चळवळ शोध बोध

चळवळ शोध बोध
(सत्यशोधकी समता परिषद) 
            (भाग-०२)
****************
🌹🌹🌹🌹🌹
बंधू-भगिनींनो!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!....
चळवळ श्वास असतो साध्यासाठी!चळवळ जगण्याला दिशा देत असतें!चळवळ रक्तात भिनल्यावर समर्पित भाव जन्म घेऊ लागतो!वाटेल ते झालं तरी चालेल पण मार्ग सोडायचा नाही असा ठाम विश्वास आणि श्रद्धा असणाऱ्या व्यक्ती आदर्श निर्माण करीत असतात!व्यक्तींची!संघटनांची!संस्थांची ओळख चळवळीतून होतं असतें!एकाचं कित्येक काळ साचलेलं पाणी सडतं सडतं!ते प्रवाहीत असावं लागतं!चळवळ प्रवाहीत होणे शिकवीत असतें!🌹

समतल!समानता!समसमान वाटप असेल तर सर्वचं ठिकाणी शांतीची! सुखाची!आनंदाची सुंदर बाग फुलतं असतें!एका माता पित्याची सर्व भावंड सुखाने संसार करतात!तसंच सामाजिक,आर्थिक,राजकीय, धार्मिक ठिकाणी समान न्याय मिळाला तर व्यक्ती आणि संघटना यांचा जन्मचं होणार नाही!विषम वाटप झाल्यावर,अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चळवळीचा जन्म होतो!विरोधाभास असेल तेथे चळवळ उभी राहते!न्याय हक्कासाठी वंचित समाजाला जागृती करण्यासाठी चळवळ जनसागर बनत असतें!🌹

भारतात निशस्त्र चळवळींनी जगाला आदर्श घालून दिलेला आहे!वंचित घटक एकसंघ झाल्यावर समाज माध्यमातून तिची दखल घेण्यास भाग पाडले जाते!वंचितांच्या न्याय हकांसाठी लढा लढणाऱ्या चळवळीतून सामाजिक,आर्थिक लाभार्थी होण्याचा आदर्श काही महान व्यक्तिमत्वानी दिलेला आहे!गत काळात शिक्षणाचा उजेड दाखविणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे वंचित घटकांसाठी देव आहेत!त्यांचाच आदर्श चालवीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांसाठी आपलं आयुष्य दिलं!विषमता विषारी लागलेली किड असतें!वेळीचं त्या किडीचा बंदोबस्त केला नाही तर समाज या किडीचा बळी होतो!चळवळ लढ्याला बळ देत असतें !ऊर्जा देत असतें!शक्ती देत असतें!चळवळीचं नेतृत्व करणारा त्यागी व्यक्ती चळवळीचा श्वास होतो!🌷

"समतापरीषद" चळवळ आहे!बहुजनांची चळवळ आहे!वंचितांची चळवळ आहे!न्याय हक्कासाठी प्रेरक चळवळ आहे!प्रबोधनकारी चळवळ आहे!सत्य शोधनाची चळवळ आहे!सामाजिक, आर्थिक,राजकीय हक्क मिळविणासाठी उभी असलेली चळवळ आहे!समता परिषदेचे संस्थापक आदरणीय भुजबळ साहेब सर्व वंचित समाजाचे श्रदास्थान आहेत!समता परिषदेच्या माध्यमातून भारतभर चळवळ उभी करून बहुजनांना जाग आणण्याचं महान कार्य केले आहे!करीत आहेत!

सर्वमान्य व्यक्तिमत्व आदरणीय छगनराव भुजबळ साहेब दृष्टी देणारे महान नेते आहेत!अलौकिक दैदिप्यमान कर्तृत्व शिखर आहेत!बहुजनांना एका माळेत ओवूणारे आहेत!बहुजनांची मोळी बांधणारे विशाल नेतृत्व आहेतं!आपल्या न्याय हक्कासाठी विशाल जनसागर गोळा करणारे बहुजनांचें श्रद्धास्थान आहेत!त्यांनी महात्मा फुलें, छत्रपती शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या यज्ञकुंडात स्वतःसं समर्पित केले आहे!मानवतेच्या निरपेक्ष मूल्यांचं रक्षण होण्यासाठी भारतभर चळवळ उभी करणारे अंधःकारातील सूर्य आहेत!धाडशी आणि संयमी नेतृत्व आहेत!

महाराष्ट्रात समता परीषदेची विचारधारा खोलवर रुजली आहे!सत्यशोधकी समता समाजाच्या मनामनात रुजली पाहिजे तरचं लोकशाहीतील राजकीय,सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळू शकतील हा ठाम विश्वास असणाऱ्या शीर्ष नेतृत्वाची पाउले पुढे सरकत आहेत!

समता परीषद महाराष्ट्रात राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय नेतृत्व कार्यरत आहेत!जुन्या जानकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसमिती कार्यरत आहेत!महात्मा फुले यांनी २४सप्टेंबर १८७३साली सत्य शोधक समाजाची स्थापना केली होती!शतकमहोत्सवी सुवर्ण वर्षांतं पदार्पण करणारी खूप जुनी संस्था आहे!यानिमित्ताने दिनांक २०ऑक्टोबर रोजी समता परिषदेच्या  पिंपरी-चिंचवड महानगर कार्यकारणीने अर्थात अध्यक्ष चंद्रशेखर भुजबळ कार्याध्यक्ष पी के महाजन, सचिव राजेंद्र करपे,
महिलाध्यक्षा वंदनाताई जाधव,कार्याध्यक्षा कविताताई खराडे यांनी चिंचवडमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता!बहुसंख्येने उपस्थित कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांची देखील नेमणूक झाली होती!

कार्य करणाऱ्यास पद मिळत असतं!मागून पद मिळत नसतं!समता परिषदेचा मुलमंत्र जपणाऱ्या!निष्ठा बाळगणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पद नियुक्तीपत्रे देण्यात आली!स्वयंस्फूर्तीनें चळवळीत आलेले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी झाले!त्यांत प्रातिनिधिक स्वरूपात काहींची नावे घेणं कर्मप्राप्त समजतो श्री. नकुल महाजन-उपाध्यक्ष,श्री.रमेश सोनवणे-उपाध्यक्ष,श्री. सुधीर महाजन-सरचिटणीस,श्री.प्रशांत महाजन-सरचिटणीस,श्री. जितेंद्र चौधरी-का.सदस्य!समताधिष्ठित मूल्य पाळणाऱ्या,ध्येयमार्गांवर चालणाऱ्या चळवळी जिवंत असतात!समाज आणि व्यक्तींचा श्वास होतात!समता परीषदेची चळवळ बहुजनांच्या कल्यानासाठी उभी आहे!सत्यशोधकी विचारांवर उभी आहे!बहुजनांना संघटित करून  न्याय हकांसाठी उभी असलेली चळवळ यशस्वी होतं शिखराकडे निघाली आहे!ध्येयाकडे!साध्याकडे वाटचाल करतं राहो याचं मनःपूर्वक शुभेच्छा!🌹
**********************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२२ऑक्टोबर २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)