!कोकणात कीर्तन करीत असतांना स्वतःच्या मुलाचं निधन झाले तरी घरी जाऊ नाही शकले!.. कारण त्यांना लाखोंचा संसार उभा करायचा होता!
संत समाज जागृतीतून दिशा देत असतात!कीर्तनातून प्रबोधन करीत संत गाडगेबाबा यांनी आरोग्याशी संबंधित स्वच्छतेतून जन जागृती निर्माण केली होती!धर्मशाळा आणि वसतिगृह बांधून निराधारांनां आधार दिला!🌷
संत जन्म घेऊन मानव कल्याण करीत समाजाला ज्ञानडोळा देऊन जात असतात!गाडगेबाबा या भूमीवर सदाचार पेहरीत निघून गेले!दिनांक २०डिसेंबर १९५६ रोजी या
महात्म्याने आपला देह या भूमीस अर्पण केला!संस्कार,त्याग,समर्पण वृत्तीचा महान संत स्वच्छतेचा मंत्र देऊन गेला!आयुष्यभर असलेलं ते सर्वचं दान देत राहिला!अंगावर फाटक्या चिंध्या लेवून जगत राहिला!अशा संत शिरोमणी महामानवासं विनम्र अभिवादन करतो!पूज्य चरणी पवित्र फुलं वाहतो!🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२० डिसेंबर २०२२
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment