दिवाईनी गोंटीम्हानी पिसोडी

दिवाईनी गोंटीम्हानी पिसोडी 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी 

भाऊ-बहिणीस्वन!
दिवाई सरी गयी!दिवाई लेनदेन करी चालनी गयी!हासी-ख़ुशी गयी!लोके दिवाई करी,गावथीनं जे वाहन भेटनं त्यास्मझार आंग चोरी-चारी सहेरम्हा यी लागात!सुट्या-रजा सरी ग्यात!सहेरम्हा रोजी-रोटी चालू व्हयी 
 गयी!गावं-खेडा खाली व्हयी सहेर भरानं सुरु व्हयी गये!गर्दीमां कोंबाई-कांबाई घरमा घुसनूत!रातनां उजागरा व्हता!थकेल आंग व्हतं!
ठायकाचं बठी....  डोकामां दिवाईनं इचार चक्र सुरु व्हयनं!दखा कसं तें!!!....... 🌷👏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

भाऊस्वन!......
पहिले बदबद पानी पडनां!चिखूल करी ग्या!लवने-खवने,नदया बोंब भरी,काटे काठ व्हात सुटन्यात!मव्हरे जे दिखन त्याले लयी पयेत सुटन्यात!आगा ना पिच्छा बठ्ठ संगे व्हावाडी लयी ग्यात!एखादा गड जिकांगतं!नद्या समुंदरलें भिडी एकजीव व्हयी ग्यात!मांगे मांगे दसरा कव्हयं उना आनी मांगे निंघी ग्या सप्पन दखा सारखा,ध्यानमा उन नयी!मंग दिवाई मांगेथीन उनीउजाये लयी!फटुकडा फोडत!🌹

मोटर गाड्या,खाजगी गाड्या,ट्रका, रेल्वे,यस्ट्या,खाजगी बस जे भेटनं त्यांवर तंनंगी-तुंनंगी लोके दिवाईगुंता गावेसले जायी भिडनातं!
दिवाईनां आनंनं जग दुन्याथिंनं मोठा ऱ्हास!गावकडे घरनास्ना संगे
आनुभवनां आनंनं वाटानं समाधान मोठ्ठ ऱ्हास!माय-बाप,नातंगोतं, भावूभन,सगा-सायीसन्या भेटीगाठी व्हतीस!नव-जुनं नींघस!येरायेरन्या ऱ्हायेलं गोठा ऱ्हातीस!🌹

भाऊ-बहिणीस्वन!
दिवाई चमचम करतं उनी!गोडधोड खावाडी गयी!ऱ्हायेलं-सुयेल कामे उरकी-वारकी गयी!फटुकडा फोडी गयी!दिवाई अंधाराम्हा डोया चमकाडी गयी!लोंग्या फटुकडा फोडी गयी!बठ्ठासंगे दाथड्या काढी गयी!मूक्ल दि गयी!थोडं लयी गयी!
  
नवकरीवाला सहेरथून पिसोडा-बॅगा भरीभरी आपला गावं लयी उतांत!माय-बाप,भाऊ-बहीनगुंता कपडा लत्ता लयी उतांत!गावलें,घर-दारे बठ्ठा नवकरीवाला भाऊ मूक्ल लयी इतिन त्यांगुंता आसं लायी बठेल व्हतात!धल्ला-धल्लीगुंता,काका-काकूगुंता, भाऊगुंता,डीक्रा-डिक्रीगुंता सहेरथून गंजज वस्तू लयी उंतात!सव महिनानं धर-धर्तन लयी उंतात!बठ्ठा पगार-बोनस चालना ग्या!घरलें लागी तो खजिना लयी उंतात!दोन चार दिन गावंन्या गल्लीस्मझार यानंत्यांनं दारे भवडी उंतात!जुना तोंडे नवा करी उंतात!काका-चुलता, नाता-गोतास्ना,शेजाऱ-पाजारं, वावरना बांध शेजाऱ,चौकनां पान टपरीवाला लंगठी दोस्तार आनी व्हयख-पायेखना...बठ्ठास्ना उम्रठ ताजा करी उंतात!नितातेलंनां मायेक घरे पुंजी उंथात!वल्ला-वातड्या गफाड्या हानी उंथात!🌹

