यमना
🙏🌹यमना🌹🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*****************
... नानाभाऊ माळी
यमना!!यमना खाता पेता पन गरीब घरनी पोर!जिल्हापरिषदनी सायम्हा
पाचंवी पावूत शिकनी!आंगेनां गावलें हायस्कुल व्हती तठे मॅट्रिक पावूत शिकनी!बापनी नदारीनी परिस्थिती व्हती!मव्हरें शिक्सन बंद व्हयन!यमना याचं च्यार पुस्तके शिकेल ऱ्हायनी!आग्नी साक्ष सात फेरा लिधात!गाठपोटलं बांधायनं!पायना बोटेस्मा बेला घालात!कपायले कुकु लावा!गयामा मंगळसूत्र घाली,
जनमन्ही पक्की गाठ बांधी यमना लगीन व्हयी सासरले उनी!गरीबनी पोरं जनमदेता मायबाप सोडी लाख्यांघर सवसारले लाग्नी!🌹
यमनानंघरनां,तिन्हा नवरा!
मायबापनां उज्जी लाडायेलं पोऱ्या व्हता!मव्हरे बिघडी दारकूटय्या
व्हयना!चांगली चकारी सोडी दिन्ही!एक दिन माथा उपर व्हयी माय बापना डोकावंरं बठी ग्या!पोरे सोरे जलमलें उनात!सोनानां मुसना पोरे व्हतात!पन दारुना नांद पायी,पीयी पीयी हाद्या कुद्या मारालें लाग्ना व्हता!गली मैदान करी यमनानां माय-बापना भी उद्धार कराले लाग्ना व्हता!दारुंपायरें एक एक वावर इक्री काढ!पोटलें दोन पोरे सेतस हायी भी इसरी ग्या!तो पक्का बावचायी जायेल व्हता!मायबापना जीववरं पोसायेलं,पुरा इतरांयेलं व्हता!
वात्रायेलं व्हता!दारू पिनारा पहिले तोंडं दपाडतंस मंग मव्हरे धिरेस्करी निलाज्या व्हतस!कसला गमं नां पस्तावा ऱ्हास?🌹
यमनानं कायेज ठायकचं सुकायी गये!मन कोल्ल व्हयी गये!कोनलें सांगी?तिन्हा माय बापनी गरीबी व्हती!त्यास्ना हातवर सवसार,भाऊंनं लगीन व्हयेलं व्हतं!भवजायीनं तोंडं इय्यान्मायेक पाजेल व्हतं!चिरपायेलं व्हत!सासु-सासरासले समायी ऱ्हायंती हाइचं लाख मोलनं व्हत!सोतानं दुःख यमना कोनलें सांगु नई पावनी?खुल्ल बोलू पावनी नई!घयघय रडनी नई!मुक्की ती
मुक्कीच ऱ्हायनी!पले दोन सोनाना मुसना पोरे पन नवरांपायरें दारकूट्ट्यानी बायको म्हनीसनी शिक्का बठेलं!कोन कैवारी व्हतं तिन्ह ?करमन कप्पाय पुरं फुटी जायेल व्हतं!🌹
धाकल्ला पोरे कयता कयता मोठा व्हयी ऱ्हायंतातं!बापना धंगडा डोयावारी दखी ऱ्हायंतातं!दारू पेवावर गावमा उप्पाय धरी कय काढे!मुसडसोडी बोलत ऱ्हाये! आराया मारत ऱ्हाये!सवसार इरे खिरे व्हयी ऱ्हायंता!पेनारां लाजलज्या सोडी देतसं!वावरें इकीइकी
ऱ्हायेलं-सुयेल धल्ला-धल्लीनं नावनं वावर,मरद भाग दोन बिघा व्हतं ते भी दारकूट्ट्यानी इक्री काढ
चत्रायवार धल्लानां अंगठा ठी लिधा!त्यान्हा कचकाम्हा एक दिन त्यानं धल्ला देवले प्यारा व्हयी ग्या!सव महिनाम्हा धल्लीभी तयीतयी-बयीबयी आवरीस्नी रामनां मांगे चालनी गयी!देवध्यानीना पले राक्षस वूना व्हता!यमना पोरेसले पोटले धरीधरी रडत बठनी!गयेर दाटत ऱ्हायनी!डोकं झोडतं बठनी!
