निसर्ग सानिध्याच्या कुशीत तल्लीन झालो

निसर्गभक्तीत तल्लीन झालो
🌷🌷🌷🌹🌹🌹
*******************
... नानाभाऊ माळी 

बंधू-भगिनींनो!
भक्ती भक्ती असतें!भक्ती अंतरंगाची भाषा असतें!भक्ती दिव्यशक्ती असतें!श्रद्धापूर्वक भक्तीस्थळा पर्यंत पोहचता येत असतं!भक्तीची भाषा कधी अबोल असतें!कधी बोलकी असतें!कधी साध्य असतें!कधी असाध्य असतें!भक्तीच्या प्रवाहात उडी मारून अनुभूतीचा आनंद घेता येत असतो!भक्ती सानिध्य आहे!भक्ती माध्यम आहे!भक्ती दर्शन आहे!भक्ती दुर्बीण आहे,पाहिजे ते टिपता येतं असतं!भक्ती निर्गुणही आहे!भक्ती सगुण साकार ही आहे!भक्ती विशाल निसर्गाचा अंश आहे!
तल्लीनता तृप्तीचं शिखर आहे! निसर्ग कवीच्या ज्ञानेइंद्रियांना,मनाला जागृत करीत असतो!निसर्ग कुशीत एक दिवस राहिलात तर थकलेलं मन आणि शरीर पुढील एक महिना तरी ऊर्जेचा स्रोत बनून कार्य करीत असतो!अशा मनप्रसन्न सौंदर्यकुशीत जाऊन बसण्याचा योग काल आला होता!निमित्तही तसंच होतं!🌹

माणसाचं जीवन मधमाशी सारखे असावे!मधमाशी अनंत झाडं, वेलींवरीलं फुलं शोधित असतात!फुलातील रस शोषून घेत असतात!शोषलेला रस मध असतं!मधमाशा सतत नवनवीन फुलांच्या शोधात असतात!अथक उडत असतात!
कणकण वेचून कष्टाचं मध गोळा होत असतं!म्हणूनचं माणसाने देखील सतत आणि सातत्य ठेवून मधमाशी सारखे ज्ञानकण वेचित राहिले पाहिजे!🌹

ज्ञान अघाध आहे!आयुष्य लहान आहे!कमी आयुष्यात जे जे चांगले ते वेचून इतरांना वाटले तर ज्ञानेशांच्या संजीवन समाधीवर आपलं आयुष्य अर्पित केल्याचं ईश्वरीय आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही!ज्ञानदेवांनी कमी आयुष्यात जीवन सार सांगून कर्मपूर्तीचा अर्थ जन सामान्यांच्या हृदयी उतरवला होता!नंतर कैवल्यधामाकडे प्रयाण केले होते!कर्मदानाच्या समारोहातून ज्ञानज्योतीने संजीवन समाधीकडे  प्रयाण केले होते!कमी आयुष्यात हजारो पिढ्यांना पुरेलं एवढे ज्ञान देवून,संत ज्ञानेश्वर संजीवन झाले!अमृत झाले!चंदन झाले!चिरंजीवी झाले!पृथ्वीच्या समारोपापर्यंत अमर झाले!प्रत्येकाच्या अंतरगात श्वास होऊन राहिले आहेत!🌹

एकवीस-बावीसाव्या वर्षी ज्ञानामृत पाजून चिरंतन देह चिंतनातून मुक्त झाला होता !..कोणाला पन्नास वर्षांचं आयुष्य लाभलं आहे!कोणाला शंभरीपार लाभलं असेलही!मानव कल्यानंहेतू आपण काय दान दिलें? ज्ञानकण वेचित वेचित ते सांडले देखील पाहिजे!देता देता घेता आलं पाहिजे!सदगुणांचं विशाल आभाळ घेता आलं पाहिजे!दुर्गुणांचां भार मनातून मातीत पुरता आला पाहिजे!सदविचारांच्या होमात जळता आला पाहिजे!देहातील ज्योती एक दिवस अमृत तेलाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून जाणार आहे!निश्चिलं,निरव ज्योतिविना देह
सरणज्वालेतं एकजीव होत राखेचा  अंश अस्तित्वाच्या स्वरूपात दिसणार आहे!ज्ञानेशांनी निसर्ग सानिध्यातून भक्तीत अमृत ओतले होते!🌹

