दुःख झोपाळ्यावर सुख शोधित हिंडतो आहे!
दुःख झोपाळ्यावर
सुख शोधित हिंडतो आहे
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी
बंध-भगिनींनो!
"माणूस प्रवासी या जगताचा
सुख शोधित हिंडतो आहे
कधी ठोकर बसली दुःखाची
अश्रूमोती सांडतो आहे!🙏
कधी चालत,कधी गाडीवर
कधी बसने हिंडतो आहे
कधी रेल्वे रुळावर चालते गाडी
प्रवास वास्तव मांडतो आहे!🙏
नजरेला कधी हिरवळ दिसते
सुखाऊनी जात मन माझं
कधी पावसाच्या चिंब धारांनी
उसळी घेतं मन माझं!🙏
सुख-दुःखाला साथ घेऊनि
प्रवास चाललाय रोज माझा
अश्रू सांडूनि सुख वेचित
प्रवास चाललाय रोज माझा!🙏
प्रवासाच्या वाटेवर माझ्या
स्व-अर्पित करावसं वाटतं मला
माझ्यातील वाईट गुणांना
निरोप द्यावासा वाटतं मला!🙏
बंधू -भगिनींनो!
मनाला साद घालीत,अनुभवांच्या साक्षीने माझ्या अनुभूतीचा प्रवास सुरु आहे!दुःख वेचिता,सुख वाटीता प्रवास माझा सुरूच आहे!मी सध्या पुण्यातील हडपसर येथे राहायला आहे!गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून एकाचं ठिकाणी राहात आहे!आधुनिकतेचा स्पर्श होऊन देखील आम्ही गल्लीतील चाळीसारखं घरं बांधून राहत आहोत!शेजारी नातलगाहुन जवळचे वाटतातं!असतात!सुख-दुःखात साथीला असणारे शेजारी,सर्व कार्यात धावून येणारे शेजारी हृदयात निवासाला असतात!🌹
एकजीव अशी गल्ली,शेजारी एकमेकांच्या रक्तवाहिन्या आहेत!मंगल कार्याच्या क्षणी आनंद लुटणारे आणि दुःखात धावून जाणारे शेजारी जणू नातलग आहेत!बंधुनो पाच सप्टेंबरला एक दुःखद घटना घडली!करोना सारख्या महामारीवर विजय मिळविणाऱ्या योध्याचे अचानक पाच सप्टेंबर रोजी हृदविकाराने निधन झाले!वय वर्ष बहात्तर असेल कदाचित!हसऱ्या व्यक्तिमत्वाचं निधन झालं!कै रामचंद्र सूर्यवंशी दादांचं निधन झालं!!सकाळी रोज मॉर्निंग वॉकचें सोबती होतो!🌹
सूर्यवंशी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता!तीव्र दुःखाचा आघात होता त्यांच्या कुटुंबावर!भावाहुन जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याने आम्हालाही धक्का बसला होता!नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील 'मुंगसे' गावं त्यांचं!नाती-गोती,भावकी सर्वच गावाला असल्याने त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी गावाला तीनशे किलोमीटर लांब घेऊन गेलेत!🙏
जीवनभर कष्ट करीत,प्रेम पेहरीत, बहात्तर वर्षांचं आयुष्य सत्कारणी लावून एका पुण्यात्म्याचा नवीन प्रवास सुरु झाला होता!त्यांना निरोप देण्यात आला होता!तें वैकुंठीच्या प्रवासाला निघून गेलेत!अनंतात विलीन झालेत! कधीही माघारी न येण्याच्या अटींवर दुर निघून गेलेत!
बंधू -भगिनींनो!