लाख्या कंगाल व्हयी ग्या!माय-बापलें खायी ग्या!तरीभी गावमा कोनले भी गाया टिकाडत बसे!घर बठी तमासा लयी ये!वावरे इकीफुकी पैसा सरी ग्यात!गच्ची उतमात करीस्नी आते ऱ्हातं घर इकानंमांगे लागेलं व्हता!यमनालें कुचमाल समजीस्नी वखरी देलं व्हतं!घर इकान आंगें पांगेनां, शेजाऱ-पाजरस्ना ध्यानमां येवावर त्यान्हावर रवसडी सुटनात!एकदिन चांगलंचं कुमंचाडी काढा!खर्चालें,दारू पेवाले पैसा ऱ्हायेत नई!पोटमां आगीन पडे!पोट दारू मांगे!यमना रोजे टोजे कामले जावालें लाग्नी!लाख्यांघरनी बाई निंदा टूपाले जावाले लाग्नी व्हती!परायंघर कामेसले जायी ऱ्हायंती!ऱ्हावालें सतानं घर व्हत तितलचं डोक घालाले जागा व्हती!🌹
त्याले पेवाले भेटे नई!कावरायेलंनी मायेक करालें लाग्ना व्हता!पोटम्हा आग चाले!सवरी-सुवरी अडडावर उधार पेवागुंता जाये, पन त्या टकोरा दिसनी हाकली देत!सवसार रस्तावर आनी सरकी ऱ्हायंता!यमना कामले जाये त्या पैसा मालक फाईन पैभारा उपाडीस्नी दारू पी ये!सरकता सरकता सवसारनं एक दिन एक चाकभी मुडी गये!पहिलं पेरेम,त्याग,आम्हनं-तुम्हनं बठ्ठ बठ्ठ जागावर ऱ्हायी गये!सोता सुखना ऱ्हायना नई,दुसरासले सुखनं ऱ्हावू दिन्ह नई!वरं इवानवर बसी तयतय करनारा मायबापसले भेटाले चालना ग्या!🌷
यमनालें दुःख दिसनी एक चांद मावयी ग्या!यमना नदारी म्हा जलमलें उनी,नवरा मांगे नदारी ठी ग्या!कपायना कुकु सर्गे चालना ग्या!दोन्ही पोरेसले पोटले धरी यमना रडत ऱ्हायनी!रातना अंधाराम्हा उजाये दखत ऱ्हायनी!…🌹
रानमून बाईंना,यमनानां दिन रडत खडतं जायी ऱ्हायंतातं!वल्ल दुःख धीरे धीरे सुकालें लाग्न व्हतं!घरमा दय दाना सरी गयेतातं!धिवसा दि नाता गोता पऱ्हा चालना ग्यात!दोन लालसन आनी सोतानां पोटगुंता डोकावर वझ धरी घर वावरेंस्म्हा मोलमजुरीले जावालें लाग्नी!करम न्हा भोग समजी घराम्हाइन भायेर पाय काढा!नवा दिन सुरु व्हयनातं!... 🌹🌹🌹
.............….
......झापाटाम्हा उठी यमनान्ही कोल्ल-वल्ल,रांधी-रुंधी भात्यामां बांध!एक भाकर आनी लोसन्न तिखं नेम्मन एक धुडकामां गुंढाई-गांढाई डालकीम्हा ठी दिन्ह!धाकला पोऱ्या राजू,सायमां जायेल व्हता!त्यानंगुंता डालकीमां दुफारलें सायम्हाईनं घर येवावर जेवाले झाकी ठेव!सोतागुंता भाकरी,लोसन्न तिख नेम्मन भात्याम्हा गुंढायी गांढायी धाकली डालकीम्हा ठेव!आखो करवत्या इय्या ठेवा!डालकी डोकावर ठी!कावड व्हडी कडी लायी!कुष्टाय लावं!वाव्हन्या पायस्मा सरकायांत!यमना वावरनांगंम ल्हाये ल्हाये पयेत सुटनी!
