भाषालें बुर्चडी लेयुत
भाषालें बुर्चडी लेयुत
🌹🌹🌹🌹🌹
**************
... नानाभाऊ माळी
मी से बांगा तुम्हीचं सांगा
भाषा माले कयनी नही
गावगल्ली चौम्हेर फिरनू
तोंडे आजून वयनी नही...!
भाषानी से गंम्मत न्यारी
जित्ती जतन कयी नही
कावड आगये करेंलं घरमां
धुंडी ऱ्हायनात कोरी वही...!
तुटेल संवादन्हा सवाद से
ताबेगहान व्हवावू नही
पाय पडी मान लेवानं
गाडं मव्हरे जावावू नही....!
मुस्सय कुटी उक्खयम्हा
बद्दग भाषानं व्हवावू नही
येरायेरनां झीत्रा व्हडी
घट्यानं पीठ निंघावू नही...!
गुफी गुफी खाटलांनी भाषा
मास्टर डिग्री करील्युत
आख्खी हयाती राबनारास्ना
माने पहिले पाय देवूत.....!
वयख पायेख दखाडीस्नी
मोटमाय आते व्हयी जावूत
न्हानमायनां डिक्राले पहिले
बांग बनी बुर्चडी लेवूतं......!
घाली पाडी बोली बाली
सबदस्ले बायी फुकी देयुतं
कायेजलें घोदा मारी बठ्ठा
कावरायी भाषानां ताटे जेवूत..!
🙏😌🙏🌷😌🙏😌
*********************
.... नानाभाऊ माळी
मु.पो.ता. शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०१नोव्हेंबर २०२२
Comments
Post a Comment