भाऊबीज!पाडवा!बलिप्रतिपदा दान!

भाऊबीज!पाडवा!बलिप्रतिपदा दान
🌷🌹🪷🌷🌹🪷🌷🌹🪷
**************************
... नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

दिपावली प्रकाशाची ओळख आहे!उजेडाची ओळख आहे!काळ्याकुट्ट अंधारात उजेडाचा अस्तित्व आहे!
दिपावली ज्ञानदानाची जननी आहे!
दिपावली प्रभू श्रीरामाची स्वागत प्रकाशज्योती आहे!दिपावली आनंदोत्सव आहे!🌹

आज भाऊबीज आहे!आज पाडवा देखील आहे!आज दिपावली आहे!आज अभ्यंग स्नानाचा दिवस आहे!आज बलिप्रतिपदा आहे!आज ओवाळण्याचा दिवस आहे!दोन मुहूर्त एकत्र आल्याचा सुंदर संगम आहे!बहिणीने भावाला ओवाळण्याचा दिवस आणि पत्नीने पतीला ओवाळण्याचा योगायोग आहे!🌹

ओवाळणी प्रेम भावनेची जाणीव करून देत असतें!पवित्र नात्यांना घट्ट धाग्याने बांधणारा सुवर्ण क्षण असतो!आज बहिणी भावाच्या
दिर्घायुष्यासाठी मागणी करतातं!पत्नी नवऱ्याच्या अखंड आयुष्यासाठी ओवाळणी करतात!अंतरीच्या धाग्या धाग्याने घट्ट बांधलेली ही नाती सुख आणि आनंदाची मागणी करतात!मागणी आग्रहाची असतें!हृदयातून असतें!विणलेलें धागे पवित्र संबंधानां
नाविन्यांची झळाळी देत असतात!अंधार सोडून उजेडाच्या दिशेने हा प्रवास असतो!🌹

पहाटे लवकर उठून अंगणात विविध रंगी,विविध ढंगी रांगोळी मन मोहून घेत असतें!रांगोळी विविध कलाकृतीचा संगम असतें!पूर्वेला तांबूस फुटलेलं असतं!रांगोळी आकार घेत राहते!प्रसन्नतेच्या किलबिलटाने पहाट उजळत राहते!उगवतीचा तांबूस गोळा रांगोळी पाहण्यासाठी उतावीळ झालेला असतो!दारा दारातल्या,अंगणातल्या रांगोळ्या उगवतीच्या सोनेरी किरणांनी उजळून निघतात!रंगसंगतीच्या कलाकृतीने रांगोळी दारात,अंगणात हसत राहते!रांगोळी काढणारी नारी सूर्य दर्शनाने सुखावते!घर सुखावतं!सुखावणाऱ्या आनंद लहरी घराला घरपण देत
पावित्र्याच्या गर्भात चंदनी सुहास देत राहातात!दिपावलीच्या मंगल क्षणांनी सकाळ स्वागत करीत असतें!🌹

आज पाडवा आहे!आज भाऊबीज देखील आहे!अभ्यंगस्नानाची लगबग सुरु आहे!सुगंधी उटणे अंगाला सुगंध देत आहे!पत्नीच्या हातातील उटण्यानें पतीचं अंग घासलें जातंय! न्हानीघर सुगंधित झाले आहे!आज पाडवा आहे!🌹

दूर सासरी गेलेली बहीण घरी आलेली आहे!आज भाऊबीज आहे!भाऊबंहिणीच्या पवित्र नात्याला
ताटातील उजळणाऱ्या ज्योतीची साक्ष आहे!ओवाळणीने भावाच्या
दिर्घायुष्याची मागणी आहे!माहेरी बालपणीच्या दिवसांची आठवण आहे!दिव्यज्योतीने बहीण ओवाळते! भाऊ पाठीराखा म्हणून देवाला आळवणी करते!भावाला ओवाळून त्याच्या सुखाची,समृद्धीची,आनंदाची मागणी बहीण करीत असतें!उजळणारी दिव्य ज्योत साक्षीला आहे!बहीण काहीच मागत नसते!भाऊ सुखी रहावा!संसार सुखाचा होत रहावा हिच दिर्घायुष्याची मागणी बहीण करीत असतें!प्राचीन काळापासून टिकून असलेलं नातं
पावित्र्याच्या मंगल शिखरावर पोहचलेलं आहे!भारतीय संस्कृतीच्या भक्कम पायावर बांधलेलं नातं कितीही वादळ आली तर कधीही ढा साळणारे नाही!प्राचीन परंपरेची देणगी नात्याला उजाळा देत असतें!

आजच पाडवा देखील आहे!पती पत्नीच्या समर्पित भावनेची आंतरिक ओढ रद्धिंगत करणारा  पवित्र दिवस पाडवा आहे!पत्नी पतीला ओवाळून अखंड सौभाग्यवतीचा वर मागत असतें!एक जीनसी,एकांग असलेलं  नातं समाज रचनेचा घट्ट पाया आहे!आज पाडवा आहे!सुख दुःखात, कुठल्याही प्रसंगी सावलीसारखी साथ देणारी, उभी असणारी पत्नी स्वतःचं अखंड सौभाग्याची मागणी मागत असतें!मनोभावे ज्योती साक्षीने नवऱ्याला ओवाळत असतें !त्याच्या कपाळी टिळा लावत असतें !स्वतःला समर्पित करते!त्याच्या कुशीत समर्पित होत असतें!भावभानेच्या वादळाला सामोरी जात असतें!आज दिपावली पाडवा आहे!पती-पत्नीच्या अग्नीसाक्ष पवित्र बंधनाची ओळख आहे!🌹

आज बलिप्रतिपदा देखील आहे!
बळीराजाने तिन्ही जगावर राज्य केले होते!न्यायप्रिय राजा बळीनें गोरगरिबांच्या साथीने आपलं राज्य स्थापन केलं!बळीराजा अखंड मानव जातीचा राजा होता!कष्टकरिंचा राजा होता!एकवचणी राजा होता!हृदयातून दान देणारा राजा होता!सर्वसामान्यांचा राजा होता!बळीराजा लोकप्रिय राजा होता!शेतकऱ्यांचा राजा होता!अशा महान राजाचं राज्य यावं!बळीचं राज्य यावे म्हणून कष्टकरी समाज ज्यांची मागणी करतात त्या बळीराजाची बलिप्रतिपदा आज आहे!त्याची स्मृती कष्टकऱ्यांच्या अंतःकरणात आहे!.. म्हणूनच म्हणतात 'इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो!'🌹

योग हा योगायोगाने जुळून येतं असतो!आनंद घेऊन येतं असतो!आनंद पंख लावून हिंडत असतो!
दिपावली आनंदाचा सण आहे!सण दान देऊन जात असतो!माणसं जोडून जात असतो!हृदय जोडून जात असतो!मन पवित्र धाग्यांनी बांधलं जात असतं!सणानिमित्त कित्येक कष्टकरी,नोकरदार आपल्या गावी जात असतात!शहरात कमविलेलं गावाला जाऊन हृदयातून वाटीत असतात!आनंद द्विगुणित करीत असतात!दिपावलीत धडधड चालणारी यंत्र नगरी शांत होते!विसावतें!एसटी,रेल्वेने, अन्य अनेक वाहनांनी कष्टकरी माणूस आपल्या गावी पोहचतो!वर्षभर ओस पडलेली गावं गजबजून जातात!गावखेडी उत्साहाने भरून जातात!घर लहानासापासून मोठयापर्यंत आनंदून जात असतं!गावखेडी ओथंबून वाहू लागतात!🌹

दिपावली आनंदपर्व आहे!उत्साहपर्व आहे!नाविन्याची जननी आहे!पवित्र नात्यांची ओळख आहे!दिपावली सुखपर्व आहे!ज्यांच्या ताटात नाही त्यांना देण्याचा उत्सव आहे!ज्यांच्या पोटात नाही त्यांना दान देण्याचा भारतीय सांस्कृतीक सण आहे!दिवाळी दृष्टी देत असतें!शिकवण देत असतें!माझ्या भरलेल्या ताटातील दुसऱ्याला दिलें तर त्याच्या चौपट भरपाई ईश्वरी कृपेनें आपल्याकडे येतं असतं अशी समजूत आहे!🌹

प्रत्येकाने आपल्या वाट्यातील, हिस्यातील काही दान गरजूनां देत राहायचं!त्या दानाचं मोल नोंदवलं जात असतं!दान महर्षी विनोबा भावेंसारखे असावे!दान महाकर्णासारखे असावे!दान राजा हरिश्चंद्रासारखे असावे!दान रतन रतन टाटांसारखे असावे!दान अजीम प्रेमजी सारखे असावे!दान एकलव्या सारखे असावे!दानी दानाने श्रीमंत होत असतो!दिपावली प्रकाशदान करीत असतें!प्रत्येक व्यक्ती या
आंदोत्सवात दानी झाला पाहिजे!झोपडीत,रस्त्यावर जगणारे सुद्धा आनंदी झाले पाहिजेत!त्यांच्या आंतरीक आशिर्वादाची किंमत अनमोल असतें!भारत देश ज्ञानदानी आहेच!विचार संस्कारदानी देखील आहे!सुंदर प्रकाश स्वप्नांची देणगी देणारा दिपावली सण गोरगरीबांचा दाता झाला पाहिजे!🌹

आज दिनांक २६ऑक्टोबर रोजी त्रिगुणी संगमावर उभे आहोत!बलिप्रतिपदा!भाऊबीज आणि पाडव्याच्या आनंद प्रकाशात न्हाऊन निघणाचा अविस्मरणीय क्षण आहे! आपणा सर्व स्नेहीजनांना!आप्तानां!गुरुजनांना!बंधू-भगिनींना या प्रकाश पर्वात न्हाऊन निघण्यासाठी हृदयातल्या अनंत शुभेच्छा देतो!🌹
************************
🌹🌷🌷🪷🪷🌷🌷🌹
         🎇🌃🎇🔔
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२६ऑक्टोबर २०२२
       (दिपावली पर्व)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)