कोना घर हासीख़ुशी उनात!कोनले आधार दि उनात!कोनंघरं खावाले उठी ऱ्हायंत तठे डोया वल्ला करी उनात!कोनं तिरप तारपं मोजी उनात!हात दि उनात!गंजज घरेंस्मा कपास्या भरेल दिखन्यात!बाजरी जीवारीन्या पोतंड्या भरेल दिखन्यात!आबादनी दिखनात!कोनां पिके पानीम्हा सापडी गयेतातं!सोताना हातघायी,मूठघायी वावरम्हा पहिरेलं पिकं व्हतं,कायेजथून जपी वाढायेलं व्हतं!त्याले जीव लावा व्हता!आंडेर-आंडोरंनां मायेक जीव लायी समायेलं व्हतं!मोठ्ठ सप्पनं दखेलं व्हतं!आंन्नाडू पानडुब्या
 पानीनी बठ्ठ बठ्ठ धुयीधानी करी टाकं व्हतं!पिके पानीमां झेपी ऱ्हायंतातं!पाऊस नबेदा व्हयी ग्या!त्यास्ना डोयास्ना आंसू पुसालें जायी उंथात!

दिवाईम्हा बांधे-बांध वावरेधुंडी उनात!माय-बापलें वावरेस्मा हात-भार लायी उनात!नागे पाय भवडी उनात!वावरे दखी उनातं!
नरम-गरम दखी,निस्तायवार बोली उनात!दिवाईनां बठ्ठा आनंभव, आंसू-हासू हिरदनी गोंटीम्हा दाबी दुबी भरातं!ठोसी-ठोसी भरात!व्हडी-व्हाडी कोंबातं!सुतईघाई शिवातं!हिरद धाकल व्हतं!डोये-काने -मुखे आयकेल मूक्ल व्हतं!गंजज... गाव,घर,माय-बाप,भाऊस्ना पांटा मोठा व्हतात!स्याई सरेलं व्हती!पांटा भरेल व्हतात!गोठ गुफेलं व्हती!खोल व्हती!लांबी व्हती!पांटा सगर व्हयी खडगनं पंघरेलं दिखनात!खरबूड्या व्हयी दूर दूर जात दिखनांतं!सगरनं खडगनं तय पायलें टोचातं ऱ्हायनं!मन बोचातं ऱ्हायनं!हिरद भिंजात ऱ्हायनं!🌹

भाऊस्वन! 
दिवाईनां गोड धोड जेवने पोटभरी खावांयी ग्यात!कटाया येवालोंग भवडनात!दिवाई सरी गयी!फटुकडा सरी ग्यात!सण दिनसंगे मांगे निंघी ग्या!सुटी सरी गयी!काम बलाई ऱ्हायंत!सहेर पोट भरागुंता बलाई ऱ्हायंत!गावलें एक एक दिन तासवरं पयेत ऱ्हायनात!दिवाईनां आनंनं वाटी-उटी,बठ्ठासले भेटी,नींघांनां दिन उगी ग्या!धल्ला धल्लीनां पायस्वरं डोक ठेवं!त्यास्ना खरबुड्या तय हात बखोटा उखली तोंडं-गालें खांदंवर फिरतं ऱ्हायनात!कस्टानां हात खरबुड्या व्हतात!त्या हातस्मा हिरदनी मया व्हती!कयकयनी हाक व्हती!दूधवरनी साय व्हती!🌹
 