मेंयन्ह्या बाया मव्हरे निंघी जायेल व्हत्यात!यमना शेऱ्या,गटारी,गल्ल्या वलांडतं वावरना गाडरस्ते पयेत सुटनी!हाकारा-व्हकारा देत यमना वाव्हन्या व्हडत ल्हाये ल्हाये चाली ऱ्हायंती!🌹
गाव सोडी रस्तावर कोना सासूल नई लागी ऱ्हायंता!गाड रस्तानां आंगेपांगे जथबन तथ डोकापार गवत माती जायेल व्हतं!गाडरस्ता खोल व्हता!वावरेस्ना बांध रस्ताथीन उच्चा, डोकापार व्हता!बांधवरनां चिचा,निमन्हा झाडे पंधरा इस इस फूट उच्चा वाढेल व्हतात!झाडेस्वर येल्टा-उल्टा तंनंगेलं दिखी ऱ्हायंतातं!यमना जीव लयीस्नी पाय उखली पयी ऱ्हायंती!जाता जाता मव्हरे रस्तालें खोल लवन आडा व्हयेलं !रस्तातीन लवन खोल व्हता!खयखय पानी व्हायी ऱ्हायंत!मांगे मव्हरे चढ-उतार व्हता!लवनवर फरशी बसाडेलं व्हती!खोल लवंनम्हा लहू,बाजरीगवत हुभ व्हतं!लवननां दोन्ही काटे झाडं-येल्टास्नी हुस्त्या-कुस्त्या खेय मांडेलं दिखी ऱ्हायंता!येल्टा झाडेस्वर चढी बसेल व्हत्यात!येल्टास्ना फुलेस्नी हालतां वार्गांसंगे खेय मांडेलं व्हता!लवनन्हा फरशिंखालतीन काचनांमायेक अस्सल पानी व्हायी ऱ्हायंत!त्या सुन्नाट खोल रस्ते पानींना खयखय आवाज यी ऱ्हायंता!🌹
यमना ऐकली लवंननां फरशीवरतीन चाली ऱ्हायंती!जीव धरी चाली ऱ्हायंती!पाय उखली पयी ऱ्हायंती!लवनं वलांडी मव्हरे चढ वरतीन घामेघाम व्हयी पयी ऱ्हायंती!कान चौम्हेर ठी,डोये रस्तागंम लायी यमना पयी ऱ्हायंती!ल्हवं ल्हवं पाय उखली पयी ऱ्हायेंती!चालता चालता एकदम रस्तावरतीन एक सल्ल्या
झाडेस्वरतीन तंनंगी-तुंनंगी रस्तावरतीन पयेत आडा निंघी ग्या! त्या रंग बदलू सल्ल्या दखी यमना
एकदम भेमकायी गयी!बठ्ठा आंगले
सर सर काटा हुभा व्हयी ग्यात!घाम फुटी गयथा!ती मव्हरे पयत सुटनी!आंगे-पांगे सासूल लेत पयत सुटनी!मव्हरे रस्तानां जेवना-डावा बाजुलें जुवारी,बाजरी,कपाशी हुभ्या दिखी ऱ्हायंत्यांत!कापणीन वावर दिखनं,मव्हरे मेयन्या बाया वावरम्हा हुभ्या दिखान्यात!जिवमा जीव उना!
जुवारी कापाना व्हका व्हता!
मेयवाली न्हान्माय वावरनां मेयेरवर वाट दखत हुभी व्हती!यमनालें जल्दी येवानं दनकारी सांग आनी येता खेपे बट्ठ्या बायास्नी आपापला डबा नेम्मन झाकी ठेवात!करवत्या इय्या हातम्हा लिसनी आपापला चाचे धरी हुभी जुवारनीं कापनी सुरु व्हयी गयी!यमनानीं भी शेवटलं चाचधरी जुवारी कापनीलें सुरुवात कयी!
कंबर वाकी वाकी एक हातमा जुवारीना तोटा,दुसरा हातम्हा इय्या!इय्यानां हात जुवारीना तोटावर चाली ऱ्हायंता!जुवारी कापायी ऱ्हायंती!एक एक तोटा आडा पडी ऱ्हातातं!हुभी जुवारी कापायी आडी पडी ऱ्हायंती!आडी पडावर कडबा व्हयी ऱ्हायंता!चरचरात करवत्या इय्या चाली ऱ्हायंता!मांगे धसे दिखी ऱ्हायंतातं!दखता दखता हुभी जुवारी कापायी गयी!वारावर नाचणारां तोटा पुयास्मा बांधायी ऱ्हायंतातं!वरलांगे यांय बल्लाआडे बुडी ऱ्हायंता!पुल्ला दिनन्ही कायजी करी आजनां दिन बुडी ऱ्हायंता!🌹
यमना रस्ताधरी बायास्मेता व्हडात ऱ्हायनी!घर येतायेता अंधारानी कावड लायी लेयेल व्हतं!घरनं कावड हुघाडं, येता खेपे धाकला आंडोर मायले बिलग्ना!मायना मांडीवर डोक ठी हमसी हुमसी रडत ऱ्हायना!यमना न्हा आंसू उगता दिनगुंता डोयास्मझार कोल्ला व्हतं ऱ्हायनात!आंडोरन्हा डोकावर हात फिरत ऱ्हायनात!🌷
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३९७६५००
दिनांक-१५ऑक्टोबर २०२२
Comments
Post a Comment