एकता यशोबिजम
एकता यशोबिजम
🌹🌹🌹🌹🌹🌹
*******************
.... नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
मी बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे!व्यक्तींची युक्ती एकत्र आली तर ती शक्ती होते!सर्वचं एकजीव झालेलं असतं!त्यातून एकजीनशीपणा जन्म घेत असतो!सर्वांची एकजीनसी शक्ती एक झाली तर अशक्य ते शक्य होऊन जातं!मी बऱ्याच वेळेस लग्नातील डान्स पाहिला आहे!सर्व एक तालात नाचत असतात!डोळ्याचीं आणि कानाचीं तृप्ती होते!एकातालात नाचण्यातून वेगळाचं आनंद मिळतो!🙏
सर्वचं एकजीव झाले तर शक्ती त्या पटीने वाढते!त्यांत एकता दिसतं असतें!ऐकतेतून ऊर्जेचा स्रोत कित्येक पटीने वाढत असतो!एकता उजेडाचे द्वार आहे!प्रसन्नतेचं औषध आहे!एकरूपतेच दर्शन आहे!ऐकतेतून माणूस यशस्वी होत असतो!समाज यशस्वी होत असतो!संघटना यशस्वी होत असंते! प्राप्तीचं यशशिखर नजरेच्या टप्यात येऊन थांबत असतं!ऐकतेचा जन्म सकारात्मक ऊर्जेतून झालेला असतो!सकारात्मक ऊर्जा दीर्घकाल टिकते असतें!सकारात्मकतेतुन हाती घेतलेलं कार्य पूर्ण होत असतं!यशाकडे नेत असतं!यातून माणसं जोडली जातात!समाज आणि संघटना जोडली जाते!🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बंधू-भगिनींनो!
ऐकतेची प्रचिती यावी लागते!भले मनातले विचार भिन्न असू द्यातं!विशिष्ठ व्यासपीठावर ऐकतेच दर्शन झाले तर त्या संघटना जिवंतपणच्या प्रवाहक होतात!जेथे उदिष्ट साध्यासाठी ऐकतेच दर्शन घडतं त्यास "एकता यशोबिजम" म्हणूयात! मला याचा अनुभव काल आला!काल रविवारी २७नोव्हेंबर २०२२ रोजी आला!खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजित राज्यव्यापी वधू-वर मेळाव्यात आला!काल पुण्यातल्या भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात माळी समाजाचा भव्य राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता!त्यांत आयोजकांचं संघटन कौशल्य दिसलें!एकरूपतेचं दर्शन झालं!भिन्न प्रवाह ऐकतेत विलीन झालेलं पाहिलं!🌹
खान्देश माळी मंडळाच्या ऐकतेचं दर्शन झालं!त्यामुळे मेळावा यशस्वी झाल्याचां आनंद कसा वर्णन करावा इतका तृप्तीचा अनुभव जाणवला!पुण्यातील खान्देश माळी मंडळाचीं स्थापना २४ वर्षांपूर्वी झाली होती!आता २५व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे!संपूर्ण पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या संघटनेचा विस्तार होत गेला!धर्मदायआयुक्ता कडे नोंद असलेलं हे मंडळ, त्यातील पदाधिकारी,आजी-माजी जेष्ठ पदाधिकारी, अंगावर जबादारी घेऊन कार्य पार पडणारे मेहनती कार्यकर्ते ही मंडळाची विशाल शक्ती आहे!या विशाल एकजूट शक्तीचं दर्शन नेहमीप्रमाणे कालच्या मेळाव्यात दिसलं!🌹
मंडळाचा प्रत्येक सभासद कार्यकर्ता असल्यामुळे ऐकतेतून विकासाकडे नेणारी "खान्देश माळी मंडळ ही पुण्य जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेली रजिस्टर सामाजिक संस्था म्हणून नावारूपाला आलेंली आहे!माळी समाजाचा खान्देशातून आलेला पुणे जिल्ह्यात कुठेही राहायला असेल पण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांस स्वयंस्फूर्तीने जबाबदारी उचलणारा बांधव मंडळाचा पिलर आहे!🌹
बदल निसर्गाचा नियम असतो!सामाजिक संघटनेतं देखील खान्देपालट होत असतें!जेष्ठ नवीन रक्ताच्या कार्यकर्त्यानां संधी देत असतात!जेष्ठ पाठीशी राहून मार्गदर्शन करीत राहातात!नवी मंडळी समाजहिताचे नवनवीन प्रयोग करीत राहातात!सामाजिक संघटना मजबूत करीत राहातात!काळानुरुप बदल स्वीकारत खान्देश माळी मंडळाचं समाजहिताचं कार्य सतत ऐकतेचा संदेश देत आलेला आहे!ऐकतेची शक्ती वज्रमुठ असतें सामाजिक संघटनेचीं!🌹
काल २७ नोव्हेंबर२०२२ रोजी
शिस्तबद्ध पद्धतीने राज्यव्यापी वधु-वर मेळावा आयोजित करून सर्व बांधवांनी इतरांना देखील आदर्श घालून दिला आहे!हृदयातून ऐकतेची शक्ती सकारात्मकतेला जन्म देत असतें!काल त्याचं ऐकतेचीं अनुभूती आली!खान्देश माळी मंडळाचे मेहनती कार्यकर्ते,आजी-माजी पदाधिकारीचं कष्ट काल यशोबिजमचं दर्शन घडवत होते!भिन्न विचारातून एकता साधली जातं होती!वधु-वर मेळाव्याचं भव्य आणि यशस्वी आयोजनाच समाधान प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं!तेव्हाच "एकता यशोबीजमं"आनंदाने न्हाऊन निघाले होते!अशा हृदयातल्या व्यक्ती पूजनीय होतात!त्यांचं कार्य स्मरणात जाऊन बसतं असतं!अशा सर्व बांधवांच्या ऋणाची परतफेड फक्त आभार मानून होत नसते!त्यांच्यावर पुन्हा नवीन जबाबदारी देऊन
नवीनतेकडे वाटचाल करायची असतें!हेचं तर एकता यशबीजमंचं सूत्र आहे!🌹🙏😌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
.... नानाभाऊ माळी
(खान्देश माळी मंडळ,पिंपरी-चिंचवड, पुणे परीसरच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारींनां समर्पित)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२८नोव्हेंबर २०२२
Comments
Post a Comment