दहाव्याचा विधी 11सप्टेंबर रोजी होता!पुण्याहून मी रात्री दहा सप्टेंबरला लक्झरी बसने निघालो!सकाळी साडेपाचला मालेगावच्या मनमाड चौफुलीला उतरलो!तेथून मुंगसे गावं आग्रा-मुंबई हायवेवर पाच किलोमीटर लांब होत!दहाव्याचा विधी दहा वाजता होता!सकाळी वाहणं नव्हती!मी पाठीवर स्याक अडकवून चालतं निघालो!पावसाचें एखादे दुसरे थेंब माझ्या प्रवासात साथीला होतें!डोळ्यात ही काही थेंब होतें!आग्रा रोडवरवरून मी चालतं होतो!आजूबाजूला अनेक शोरूम नजरेसमोरून मागे जात होती!कुठेतरी शेतात मका आणि बाजरीचं पीकं,कणसे नजरेला मोहवीत होती!हिरवीगार शेती मनाला,डोळ्याला प्रसन्नता देत होती!चालतं "टेहरी"गावाच्या फाट्यावर पोहचलो!कुठे अंघोळीला हॉटेल किंवा लॉज असेल अशी विचारणा केली!एस टी ची वाट बघत थांबलेला एक तरुण बोलला,"काका येथे लॉज नाहीयेत पण एक सांगू कां? येथून टेहरी गावात एक किलोमीटरवर गिरणा नदी आहे!तेथे अंघोळ करा!"🌹
मी त्या तरुणाकडे पाहतचं राहिलो!चार किलोमीटर चालून आलो होतो!पुढे एक किलोमीटर नदीवर जाणे!पुन्हा एक किलोमीटर येथे माघारी येऊन पुढे मुंगश्याला जाणे!तेही चालत जाणे अवघड होतं!सकाळचे फक्त सात वाजले होतें!मी विचार केला,"जायला काय हरकत आहे?"..अन गिरणा नदीकडे चालतं निघालो !एखादी दुसरी सर येतं होती!जुन्या पुलावरून नदीचं पाणी ओसंडून वहात होत!दोन्ही काठ भरून, दुथडी नदी वाहात होती!टेहरी आणि मालेगाव शहराला जोडणारा तो सेतू होता!पूल होता!एक जुना पूल आणि दुसरा नवीन पूल!गिरनामाईचं विशाल,विस्तृत, विलोभनीय रूप डोळ्यांनी पीत होतो!नव्या पुलावरून वाहन येतं जात होती!जुन्या पुलावर मी गेलो!कपडे काढून गिरणामाईच्या कुशीत कित्येक वेळ डुंबत होतो!
गिरणामाईच्या त्या पवित्र तिरी अंघोळीला येणं ब्रम्हदेवाने माझ्या भाग्यात लिहून ठेवलं असेल कदाचित!🌹
नदी तटाववर मनसोक्त अंघोळ करून उगवत्या सूर्य देवाला नदीच पवित्र जल अर्ध्य म्हणून वाहिले!गिरणा माईला नमन केलं!नदीकाठीचं हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!पुन्हा चालतं टेहरी फाट्यावर आलो!आग्रा रोडनें मुंगसेकडे चालतं असतांना एका चहाच्या टपरीवर विचारलं, "दादा मुंगस्याला जायला गाडी किंवा रिक्षा थांबत नाही कां हो?"दादा सहज बोलले,"भाऊ येथून फक्त दिड किलोमीटरचं आहे!थांबा मी एखाद्या गाडीवाल्याला थांबवतो!"मला लाज वाटतं होती!पण काही माणसं फक्त दुसऱ्याला मदतीसाठी जन्माला आलेली असतात!देवरुपी, साक्षात्कारी असतात!आपलं काहीही देणंघेणं नसतांना मदतीचा हात पूढे करीत असतात मी त्या देवरुप व्यक्तींना प्रणाम केला!त्यांनी एका गाडीवाल्याला थांबवून पुढे मुंगशे गावाच्या पाटण्या फाट्यावर सोडवायला सांगितलं!🌹
आपण प्रवाशी आहोत या धर्तीवर!माणुस म्हणून चालतं आहोत!कोणी भेटतो देवदूत येथे चालतं पुढे निघूनी जातो!मला गाडीवाल्या देवदूतानें पाटणा फाट्यावर सोडवलं, ते होतें माहिती कार्यकर्ते श्री.मोरे सर!त्यांचे आभार मानीत पुन्हा एक किलोमिटर आत आड रस्त्याला कै.रामचंद्र दादा सूर्यवंशी यांच्या मळ्यात त्यांच्याच दहाव्याचा विधी होता!
सकाळी दहा वाजता दहाव्याचा विधी पार पडला!देहरूपी व्यापातून कै. रामचंद्र दादा मुक्त झाले होतें!वैकुंठ मार्गाचे प्रवासी झाले होतें!विधी पार पडला!मुलं-मुली अश्रुंधारांनी निरोप देत होती रामचंद्र दादांना!प्रभू श्री रामचंद्रांना देखील संसारी व्यापाचं हे हवेहवेसे दुःख टाळता आलं नव्हतं!11सप्टेंबर रोजी कै.रामचंद्र दादांना साश्रू नयनानीं निरोप देत मी ही प्रवासाला निघालो!प्रत्येक व्यक्ती प्रवासाला निघाली आहे!कोणाचं स्टेशन जवळ आहे,कोणाचं थोडं लांब आहे!सर्व येथेच ठेऊन,मोह मायेचा परित्याग करून अनंताच्या प्रवासाला जायचं आहे!दोन शब्द अमृतात भिजवून चांगलं ते बोलूया!मी पणाचा परित्याग करून सर्वांना आनंद देत पुढील प्रवासाला आमंत्रणा प्रमाणे जायचे आहे!🌹
**************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१३सप्टेंबर २०२२
Comments
Post a Comment