थंडीच्या कुशीतील गहू-हरभरा

थंडीच्या कुशीतील गहू-हरभरा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
काही दिवसापूर्वी गहू हरभऱ्याचीं पेहरणी झालेली आहे!दाणे मातीच्या कुशीत जावून विसावलीं!माती ओलसर होती!जमिनीत दाणे एकजीव होऊन गेलीत!अवघ्या दोन तीन दिवसात पेहरणी झालेल्या हरभरा-गव्हाची नाजूक अंकुर शाळेतील मुलांच्या ओळीगतजमिनीतून डोकावू लागली होती!हिरव्या गोऱ्या रंगातून मातीचा टवका बाजूला सारतं नाजूक,कोमल कोंब अंकुर वर येतांना दिसू लागले होते!🌹

पेहरणी झालेल्या शेतातून एकएका ओळीतून हिरवाईचीं कोमल अच्छादानं नजरेस पडू लागली होती!डोळ्यांना मोहमयी वाटू लागली होती!नजरेची भूक भागवू लागली होती!जिमिनीतून वर येत पिकांचे पाऊले मातीवर पडू लागली होती!जमिनीत घट्टपणे मूळ्या रोवत उभे राहू लागली होती!निसर्ग त्या इवल्याशा पिकांची एक पान!दोन पानं!एक फांदी!अशी एक एक अवयव जोडीत निघाला आहे!लाल-काळ्या,भुरट मातीतून हिरवाई जन्मू लागली होती!माती व्यायलां लागली होती!तृप्तीचा आनंद मातीचा सुगंधातून दरवळू लागला होता !🌹

शेतं रात्रीच्या अंधार पेटीत,थंडीत कुडकूडणाऱ्या नाजूक,कोमल बाळांना कुशीत घेऊन पहुडलें होती!सकाळी सकाळी उगवता सूर्यदेव  प्रसन्न मुद्रेने धरतीच्या इवल्याशा पिलांवर आपलीं सोनेरी माया पसरवू लागला होता!किरणांच्या उबेने गहू-हरभरा सुखावू लागलां होता!आपली छोटी छोटी नाजूक पानं हलवत सूर्यदेवास प्रणाम करू लागलें होते!सूर्यदेव आपली मोहमयी सुवर्ण किरणं चौफेर उधळीत निघाला होता!त्याच्या मनमोहक रुपाला भाळलेली पीक सोनेरी रंगात न्हाऊन निघाली होती!सूर्यदेव क्षितिजाच्यां पूर्व शिडीवर चढू लागला!विशाल आकाशाच्या पोकळीतून प्रकाशमान होत आपलं विशाल रूप दाखवत प्रवासाला निघाला होता!🌹

सूर्य वर येतांना थंडीचीं उब ओसरु लागली होती!वाफ्यातील पिकं सूर्य देवास नजरेनें पाहू शकत नव्हती!तहानेनें व्याकुळ होतं पानांवरील तेज मावळू लागलं होतं!रान उन्हातं तापू लागलं होतं!निस्तेज,मलुल चेहरा करीत,अंग गळल्यासारखे पिकं उभी होती!🌹

छोट्याशा चारीतून,पाटातून पाणी वाहात होतं!इलेक्ट्रिक मोटारीनें विहिरीचं पाणी चारीत वाहात होतं!सापासारखे वळण घेत वाफ्या वाफ्याचीं पोटं तुडुंब भरत पाणी वाफ्याचं बांध फोडीत फेसळलेलं थंडगार पाण्याचां छोटासा लोंढा वाफ्यात येऊन वाफे बळकाऊ लागला!🌹

पाण्याचा प्रवाह वाफ्यातील गहू-हरभऱ्यालां अमृतप्रपान करीत होता!पाण्याचा अंश पिकांच्या मूळ्या शोषून घेत होत्या!मलुल झालेली पाने,फांदया पुन्हा ताठ मान करून वाफ्यातं वाऱ्याच्या झूळकी सोबत नाचू लागली होती!वाफ्याचं पोट जणू उंटाचं पोट असावं!पाणी पितचं बसलं होतं!तुडुंब भरलेलं पोट ढेकर देत होतं!वाफ्याचं तोंडं फावड्याने पून्हा बंद केलं गेलं होतं !पिकांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहचल होतं!शेताचीं वाफे आपली तहान भागवत राहिले!माती पोट भरत राहिली!पिकं तहान भागवत राहिली!दिवस उजाडला तसा सूर्यदेव पश्चिमेंकडे कलत मावळतीच्या कुशीत झोपी गेला!🌹

गहू-हरभरा रात्रीच्या अंधारात!
कडाक्याच्या थंडीत निद्राधीन झाला होता!दिवस थांबणारे नसतात!काळ कोणालाही थांबू देत नसतो!गहू-हरभरा दिवसांगणिक वयोमानानुसार मोठी होऊ लागली होती!जन्माला येणारे बाळ काही कालावधी नंतर तरुण होतं असतं!तसंच पिकाचं देखील असतं!नोव्हेंबर चीं शेपटी उदया ३० तारखेलाडिसेंबर च्या मुखाला बांधली जाईल!डिसेंबर कडक थंडीचा महिना असतो!गहू-हरभरा अन दादर थंडीचें सवंगडी आहेत!थंडी व्यायाम करायला भाग पाडते!कारण डिसेंबर थंडीचा जोर काही औरचं असतो!🌹

रानारानात!शेतातून हिवाळ्याचीं दुलई पांघरलेली जाणवू लागली आहे!हिरवाईचीं पांघरून बनून थंडी जोर धरू लागली आहे!डिसेंबरच्या आगमनासोबतचं रानातील पिकं वाफ्या वाफ्यातून हलक्याशा हवेत नाचू-डोलू लागली आहेत!शेतकरी राजा सध्या तरी आपल्या हिरव्यागार रानाकडे पाहुणे आनंदी दिसतो आहे!अंगावर कांबळ पांघरून पाटातून वाहणाऱ्या थंडगार पाण्यातं पावलं चुबुक डुबुक करीत वाफे फोडून तहानलेल्या पिकांना पाणी पाजतो आहे!शेतकरी गहू-हरभऱ्यांशी काहीतरी हितगुज करीत आहे!डिसेंबर महिन्याचं आगमन होतं आहे!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
********************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-२९डिसेंबर २०२२
   nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)