ज्ञानपूर्ती सोहळा

ज्ञानपूर्ती सोहळा
🌹🌹🌹🌹🌹
***************
... नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
ज्ञान जन्म घेणाऱ्या बाळासारखं असतं!नेहमीच खळखळून वाहणारे असतं!ताजेतवाने असतं!उगवत्या नदी मुखासारखे असतं!ज्ञान ज्ञानेश्वरांच्या इंद्रायणी काठी असतं!तुकोबांच्या गाथे सारखं असतं!ज्ञान आसं लावणारे असतं!उत्सुकतेला जन्म देणारे असतं!असं म्हणतात की ज्ञान कधीही वृद्ध होत नसतं!ज्ञान पाजल्याने नवतीचा जन्म होत असतो!ज्ञान पाजळल्याने नाविण्याचा साक्षात्कार होत असतो!अनुभूतीचा जन्म ज्ञानाप्रक्रियेतून झालेला आहे!
झूळझूळ वाहणारी,खळखळ वाहणारी नदी उदयाकडून वाहत असतें!प्रसन्नतेच्या उगमाचं दर्शन करून देत असतें!म्हणून ज्ञान अगाध असतं!ज्ञान वाटणारे जीवसृष्टीतील अनेक ज्ञात-अज्ञातात मनुष्य देखील आहे!तोच मनुष्य ज्ञानमहर्षी असेल,ज्ञानऋषीं असेल तर ज्ञानघडा काटोकाट  भरला आहे असं समजतो!अशाच अनुभूतीचा साक्षात्कार आम्हाला देखील झाला!काल ०२नोव्हेंबर २०२२रोजी एक गुरुजन सेवानिवृत्त झालेत!शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झालेत!🌹

काल सकाळी पहाटे मी आमच्या घराच्या गच्चीवर जाऊन बसलो होतो!पूर्वेकडे तोंड करून बसलो होतो!अंधाराला बाजूला सारून पूर्व दिशेला हळूहळू तांबड फुटायला लागलं होतं!तांबूस लालिमा उजळतांना दिसतं होती!मी थंडीत बसलो होतो!एकचित्त होत सृष्टीचं क्षणोक्षणी बदलणारं रुपडं पाहात बसलो होतो!पूर्व दिशा उजळत होती!हळूहळू भगवे कपडे घातलेलं एक तेजोमय गोलाकार गोळा वर येतांना दिसला!पूर्व दिशा उजळून गेली होती!माझ्या डोळ्यांनीं त्या गोळयास प्राशुन घेत होतो!किती विलोभनीय!किती मनमोहक होता तो गोळा!आजू बाजूला उगवतीच्या साक्षीला पक्षांचा किलबिलात ऐकू येतं होता!०२नोव्हेंबरच्या उगवतीचा अविस्मरणीय खेळ पाहात राहावेसे वाटतं होतं!सृष्टीच्या नयनमनोहर उगवतीच्या खेळात मी तादाम्य झालो होतो!फुलं उमलावी तशी पूर्व दिशा उमलत होती!मी एकचित्त झालो होतो!एकरूप झालो!अरुणोदयाच्या त्या विहंगम खेळात मलाच विसरलो होतो!अरुणोदय माझ्या चित्तास कवेत घेत होता!कुशीत घेत होता!प्रसन्नतेच्या जवळी जातांना मीच मला विसरलो होतो!.. अरुणोदय झाला होता!…. आणि  आणि अरुणोदयातील अरुण मला दिसू लागला होता!... हो ज्ञान वाटाणारा ज्ञानी अरुण!.......ज्ञानपीठ अरुण!
ज्ञानवृक्ष अरुण!श्री "अरुण" पाटील सरांच्या सेवापुर्तीचा आजचा दिवस होता!सेवानिवृत्ती निमित्त हृदयसोहळा होता!🌹

