विचार प्रबोधनकार
विचार प्रबोधनकार
🌹🌹🌹🌹🌹
**************
... नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
दिवाळी आधी मुलांची शाळा सुरु होती!सकाळी सकाळी आमचा नातू देखील बालवाडीच्या मोठया गटात शाळेत जातो!त्याला स्कुल बसमध्ये सोडवायला जावं लागतं!नातूला
बसमध्ये बसवून पुढे एक-दिड किलोमीटर चालतं जातो!आरोग्याची काळजी म्हणून चालणं आहे!त्या दिवशी नातूला बसमध्ये बसवलं!सोबत लहान नातू आणि सौभाग्यवती देखील होती!... चालत रस्त्यावरचं "संस्कृती"सोसायटी आहे!गेट समोरून जातांना सौभाग्यवती खूप पूढे होती!मी लहान नातूला पाव पाव म्हणतं हळूहळू चालत होतो!.. संस्कृती सोसायटीच्या गेटवर एक जेष्ठ व्यक्ती साधारण वयाची सत्तरी गाठलेली असेल,आमच्या सौभाग्यवतीनां बोलले,"तुम्ही नानाभाऊ माळींच्या मिसेस का?"सौभाग्यवती हो म्हणतं माझ्याकडे बोट दाखवला!🌹
त्यांची आणि माझी नजरा नंजर झाली!मी विचार करायला लागलो ,'आम्ही दोघे कुठल्यातरी प्लॅटफॉर्मवर भेटत असतो??"तोवर तें बोलले देखील,"नमस्कार नानाभाऊ मी हरीश सोनार,आपण व्हाट्सअप साहित्यिक ग्रुपवरील मित्र आहोत"!तें बोलले आणि माझी देखील ट्यूब पेटली!डोक्यात लख्ख प्रकाश पडला!एक प्रसिद्ध साहित्यिक भेटल्याचा आनंद झाला!मी म्हणालो,"सर!आपण इथे कुठे? आपण तर जळगावला असतातं!"
आदरणीय हरीश सरांचे दोन्ही मुलं आणि एक मुलगी पुण्यातचं असतांत असं कळलं!सर्वजन इत क्षेत्रात कार्यरत आहेत!संस्कृती सोसायटीत दोन्ही मुलं राहातात!मुलगी
हिंजेवाडीला राहायला आहे हे देखील समजलं!मध्ये मध्ये मुलांना भेटायला येणं होत असतं हे देखील समजलं... अन सकाळी सकाळी आम्हाला त्यांच्या फ्लॅटवर घेऊन गेलेत!🌹
भेट आनंद देणारी होती!अस्सल
शब्दधनीची भेट झाली होती!लेखकाची भेट झाली होती!व्हाट्सअप ग्रुपवर सतत उत्तमोत्तम लेख लिहिणारे हरीशजी सोनार सरांची योगायोगाने भेट झाली होती!नंतर आपल्या घरी देखील येऊन गेलेत!दिवाळीनंतर पुन्हा जळगावला जाणार होते!म्हणून त्यांनीच दिवाळी फराळासाठी बोलविले होते!उभयता पती पत्नीचं अगात्यानें आम्ही भारावून गेलो होतो!भेट प्रवासातून होत असतें!हाती अचानक अमृत पेला देऊन भेट स्मृतीतं राहून जाते!त्या विषयी काही लिहितो आहे 🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷
स्थलांतराचे पंख लावून
माणूस हिंडतो आहे!
