धमणीत रक्त भरतांना

धमणीत रक्त भरतांना
***************
... नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!

वातीत प्राण ओतुनी 
ज्योती हसत असतें
तेजाळत्या उमेदित
साजिरी गोजिरी दिसते

आकाश विस्तारलेलें 
स्वत:स ओढीत असतं 
पंखानीं सीमा व्यापतांना 
पाखरू हतबल दिसतं

बंदिस्त पोकळीतं उभे
किलकीले एकटे दार
पंखात रक्त गोठलेले
कशी उडेल हो घार

निरोप नाही कळला
का अंधार दाटलेलं 
कळीस नाही कळले 
आभाळ फाटलेलं 

धमणीत रक्त फिरतंय 
घेण्यास उंच भरारी
अजूनही दिवस ठेव रें 
जरा होऊ दे करारी

बंधू-भगिनींनो!
मी दररोज डोळ्यातून व्यापतोय कित्येक किलोमीटरचां फेरा!अंगात बळ आहे!मन शाबूत आहे!ठिकाण नबुद आहे!प्रवास रोज घडतो आहे!कोणी आवाज दिल्यावर पायात चप्पल घालतो!पाठगोळी सॅक टाकतो!किलोमीटर मोजण्या प्रवास घडतो आहे!प्रवास गरजेचा आहे!बोलावणाऱ्यांच्या मर्जीचा आहे!सुख दुःख मोजण्या प्रवास घडतो आहे!

३१जुलै २०२२लां आकाश निरभ्र झाले होते!गेली ३५वर्षं पंख होते पण उडता येत नव्हतं!पाय अन पंख बांधलेले होते!उडण्याचा प्रयत्न करून पाहिला होता!गगनातल्या काही उंचीवरून जमिनीवर आदळलो होतो!मग उडणेचं विसरून गेलो होतो!...मग तो दिवस उजाडला!माझे बांधलेलें पाय अन पंखानां धरून उंच दरीच्या टोकावरून मला ढकलून दिलें गेले!दरीच्या निम्म्या खोलीपर्यंत पंख उघडतं नव्हतें!अतिशय खोल,अगम्य,विशाल दरी पाहून डोळे अन डोकं गरगरत होतं!घाबरून दरदरून घाम फुटला होता! पंखाची चमत्कारिक हालचाल होऊ लागली!पूर्ण ताकदीनिशी पंख उघडले गेले!दरीतल्या खोल खोल विवारातून जिवाच्या अकांताने पुन्हा वरती झेप घेतं शिखरावर आलो होतो!...... 🌹🌹🌷🌷

बंधूनो जीवन प्रवास असाच समजून घेतं पुढे निघालो आहे!थोडा चमत्कारिक,विचित्र अन अनाकलनीय वाटतो तरीही त्याचा अनुभव घेतं प्रवास करतो आहे!💐💐....त्याचं झालं असं की मी आज रोजी ०१ डिसेंबर२०२२लां सकाळी पुण्याहून एसटीनें मध्यप्रदेशातल्या पानसेमल जवळील.... गावी निघालो होतो!सकाळी ०६वाजता कुठली एसटी भेटणार होती? मी पुणे-धुळे एसटीत बसलो!सकाळचीं सौम्य गुलाबी थंडी अंगावर घेतं एसटी पळत होती!मी ही थंडीच्या त्या मोहंमयी वातावरणात खिडकीजवळ बसून मागे जाणारी घरं,झाडं,शेत, पिकं न्याहाळत-बघत पुढे निघालो होतो!नगर पर्यंत बाहेरील दृष्यानीं मन व्यापलं होतं!गुंततं गुंततं मी ही त्यांचाचं एक भाग झालो होतो!🌹

अहमदनगर आले!एसटी फलाटावर येऊन थांबली तशी एसटीच्या दरवाज्यातून प्रवाशांचां लोंढा आत घुसला!नेमका माझ्याजवळ एक पस्तीशीतील तरुण येऊन बसला!एसटी फलाटाबाहेर पडली!घरच्यांनीं नाष्टा आणि दुपारचा डबा बांधून दिला होता!.. मी एक बिस्कीटचां पुडा काढला आणि एक बिस्कीट शेजारील त्या तरुणाला देऊ केलं!नाही नाही म्हणता हातात कोंबल!बिस्कीट खाता खाता तरुणाला बोलतं केलं!तो ही पुण्याहून टप्या टप्यानें प्रवास करतं शिर्डीला चालला होता!मला वाटलं आज गुरुवार आहे शिर्डीला दर्शनाला चालला असेल!

