भेटली उब

भेटली उब
🌹🌷🌷🌹
*************
... नानाभाऊ माळी 

जगणे भक्ती माझी
श्रद्धा फळा आली!
कधी चढ उतारांनी
खूप दमछाकं झाली...!

 खेळ मनाचा खेळता 
 आंसवे गाली आली 
बुडत्या डोळ्यात पाणी 
खळखळून होई दानी...!

एक सूर नकोचं आता 
अश्रूतं भिजूनी घ्यावे
सुख-दुःख दोरीवरती
 कसरती करीत राहावे...!

भेटली मायेची उब 
दूर ढकललें दुःख
सुख पांघरण्या आली 
विठू माऊलीची हाक.....!
******************
💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१२नोव्हेंबर २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)