शब्द बेगडी होतात नागडी सोडून देती लाज
शब्द बेगडी होतात नागडी सोडून देती लाज
🌹🌷🌷🌷🌹🌹🌷🌹
************************
... नानाभाऊ माळी
"शब्द बेगडी होतात नागडी
सोडूनि देती लाज
रात्र झाकती पौर्णिमेची
चढवूनी घेती साज.........!
शब्द वेगळे अवकाळीचे
धो धो पाऊस होऊनि येती
कधी दुष्काळातं गिधाडांना
शब्द मेजवानी देऊनी जाती..!
शब्द आता रोबोट झालें
सोईचें अर्थ शोधूनी देती
भावनाहीन हृदयाला शब्द
जोडोनी देतांत नाती........!
शब्दपिसाट माणूस होतो
खोल चावा घेऊनि जातो
जखम खोलवर चिघळत जातें
कुत्रा व्रण ठेऊनी जातो......!
शब्दांचे हे फुकट देणे
कुणाला पाहिजे असतं
कुचाळ चेष्टा उतावीळ
कुण्याच्या ध्यानीमनी नसतं...!"
बंधू-भगिनींनो!
शब्द उत्पादीत करण्याचं!शब्द बनवण्याचं!शब्द गोळा करण्याचं अन शब्द साठवण्याचं यंत्र आपल्या जवळ असतं!बुद्धी त्याचं नाव असतं!भावनेची झालर लावायची असतें!यांत्रिक शब्द बुद्धीतून भराभरा बाहेर येत असतात!अंडी उबवणी केंद्रासारखे शब्द जन्म घेत असतात!भावभावनेच्या दलदलीतील शब्द कृत्रिम होतं असतात!कृत्रिमतेच्या जमान्यात संवेदना बधीर होत जातांत!शब्द हृदयी भिडण्यास डोळ्यात अश्रू ही नसतात!डोळ्यात येतं पाणी,तेव्हा नाटक केलं असतं!भावभावनेच्या किनाऱ्याला अश्रू सुकलेले असतात!🌹
शब्दांच्या महापुरात कित्येक कविता वाहून गेल्या!शब्दांच्या आगीत कित्येक रचना खाक झाल्या!सत्य वास्तव लिहिणारे दूर विस्मृतीत निघून गेले!शब्द वाचा म्हणणारेही जगात कुठे लुप्त झाले?शब्दांच्या बाजारात आता कृत्रिम बेगडी प्रेम आले!धंदा शब्दात लपेटून कित्येक पुढे निघूनी गेले!अस्सल मातीचें शब्द पाठीमागे राहुनी गेले!शब्दांच्या बाजारात कोणी अगतिक हो झाले!उत्पादीत शब्दांच्या आवकनें अवघे नाले भरुनी गेले!फेसाळलेल्या रसायनी शब्दात अवघे हृदय रोगी झाले!🌹
"अस्सलतेचा बाज कुठे हो?
सेंद्रिय गाडूनि झाला
शब्दसुफला निकस पोसला
टरारुनी वर आला........!
सोने पेहरीत जाणाराही
मध्येच लुप्त झाला!
लोखंडाला देऊनी मुलामा
शब्द सोनेरी झाला........!
टिकाऊपणाचा बहाणा करुनी
शब्द गद्दार झाला!
सोन्याला हो कस लावीता
मुलामा वितळूनी गेला.......!
शब्द बेगडी हसरा चेहरा
रस्त्यावर घात झाला!
रसायनी शब्दात डुंबवूनी
त्याचा जयजयकार केला....!"
शब्द शेतात तृन उगवलें फोफाऊंनी मोठे झाले!रस ओढीत शब्दपिकांचे पेहरलेलेचं नेले!तृन इतुके वाढत गेले शब्द कोमेजुनी गेले!एक दुसरें शब्द दिसती साऱ्या तृणात वाढलेले!झाडा फुलांचा रस शोषूनी परजीवी चढलेले!परजीविंची मज्जाच न्यारी कष्ट उपसती कोणी अन फुकाणे राज करतेयं राणी!शब्द तृनांचें स्तोम माजले शब्दगुणचं नाहीसे झाले!अतिक्रमणे शब्दभोंग्यांचे कानंठळी बसवूनी गेलें!अस्सलतेचे शब्दसार तें जागीच फसवूनी नेले!शब्द फोफावाला बेगडी जगातला हसूनी दाद देती!वास्तवाचं दर्शन करवणा ऱ्यासी हळूच पकडूनी नेती!खोटेपणाचें नाटकी शब्द म्हणती सौभाग्यवती!बोल पोपटी हास्य गुलाबी शब्द मुखात नं मावती!🌹
शब्द कधीतरी हत्यार होतात तोडूनि जातात नाते!कधी नं विसरण्या खोल जखम मनात चिघळत राहते!तुटणाऱ्यांना तोडीती शब्द कुऱ्हाड होऊनि पाहते!तोड फोडीतूनी करिती राज्य शब्द गिळू पाहते!🌹
बंधू-भगिनींनो!
शब्दांची महामूर उत्पादन येत आहे!आपल्या बुद्धी यंत्रातून नको तें पहात आहे!शब्द भेदातून नको तें केलं जातं आहे!बीज धूर्तबुद्धीत रुजत आहे !नको तेव्हा अवकाळी जन्म घेत आहे!तृनगत टराटरा तेव्हा वाढत आहे!एका साच्यातं बसवून जन्म घेणारं उत्पादन दर्जेदार असतं असं म्हणतात!अलीकडे अशा उत्पादनाचा बोलबाला आहे!शब्द देखील यांत्रिक पद्धतीने जन्म घेऊ लागली आहेत!मास प्रोडक्शनच्या जमान्यात शब्द परकी होऊ लागली आहेत!शब्दांच्या बाजारात माणसं परकी होऊ लागली आहेत!शब्दांच्या महाजाळात शब्द धूर्त होऊ लागली आहेत!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१८ऑक्टोबर २०२२
Comments
Post a Comment