ज्ञान कधीही वृद्ध होत नसतं!ज्ञानाचा विस्तार सतत होत राहतो!ज्ञानी शरीराने वृद्ध होत असतो पण मनाने तरुण असतो!हृदयाने तरुण असतो! श्री.अरुण तुळशीराम पाटील सर कदमवाक वस्ती,लोणीकाळभोर, पुणे येथील शाळेत ज्ञान वाटता वाटता दिनांक ३१ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झालेतं!महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या ज्ञानदीप विद्यालयातून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेत!३३ वर्षांच्या अखंड सेवेला निरोप देण्याचा दिवस होता!प्रत्येक कार्याचा प्रारंभ असतो तसा समारोप देखील असतो!जीवनाच्या या दोन बिंधूनमधून जीवनपट उलगडत राहातो!श्री.अरुण पाटील सरांचा समर्पित सेवाभाव,शाळेसाठीचं जीवन,विद्यार्थ्यांसाठीचं ज्ञानदान वृत्ती मुळेचं विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावारूपाला आलेतं!🌹

ज्या जागेत शाळा सुरु झाली होती ती जागा काटेरी बाबळीनीं वेढलेली होती!शाळेला शाळेचं सुस्वरूप आणणारे आदर्श शिक्षक अरुण पाटील सर हे कदमवाक वस्ती आणि लोणी गावात घरोघरी फिरून विध्यार्थी गोळा करून शाळेला नावारूपाला आणले!शिक्षक मुलांना आदर्श असतात!आई-वडीलांनंतर शिक्षक संस्कार गुरु असतांत!ज्ञानदानानें विध्यार्थी घडत असतो!वळत असतो!कुंभार कच्च्या मातीतून सुंदर,आकर्षक मडके
घडवितो!शिक्षक तेचं काम करीत असतात!श्री.अरुण पाटील सर स्वतः संस्काराची शाळा होते!🌹

गुरुजन जीवनाच्या वाटचालीतील प्रकाशवाट असतातं!ज्ञानप्रकाशानें उजळून निघण्यासाठी विध्यार्थी आतुर असले पाहिजेत!संस्काराची ताजी फुलं वाटणारे शिक्षक आदरणीय असतात!गुरुजन ज्ञान भंडारातून संस्कार मोती वाटत असतात!शाळा संस्कार केंद्र असतें!विध्यार्थी संस्कार केंद्रातून बाहेर पडतांना भाजलेले पक्के मडके झालेले असतात!अरुण पाटील सरांनी अशा अनंत मातीच्या गोळ्यांना ज्ञान संस्कारांनी भाजले आणि जीवन शाळेत स्वतःच्या विकासासाठी पाठवले!🌹

श्री अरुण पाटील सरांनी घडविलेले अनेक विध्यार्थी देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवीत आहेत!.. अनेक व्यवसायात स्थिरस्थावर झालेले विधार्थी आहेत!शासकीय अन कंपन्यामध्ये कार्यरत विध्यार्थी सरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी सरांच्या सेवापुर्ती समारोहाला आवर्जून उपस्थित होते!🌹

गुरु समाजाचे प्रबोधनकार असतात!समाजाचे प्रतिबिंब दाखविण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतात!विध्यार्थ्यांना सदगुणांची ओळख करून देत असतात!... डोळस आणि सुसंस्कृत करणारे महान शिक्षक वंदनीय असतात!..गुरुजनांचे ऋण फेडता येईल विध्यार्थी मित्रांनो? त्यांच्या अंतरंगातील बोल सतत सोबत घेऊन हिंडणारे विध्यार्थी जेव्हा कर्तृत्वाने मोठे होतात तेव्हा गुरुजनांच्या आनंदाश्रूनां सहज वाट मिळत असतें!🌹

अज्ञान साच्यातं ज्ञानामृत ओतणारे अन विध्यार्थी घडवणारे श्री.अरुण पाटील सरांच्या सेवानिवृत्ती अन सेवापुर्ती हृद्य सोहळ्यास उपस्थित राहता आले हे मी माझ भाग्य समजतो!..सरांचां ज्ञानमार्गाचा वसा  सर्व शिक्षकांनी असाच चालू ठेवावा! सरांच्या नावातील "अरुण"  आपणास उजेड दाखवीत राहतील!ज्ञानदृष्टी देत राहतील!त्यांच्या उर्मिला धुमारे फुटू द्या!आदर्श चालवत  असतांना आदर्श विध्यार्थी घडवत राहावे!याचं खऱ्या शुभेच्छा श्री. अरुण पाटील सरांच्या सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त व्यक्त करतो!..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०३नोव्हेंबर २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)