कधी येथे तर कधी तेथे
खुशाल उडतो आहे....!🌹
विशाल आकाश पांघरुनी
सुख-दुःख निघूनी जाते
कळतंच नाही कुणाला
जगणे एकरूप होते...!🌹
पंखात बळ भरुनी
मनात इंधन गोळा होते
स्थलांतराच्या नकाशातूनी
भेट अनुभव देऊनी जाते!🌹
माणूस हिंडतो पोटासाठी
जगी भरकटतोही आहे
पंख आशेचे थकल्यावर
कधी खरचटतोही आहे...!🌷
आपुले उडणे सहज झाले
विशाल आकाश खाली आले
उंच उंच भरारी घेतानां वर
मन डोळ्यातूनी होते ओले.!🌹
बंधू-भगिनींनो"
माणूस आपल्या पंखात जोश आणि शक्ती ओतून उड्डाणं करीत असतो!दाना पाणीच्या ठिकाणी पंख मिटवून थांबत असतं!स्थिरस्थावर होण्यासाठी प्रयत्नशील असतो!सुख-दुःखातून जगणं शोधित असतो!जवळपास असलेल्या माणसांशी तडजोडी करीत समूहाचा एक भाग बनून जात असतो!समुद्र अथांग असतो,तलाव अनेक असतात!अशा तलावांच्या गोड पाण्यात माणूस एकजीव होऊन जात असतो!🙏🌹
स्थलांतर पोटासाठी असतं!मनासाठी असतं!बुद्धीच्या भुकेसाठी असतं!पोटात पडले की बुद्धीलाही सुचत असतं!देवी अन्नपूर्णा,देवी सरस्वती अन देवी लक्ष्मी एकाचं ठिकाणी निवासाला असल्यावर तें घर वैभवसंपन्न असतं!प्रवासातून अनुभतीचा अविष्कार साक्षात दिसतं असतो!प्रवासातून पोट कळतं!पोट तृप्त तर जगणं सुंदर असतं!पोट-पाट सांभाळून वेगळी ओळख निर्माण करणे माणुसपणाची लक्षणं असतात!काहींचा खेडेगावातून प्रवास सुरु झाला!शहरात येऊन थांबला!. तो थांबा तरी सुखाचा आहे का??थांब्याला सजवून,आपल्या सुप्त बोलांनां चंदनातं भिजवून हृदयाच्या अंधाऱ्या खोलीलां सुगंधित करणाऱ्या अशाच मनकवडा शब्द पारख्यानां भेटण्याचा योग आला होता!त्यांच्या चेहऱ्यावरीलं हास्यरेषा कमळ फुलल्यासारख्या दिसत होत्या!मानवी मनाचे कंगोरें उत्तमरीत्या उलगडणारे!मजमाप केलेल्या शब्द साच्यात बसवणारे!आशय विषयांना हळूच मृदूस्पर्श करीत वाचकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शब्दयोग्याचं नाव आहे!साहित्यिकांचे नाव आहे आदरणीय "हरीश सोनार(भामरे)सर!"🌷
हरीश सोनार सर!!!हसरं व्यक्तिमत्व!बोलकं व्यक्तिमत्व!प्रतिभेचं अमृत सतत दुसऱ्यांना वाटणारे व्यक्तिमत्व आहेत!..त्या काळी आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे न वळता,शिक्षणा नंतर शासकीय सेवेत रुजू झालेतं!बालपण संत वाहतें तापी मायच्या काठावर गेलेलं!तापी नदी सूर्यपुत्री आहे असें म्हणतात!पूर्वेकडून पश्चिमेंकडे वाहणारी!अथांग सागरासारखी दिसणारी!स्वच्छ,शांत,शितल,निर्मळ,नितळ तापी नदी जीवनदायीनी आणि
प्राणवाहिनी देखील आहे!कडेने हिरवळ नेसून वाहणारी तापी नदी उत्तर महाराष्ट्राची संजीवनी आहे!तिच्याचं काठावर 'नेवाडे' गाव वसलेलं!धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील छोटंसं टूमदार खेड म्हणजे नेवाडे!नदी सौंदर्याचं,निसर्गाचं वरदान लाभलेल्या गावात आदरणीय हरीशजी सोनार सर शिकले,वाढले!पुढे शिंदखेडा,नंदुरबार अन जळगावला शिक्षण आटोपून जळगाव जिल्ह्यातील ऐदलाबाद येथे रिव्हेन्यू खात्यात नोकरीला लागलें!आपल्या साहित्यकृतिचा जन्म त्याचं मातीत होत राहिला!अनुभवांची मोठी शिदोरी सोबत येत गेली!मनातील वादळ लेखणीत एकवटू लागले!लेखणीतून कागदावर शब्द उमटू लागले होते!शब्दांना पंख फुटू लागले!हरीश सोनार सर विचार पंखावर बसून साहित्यिक उड्डाणं करू लागले होते!🌹
व्यक्ती शिक्षण,संस्कार,अवलोकन अन अनुभवांनी खूप काही शिकत असतो!हे सर्व व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे साक्षीदार,साथीदार असतात!कधी जवासारखे सुख आपल्या दारीं येत असतं!कधी
डोंगराहुनी मोठे दुःख वाट्याला येतं असतं!असें अनेक सुख-दुःख अनुभवलेल्या हरीशजी सोनार सरांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले!न डगमगता सदाचारी तात्विक बांधिलकी पाळत राहिले! सरकारी नोकरी पार पाडत,नायब तसीलदार पर्यंत प्रमोशन घेत सन्मानाने सेवानिवृत्त झाले!🌹
साहित्यकृतीचा जन्म साहित्यिकाच्या विचारशक्तीवर,मनोवृत्तीवर अवलंबून असतो!कुठल्या वातावरणात लेखकाची जडणंघडणं झालेली आहे तें साहित्यकृतीतून डोकावत असतं!आदरणीय हरीश सोनार सरांनी सरकारी नोकरी केलेली असल्यामुळे जनतेच्या समस्यांनिगडित ड्युटी केलेली आहे!अनुभवांचे बारकावे साहित्यतातून प्रतिबिंबित होत असतात!अप्रत्यक्षपणे अनुभव शब्दबीज अंकुरीत होऊ लागतं!हरीश सोनार सरांच्या कथा माणुसपण पेहरणाऱ्या आहेतं!हलक्या फुलक्या विनोदाची फोडणी देणाऱ्या आहेत !कथा वाचकांशी संवाद साधू लागतांत!वाचक कथेच्या आशयात एकरूप होऊन जातो!कथेच्या भूमिकेत जगू पाहतो!हरीश सोनार सरांच्या कथेतील व्यंग अन विडंबन निगरगठ्ठ यंत्रनेचं प्रतीक होऊ पाहत आहे!जिवंत माणसांच्या व्यथा कथेतून प्रकट होत आहेत!कधी कथा हलक्या फुलक्या विनोदी ढंगातून, शैलीतून जन्म घेऊ लागतात!संदेश देत आहेत!कथापित्याचे विचार मांडतं आहेत!🌷
हरीश सोनार सर मराठी आणि अहिराणी भाषेतून लेखन करीत आहेत!त्यांच्या कथा विचारांना जन्म देत आहेत!वास्तव चित्रण करीत विशाल,कुशल,समृद्ध शब्दप्रतिभेतून साहित्यकृती उमलते आहे!मनमोहक शब्दफुले साहित्य मंदिरात उधळली जात आहेत!मंदिरातं पावित्र्याचं दर्शन होत आहे!साहित्यकृतीचा सन्मान होत आहे!अनेक कथा हृदयाचा ठाव घेत आहेत!सुख पेहरीत दुःख वेचून घेत आहेत!हरीश सोनार सरांच्या कथा शब्दगालिचा बनवीत आहेतं!
अशा महान व्यक्तिमत्वास अष्टपैलू लेखणीसाठी शुभेच्छा देतो!... आपल्या लेखणीतून माणुसपण जन्म घेत आहे!भावी प्रबोधनकारी साहित्य कृतीसाठी हृदयातल्या शुभेच्छा देत आहे!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४१२०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-११नोव्हेंबर २०२२
Comments
Post a Comment