शिरपूर-पुणे एसटीनां परवास
शिरपूर-पुणे एस्टीना परवास
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
...नानाभाऊ माळी
बहीन-भाऊस्वन!
थंडीना कडाका धीरे धिरे वाढी ऱ्हायना बर का!दिन मावतलें नई पन आर्धी-मर्धी रातले थंडी आंगम्हा
नाचालें लागी जास!जथा बन तथा गहू-हरभरा नजरे पडी ऱ्हायनात!जिमीन म्हाईन डोकं वर काढी हाशी-ख़ुशी ऱ्हायनात!हिरवय
टर टर वर यी ऱ्हायनी!!मी भी धुये, देवाभाने,राम-बोरीस,लांमकनी, म्हसाळे,शिरपूर या गावेस्नी हिरवय-सुक्कय डोयावरी पी लिधी!संगयेंल थंडीनी गरमायी लिसनी आज सक्कायम्हा सव्वासव वाजता शिरपूर-पुणे एसटीवर बसनू!🌹
बठ्ठासले गाव जावागुंता एसटीम्हा घुस्न ऱ्हास!जागा भेटो नको भेटो!तरी भी घुसी नींघनं ऱ्हास!मी भी थंडीम्हा पयत उनू!घुसनू!जागा पकडी बसनू!टिंग टिंग वाजताच गाडी हालनी!धुया पावूतं,मव्हरे मालेगाव पावून काय वांधा नई व्हता!मालेगावले येरायेरलें ढकली,व्हडी- व्हाडी,डोकावरना पाईपलें धरी
एसटीनीं बोय भरी जायेल व्हती!सिटे तें बठ्ठा भरेल व्हतात!एसटी गाभन म्हैसनी मायेक फुगेलं दिखी ऱ्हायंती!मन्ही माय खिडकीनां आंगे बठेल बठेल व्हती!मी मझारलां सीटवर बठेल व्हतू!🌹
मन्हा आंगे एक धयडा उना!हुभा ऱ्हायी भाग्ना,माले खेटी बठी ग्या!बठी ग्या तें बठी ग्या माले खिडकीना
गंम चेपी ऱ्हायंता!खिडकी नां गंम आम्हनी माय!तिले भी तक्लिफ व्हये!धल्ला बठी बठी घोरालें लाग्ना!मानले गिरक्या दे आनी मन्हा छातडालें ठोकायें!आपले सहीन करानी आदत पडी जायेल से!कोणी भी येवो आपले तक्लिफ दि जावो!आपुन मुका जित्रबनां मायेक गुच्चूब बठो!कस तरी येवला वूनं आनी धल्ला उठी पयेंत खाले उतरना!एक तोम्हत गयी!🌹
येवला मांगे गये!मन्हा जेवना आंगे बठेल एक धाकली पोरले आशी काय डेंडारनीं उनी!इचारता सोय नई!दुफ़ारले पावनचार व्हयना व्हयी!निक्खारं खादं व्हयी!आशी काय उलटी उनी त्या पोरलें काय सांगो ...पोरनं तोंडं बोंब भरी गये!तोंडंम्हा म्हायन नई व्हनारं!सीटनीं गल्लीमां पिचकारी मारी मोकी व्हयी गयी!एसटीम्हा आंबट वास फैली ग्या!निस्त मयमय करे!वकेलनां
वासम्हा डोक दुखाले लाग्न व्हतं!पन काय करसुत? पोरना बापनी धुडकाघायी पूस-पास,खिडक्या हुघाड्यातं!पन आंबट वास काय जाये नई!तिथलाम्हा शिर्डी यी लाग्न!🌹
शिर्डीथून आखो दुण्यांनी गर्दी घुसनी!आज आयतवार!त्याम्हा एकादशी!शिर्डीलें मंदिर दर्शन लेनारस्नी तोबा गर्दी व्हती व्हयी!एसटीनां सिटे भरेल!बाकींना हुभा ऱ्हायेलं!कोनी पाठ कोना छातीलें लागे,तें कोनी छाती कोना पाटलें लागी ऱ्हायंती!आथा- तथा दोन-दोन सिटेस्नी गाडी!मधमा बोय!सुवास लेवाले जागा नई व्हती!
या गर्दीम्हा शिर्डीथून एक नव जुवान पोर,वय माले वाटस २१-२२वरीसस्न व्हतं व्हयी!बठ्ठासले ढकली मांगे उनी!आनी नेम्मन "महिलांसाठी राखीव!"सीटनां जोगे हुभी ऱ्हायनी!त्याचं सीटवर ज्या पोरनी वकेल व्हतं त्या बाप-आंडेर बठेल व्हतात!नवी जुवान पोर त्या मनोसले सांगालें लाग्नी,"हे लेडीज सीट आहे!उठा तुम्ही!"तो मानोस बोलना,"मी धुळ्याहून बसलो आहे!कसं उठू?"त्या शानी पोरनी कंडक्टर दादा लें सांग,"तें लेडीज सीट आहे!त्यांना उठायला सांगा!"कंडक्टर दादा बोलना,"दिदी!जिथून बस सुरु होते तेथून कोनी लेडीजने आग्रह धरला नाही!गाडीत जागा नाही आपण ऍडजस्ट करून घ्यायचं!"ती भी इरपीरलें पेटेल व्हती!हाक्क से तो भेटालेचं जॉईंजे!तिन्ह भी न्यावतुन व्हतं!पन तो मानुस दुरथीन,धुयाथुन बठेल व्हता!🌹
त्या पोरना डोकावर साईबाबांनी आशीर्वाद देयेंल व्हता!कपायवर चंदन दिखी ऱ्हायंत!देवना आशीर्वाद लिसनी कोनीभी श्रद्धालें भेटी लेस!मन शांत व्हयी जास!पन पोरनी आयकं नई!कंडक्टर दादा किद्रीसनी बोलना,"यें दिदी तु इथं माझ्या जवळ येऊन बस!दोन जनांसाठी सीट आहे!आपन तिघे इथं बसू!"त्या पोरनी लेडीज सीटवर बठेल वांत्या करेल पोरना बापना असा फोटो काढा ज्याम्हा "महिलांसाठी राखीव"हाई भी दिखी!मंग कंडक्टरनां जोगे जायी बठनी!बस मव्हरे सरकी ऱ्हायंती!लोके बसमां बठी मव्हरे सरकी ऱ्हायंतातं!आज शिरपूर-पुणे बस आपला परवास पुरा करी ऱ्हायंती!
पुनाना स्टॅन्डनांगंम एसटी पयी ऱ्हायंती!आनुभवना खजिना दि पयी ऱ्हायंती!💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२० नोव्हेंबर २०२२
Comments
Post a Comment