त्या तरुणाचं नाव माधव बिरादार होतं!त्याच्या बोलण्यातून असाह्य वेदनेची किनार जाणवली!तो बोलला,"हो मी शिर्डी दर्शन करून शिर्डीच्या अर्थ साहाय्य केंद्रात जाणार आहे!मुलीची एक फाईल आणली आहे!मी शिक्रापूर येथे एम.आय.डी सी.तील एका कंपनीतं कामाला आहे!राहायला भोसरीत आहे!एक मुलगी आहे सहा वर्षाची!जूनमध्ये तिचं सरकारी कोट्यातून इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये ऍडमिशन झालं होतं!....तिला मध्ये मध्ये ताप येत होता!ताप कमी होईना म्हणून पुण्यातल्या के.ई.एम हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता!... तिला... तिला "ब्लड कॅन्सर" सांगितला..!गेल्या ऑगस्ट पासून केमो थेरपी सुरु आहे!आता पर्यंत सहा लाख रुपये खर्च झाले आहेत!डॉक्टर अजून १०-१२लाख खर्च सांगताहेत!"..एका दमात सर्व बोलून गेला!मी ही सुन्न झालो होतो!बोलता बोलता श्री.माधव बिरादार यांच्या डोळ्यातून टचकण पाणी आलं होतं!आपल्या अपत्याला होणाऱ्या शारिरीक वेदना एक बाप आपल्या डोळ्यात पाणी आणून सांगत होता!🌹

आजारपण कोणालाही नको असतं!पण असं वेदनादायी आजारपण घेऊन एक इवलीशी कळी जगते आहे!डोक्यावरील केसं उडून गेलेली लाडली आयुष्यवाढीसाठी झुंज देत आहे!तिला होणाऱ्या यातना तिच्या वेदना तिच्या बापाच्या,आईच्याचं रहात नाहीत!माणूसपणाच्या भावना ज्यांच्या हृदयात वास करतातं त्या प्रत्येक व्यक्तीच्या होऊन जातात!कोणाचा दोष हा?त्या उगवत्या छोट्याशा निरागस कळीचा?आई -वडिलांचा?का करता करविता त्या विधात्याचा?कोणाचाही दोष नाही!

एका बापाची मुलीच्या जीवनदाना साठी होणारी तगमग पाहिली!कंपनीतं रात्रपाळी करून सकाळीच शिक्रापूर येथून परस्पर शिर्डीला जाणाऱ्या बापाची तळमळ पाहिली!अपत्यसुख स्वर्गाहून श्रेष्ठ असतं!घरात गोकुळ असतं!गोकुळात आनंद भरलेला असतो!आज हा बाप गोकुळसाठी दवाखान्याच्या फेऱ्या मारतो आहे!मुलगी श्रावणीसाठी, तिच्या जगण्यासाठी नामांकित ट्रस्टिंकडे केविलवाणी याचना करीत फिरतो आहे!माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं!🌹

 प्रत्येक व्यक्तीच्यां मनात हळहळ होईल!स्वतःचं अपत्य "ब्लड कॅन्सर"नें पीडित आहे बाप नोकरी सांभाळून पळतो आहे!असं दुःख कधीच कोणाच्या वाटयाला येऊ नये!हिचं प्रार्थना करीत असतांना न राहावून मी ही फोन pay हात लावला!.. फुलं नाही तर फुलांची पाकळी म्हणून सातपात्री होण्यासाठी पुण्य घेण्याचीं छोटीशी संधी घेतली!

बंधूनो!जीवन सत्य आहे!सत्यातून संवेदना जागृत करून माझ्याशी ईश्वरानें आज हा वेदनादायी खेळ खेळला!... जगण्याचा अर्थ समजत मी पुणे-धुळे-शहादा अन शेवटी पानसेमल या एम पी असणाऱ्या गावी येऊन पोहचलो!🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०१डिसेंबर २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol