निर्मितीत विलंय होऊ द्या

निर्मितीत विलंय होऊ द्या
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
... नानाभाऊ माळी

बंधू -भगिनींनो!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

.....निर्मिती आणि विलंय जन्म
मरणाच्या संकल्पना आहेत!सुरुवात प्रफुल्लित असतें!शेवट करुण - दु:खदायी असतो!निर्मिती आणि शेवटामधील अंतर मोजण्याचं माप कार्याचा आलेख दाखवीत असतो!... कवी,लेखक,चित्रकार अन आध्यात्मिक प्रज्ञावंतांनी प्राचीन काळापासून हा आलेख आपल्या प्रतिभेतून चितारला आहे!जसा भावला तसा चितरला आहे!प्रत्येक जीवांच्या उगम-विलयाने सृष्टी संतुलन टिकून आहे!ही सर्व जैविक प्रक्रिया पृथ्वीच्या निर्मितीपासून सुरूच आहे!

जन्म घेणारा एक दिवस निरोप घेणारं असतो!ही वास्तव आणि कल्पनातीत प्रक्रिया मांडणारा साहित्यिक जगाचा भाट म्हणून कार्य करीत आला आहे!संदर्भ पुढील पिढीच्या स्वाधीन करीत आला आहे!वास्तव कल्पना विस्तार साहित्यिकाच्या विस्तारवादी संकल्पनेतून जन्म घेत असतें!कल्पनेची मोहमयी जादू समस्त दुनियेला आकर्षित करीत आलेली आहे!वाचक,रसिक भूमिकेशी समरस होत असतात!ती भूमिका वास्तवात जगण्याचा प्रयत्न होत असतो!चाहत्यांचा विशिष्ट गट निर्माण होत राहतो!फॅन मोहमयी दुनियेतून वास्तवात तसे वागण्याचा प्रयत्न करू लागतात!यश अपयश स्वतःकडे घेत निर्मितीकाराचें पक्के समर्थक होऊ पाहतात!🌷

निर्मिती निर्मात्याचं लाडकं अपत्य असतं!आपलं शेबंडं असलं तरी हृदयाहुन प्रिय असतं!प्राचीन काळापासून निर्मितीचा ध्यास घेतलेल्या निर्मितीकारांनी आपल्या साहित्यकलेंतून रंजन केलेलं आहे!भक्तीमार्गातून,चित्रकलेतून,
मूर्तीकलेतून निर्मिती होत राहिली!साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत रुजत राहिलं!झिरपतं राहिलं!कल्पनेला पंख फुटत राहिले!विस्तार होत राहिला!विपुल लेखनातून सर्वांगीण निर्मिती होत राहिली!साहित्यावर प्रेम करणाऱ्यां रसिकजनांची संख्या वाढत राहिली!कालखंड येत असतात!जातं असतात!निर्माता जन्म घेऊन, निर्मिती मागे ठेवून विसावतो!
नावलौकिक होऊन निरोप घेत असतो!अजरामर कलाकृतीचा आस्वाद येणारी पिढी घेत असतें!🌹

कवी!लेखक!चित्रकार!शिल्पकार!संगीतकार मानवी मनाचे जादूगार असतात!आपल्या शब्दलालित्यातून, शिल्पातून,चित्रातून,शब्दसिद्धीतून महत्वपूर्ण संदेश देत असतात!आपल्या निर्मितीतून संदेशवहन होतं असतं!रसिकजन मंत्रमुग्ध होत राहातात!मानवी मन..या निर्मितीतं गुंतून पडतं असतं!एकजीव होऊन जातं असतं!त्यातून आदर्श जन्माला येत राहातात!श्रद्धारुपी आदर्श रसिक मनातील गाभारा होऊन जात असतो!गाभाऱ्यात मन एकचित्त होऊ लागतं!...जन्म मरणाचे उद्धेश कळू लागतात!अर्थ समजू लागतात, कळू लागतात!आपल्या जन्माचा शोध सुरु होतो!बोध घेत,जीवन उद्दिष्टांकडे वाटचाल होत राहते!समारोपातून सूर्य मावळल्याचा अर्थबोध होत राहतो!मनुष्य जन्माचा अर्थ साहित्य उलगडू लागतं!पाने भराभर मागे जाऊ लागतात!प्रत्येक पानावरील अर्थ समजू लागतो!पाने उलगडतं राहातात!..🌹

वर्तमान भूतकाळाकडे सरकत राहतो!भविष्याची जिज्ञासा मनाला हुरूप देत राहतें!साहित्य जीवनाचं अभिन्न अंग होऊन बसतं!जीवन किल्ली वाटायला लागते!किल्लीने साहित्य उघडतं राहायचं!जीवन उघडतं राहायचं!साहित्य आरसा होऊन बसतो!मनुष्य त्यांत आपलं प्रतिबिंब पहात राहतो!संदर्भ कळू लागतात!सूर्य उगवल्याचा भास होत राहतो!दुपार कधी झाली कळत नसतं!दुपार निसटून जाते!निराश संध्याकाळची भेट होते!मावळती सोबत चलबिचल सुरु होते!मन निरस,निराश होऊ लागतं!🌹

आपण अंधःकारात स्वतःला शोधत राहतो!शोध कसला? तर मी कोण आहे? कसा जन्मलो?जन्मूनी पुन्हा त्याग आहे!जीवनाचा!देहाचा!मनाचा!मग आसवांच्या गर्तेत विलयाची घाई सुरु होते!.. निर्मिती,निर्माता एकजीव होऊ पाहतात!.. अर्थ सापडत नाहीत!अंधार पांघरून निर्मितीचा प्रवास चालूच आहे!.. मी मलाच शोधतो आहे!मी नानाभाऊ माळी!!कोणी नाव ठेवले मला?? माझी ओळख राहावी म्हणून??पांघरलेल्या अंधारातून नवं उजेडाकडे आस लागली आहे!मी मलाच आता उलगडतो आहे!..🌹

झाले बहू आता नको तें मागणे
उद्धीष्ट जगणे नकोचं आता
 फटकाऱ्यांनी दुःखी झालेतं कोणी
तुझे माझे म्हणणे नकोचं आता..!

उदरास वेदना देऊनी मी आलो
उजेड पांघरणे नकोचं आता
भास आभासांशी खेळतो आहे
स्वतःसं लपविणे नकोचं आता...!

मी स्वार्थी,गर्भास दोष देतो
खोटेनाटे नाटक नकोच आता
आनंद उगवतीचा घेतला तेव्हा
मावळतीचा अस्त नकोचं आता!

माझीच श्रद्धा दूर जात आहे
गाभाऱ्यात थांबणे नकोच आता
आपुलेचं म्हणुनी जपत होतो
खूप परके होणे नकोचं आता..!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२३ऑक्टोबर २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)