अंधारं
आंधारं
🌹🌷🌹🌷🌹
******************
... नानाभाऊ माळी
भाऊ बहिनीस्वन!.... 🙏
(दखेल ऐकेल आंसू गायेलं
काहीतरी घडत ऱ्हास!
आनुभव आनबक करी
ते हिरदम्हा घुसी जास!
माणूस से मन से हिरद से
काहिबाही धडकत ऱ्हास
जित्तापनं ठयक चानकं
जागे जाग उमटत जास
डोयानां थायनाम्हाईन
काकूयीदिनं पानी व्हास!
कायजम्हा बठेल सतनां
मी बनी ऱ्हायनु दास )🙏
*******************
दिन मावयावर घरमा येता खेपे "त्यांनी" खुटीलें कुडची टांगी दिन्ही!कुडचिले आद्दर झेलीस्नी खुटीभी कुडचिना खिसा चाफली ऱ्हायंती!खिसा फाटेल व्हतातं!मानोस फाटेल व्हता!कुडची फाटेल व्हती!घर आथ-तथ फाटेल व्हतं!फाटेल गंजी फराकनां बुंग्रास्माईन आंग,पाट,पोटनं दर्शन व्हयी ऱ्हायतं!तो भितडालें पाट टेकी बठेल व्हता!वरतीन धाबाना किलचनम्हाईन माटी बुरुबूरू पडी ऱ्हायंती!किलचन कुजी जायेल व्हतं!उंद्रे सऱ्या,टिटवा किलचनमां आथा तथा घुसी पयी-पुयी ऱ्हायंतात!कोरी कोरी धाब पोक्कय करी ऱ्हायंतातं!जुन्यापिढीस्न घर,धाब,भितडा व्हतात हुभा व्हतात!आते बठ्ठ तकलादू व्हयी जायेल व्हतं!भितडा आंगवरना गिलावा सोडी ऱ्हायंतात!खांब सऱ्यासलें धरी,टेका दि कैक वरीसफाईन हुभा व्हतात!🙏
चुलान्मव्हरे "ती" बठेल व्हती!पिठनं डबडं उखलं-वाखलं करी डबडालें तिरप-तारपं,हालायी-हुलायी, ऱ्हायेलं-सुयेलं पीठ परातम्हा टाकी ऱ्हायंती!कोरीकारी,झटकी-झुटकी दोनेंक भाकरनं पीठ परातम्हा नींघनं व्हयी!पयान्ह्या काड्या बयी-बुयी,जीव दिस्नी चुलाम्हा उब्या भडकायी ऱ्हायत्यांत!उब्यानां धव्व्या धुव्वा घरमा गुदमरी जथी जागा भेटी तथ उडी ऱ्हायंत!सानं चाफली ऱ्हायंत!धल्ली परातम्हा पानी टाकीस्नी पीठ मयी ऱ्हायंती!भडकेल उब्यावर तवा लालभुधूम व्हयी भाकर भुंजी ऱ्हायंता!भाकरी भांनंसीनवर हुभ्या व्हत्यात!चटकेल तावावर निय्या मिरच्या भुंजी खकांना सुटी ऱ्हायंता!मीठ टाकी मिरच्या गडूवरी घसी-कुस्करी खुडा व्हयना!काया भुदुम्म तावावर निय्यागार खुडानां पेंडा दखी त्यांना तोंडले पानी सुटी ऱ्हायंत!भूक कवरायी जायेल व्हती, आवारायी नई ऱ्हायंती!तो खाली थाटिंगमं आसं लायी बठेल व्हता!
सुन्नाट घरम्हा ती आनी तो एक दुसरालें आधार व्हतात,धिवसा व्हतात!सासूल व्हतात!चाळीसनां बलफ रातना अंधारालें दारनां बाहेर ढकली ऱ्हायंता,तंगाडी ऱ्हायंता! दारसे मोरीनां भितले लायी खाटलं टाकेल व्हतं!थकेल जिवडालें आंग टाकागुंता वाट दखी ऱ्हायंत!दोन्हीस्नी खुडासंगे एक एक भाकरी तोंडंम्हा ढकली,गयांखाले ढकली!अगीन पडेल पोटलें थंडक भेटनी!आग शांत व्हतं ऱ्हायनी!वरथून एक तांब्याभर पानी पिसनी तो खाटलावर यी बठना! 🙏
आवर सावर करी!मझारथून दारनी कडी लायी!बलब म्हलायीस्नी ती भी खाटलांगें आथरून टाकी यी बठनी!अंधाराम्हा घर आंधे,तो आंध्या,ती आंधी व्हती!मव्हरे येनारा दिन चंदर दपाडीस्नी यी ऱ्हायंतातं!.. त्यांजोगे बोला सारखं बठ्ठ आटी जायेल व्हतं!ती अंधारानां आधार ली बोलनी, "काहो,ऐकी ऱ्हायनात नां!"..कानवर निस्ता "हुं" करांना आवाज उना!तिले बरं वाटनं!धीर करिसनी बोलनी,माय ममताना झिर आक्सी व्हाता ऱ्हास,"सकायले आंगेनां जिभूनां फोनवरतिन राजुले फोन करी दखूतं!"तो खेकसायीस्नी बोलना, "कितला वरीस व्हयी ग्यात त्याले तथा दडपावालें? व्हयी ग्यात नां पाच सव वरीस!त्यांना कधी फोन उना का? माय-बाप जित्ता सेत का मरी ग्यात!तो शिलगी ग्या तथा सहेरम्हा! देवनी एखला धांड्या दिन्हा!रंगतनं पानी करी शिकाडा!लगीन व्हयी, टिटूईमांगे लागी भडवा माय बापले इसरी ग्या!तथा दडपायी बसना!"...
तिन्हा हुंडूक अंधारान्या चार
भितास्मझार दडपायी ग्या!मायनं कायेज पोऱ्यांगुंता तयमयी ऱ्हायंत!
आंगवरनी झावर डोयास्ना आंसू पी वल्ली व्हयी ऱ्हायंती!दोन जीव रातभर हायी कानी,ती काने करी रात ढकली ऱ्हायंतातं!अंधाराम्हा सकायनां डबडानं पीठ धुंडी ऱ्हायंता तं!दोन्ही जिंदगीनं अंधारं पंघरी निजेल व्हतात!आंगवर बुदू बुदू माटी पडी ऱ्हायंती!आंगनी माटी व्हयी ऱ्हायंती!किलचनम्हानां उंद्रे धाब कोरी कोरी भवडी-भुवडी ऱ्हायंतातं!
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
********************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०८ऑक्टोबर २०२२
Comments
Post a Comment