बहीन-भाऊस्वन!
दिवाईलें!गाव जावानं येलें,दिवाईनां
आननं व्हता!हारीक व्हता!दिवाई करी गावथीन मांगे नींघाँनां येले मातरं...मन आडकी ऱ्हायंत!जीव आडकी ऱ्हायंता!पाय मांगे व्हडायी ऱ्हायंतातं!मायमाटी पाय उखलू दि नई ऱ्हायंती!पन..पन.. पोट मव्हरे व्हडी ऱ्हायंत!पोट आनी मनन्हा खे चालत ऱ्हायनां!पाय पोटगुंता सहेरनांगंम व्हडातं ऱ्हायनात!🌹
 
जी गाडी भेटनी त्याम्हा आंग टाकी दिन्ह!मन गावलें व्हडात ऱ्हायन!पाय सहेरनांगंम व्हडात ऱ्हायनात!गावंलें धाकली पिसोडी भरी लयी गयथुतं!गावथीत सुख-दुखनां वानोया गोंटभरी लयी वूनूतं!गोंटाम्हा थोडंसं सुख व्हतं बाकी ऱ्हायेलं दुखना वाला वाला पुडा ठेयेल व्हतात!काही पंधा व्हतातं!आथा तथा जुडी ऱ्हायंतातं!बठ्ठ... बठ्ठ..दाबी-दुबी भरेल व्हतं!त्याम्हा पिकं पानी व्हतं!मजुरी व्हती!वल्ला दुस्काय व्हता!सडी जायेल पिके व्हतात!धल्ला धल्लीनं कस्ट व्हतं!भाऊस्ना रुसवा-फुगवा व्हता!येरायेरंनां बांध कोरेलंनां झगडा व्हता!भाऊ-बहिणीस्नी जीव भावनी मया व्हती!पेरेम व्हतं!गोंटीम्हा बांधवरनां समायिक झाड तोडानां पुडा व्हता!वाला वाला गंजज पुडा व्हतातं!मोजानी येय नई व्हती! करंकच्ची बांधेल सुतंयीनी गाठ तुटीसनी,गोंटामायीनं वर येवागुंता कायपात चालू व्हती!सुतयीनी गाठ नेम्मन बांधेल व्हती!...🌹

आम्ही गावलें लयी जायेल पिसोडी
आनंनंन्ही व्हती!गोडधोडनी व्हती!कपडा लत्तास्नी व्हती!गावंथीन
नींघानं येलें बुचडी बांधेलं गोंटानां सिधा-शिदोरी गंजज दिन सहेरम्हा पुरनार व्हती!लाई लाई खात पुरनार व्हती!त्याम्हा कायेजनां बोल व्हतात!सवाद व्हता!शिदोरी व्हती!लायी
लायी पुरनार व्हती!🌹

... सुख-दुखन्या बठ्ठया पिसोड्या-गोंटा जिंदगीनं सिधा सेतस!जिंदगी मव्हरे सरकत ऱ्हास!सिधा सरत ऱ्हास!पिसोडया-गोंट्या बदलत ऱ्हातीस!पुल्ली पिढी हायी बठ्ठ वयीनवर वायी ठेवतस!आडचिनमां फेकी देतीनं!पुल्ली पिढी सहेरनी व्हयी जास!गावं मांगे पडी जास!गावनी वयख धुंदंली व्हयी जात ऱ्हास!गावनं गावपनं इसरी जातंस!जिंदगीनी नाव मव्हरे सरकत ऱ्हास!गावं-सहेर काला मोडी एक व्हयी जास!पोरे शहरना व्हयी जातंस!मांगली पिढी खपी जास!... दिवाई आखाजी जागावरचं ऱ्हायी जास!
🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
परवासमुये थकानं यी जायेल व्हतं!डोया कव्हयं लागी ग्यात कयन नई!खटलानी हालायी जागे कर, "पडी ऱ्हाशात का? दुपार पायी से!कामले जान से ना????"पोटना प्रश्न मोठा व्हता!आते कामले नींघनं व्हतं!🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता शिंदखेडा, जि. धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-३० ऑक्टोबर२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)