बंधू-भगिनींनो!
निसर्ग ज्ञानदानाचा सद्गुरु आहे!निसर्ग सानिध्यात आपण खूप काही शिकत असतो!देणे शिकत असतो!घेणे शिकत असतो!परोपकार शिकत असतो!निळ्याशार आभाळा खाली भुतलावर पांघरलेली हिरवीगार चादर मन मोहित करीत असतें!वनातील पशु-पक्षांचां संचार पाहून नजरेतून ज्ञानकण टिपित अंतरंगात विहार करू लागतात!तेथे ज्ञानेशांची ज्ञाणेश्वरी दिसू लागते!तुकोबांची गाथा दिसू लागते!रामदासांचे श्लोक अवतरू लागतात!अंतरंगात ओव्या पाझरू लागतात!भक्तीसागरातील ज्ञानमोती शब्दांसाठी आतुर होवू 😄
लागतात!शब्दमोती वाटण्यातलं समाधान मोक्षाहुन आनंददायी असतं!मधमाशी,फुलपाखरं मधुकण वेचित असतात!हे निसर्गाचं दान आहे!🌹

माणसाने मिळालेल्या देहाचा उपयोग सत्कारणी लावला तर भक्ती आनंदाचा सोहळा याचं जन्मात साजरा होईल!ज्ञानियाच्या पायरीची वीट होता येईल!पुंडलिकाच्या कुशीत जाऊन बसता येईल!पांडुरंगाधी पुंडलिकाची भेट घेता येईल!आंतरिक श्रद्धाभाव जन्म घेत राहील!सदगुणांच्या संगतीचा लाभ होत
जाईल!ज्ञान कणाकणांनी  मनचक्षुतुन घेत घेत, एक एक पायरी चढत जायचं आहे!त्या पायरीपर्यंत पोहचण्यासाठी निसर्ग माध्यम आहे!आध्यात्म,भक्ती,अनुभूती अन अवलोकन ही माध्यम  आहेत!दिव्या पर्यंत पोहचण्याची!🌹

कला,कविता,शिल्प,ओव्या,आतुरता, उत्सुकता,अत्यंत्यिक ओढ आणि वास्तव दर्शनातून जीवनानंदाचा लाभ होत असतो!संपूर्ण मानव समाजाच्या कल्यानासाठी,हितासाठी महापुरुष झटत होते!झटत आहेत!साहित्यिक, कवी,विचारवंत झटत आहेत!कविता  संस्कृती दर्शनाचं उत्तम माध्यम आहे,सहज सुंदर अंग आहे!कवितेतून माणूस जानता येत असतो!निसर्गातून माणूस जानता येत असतो!अनुभूतीतून प्रबोधन होत असतं!निसर्गसानिध्याचां लाभ आपल्या मनावर,तनावर होत असतो!कवी मुळातचं संवेदनशील असतो!मनात शब्दबीज जन्म घेऊ पहातं असतं!कवी हळवा होतो!समाज आणि निसर्ग आपल्या नेत्रदुर्बीणीतून प्राशून घेत असतो!मनातलं बीज जन्म घेत,शब्दातून उमलत ओवी,कविता होते!निसर्ग विशाल कवितासंग्रह होतो!मुक्त्तहस्ते मिळालेलं निसर्गदान कवी वाटत हिंडतो!🪷

बंधू-भगिनींनो!
काल दिनांक १२ऑक्टोबर रोजी निसर्गकुशीचां सर्वांनंद घेण्यासाठी पुण्यातील "साहित्यसम्राटचें" सशक्त  आधारखांब कवी, उरुळीकांचंन शेजारील प्रयागधाम परिसरातील नायगावातं, प्रतिहिमालयात गेलो होतो!प्रसिद्ध कवी सूर्यकांत नामगुडे सर,साहित्य सम्राटचे अध्यक्ष कवी विनोदजी अष्टूळ,कवी किशोर टिळेकर अन त्यांच्या सोबत मी नानाभाऊ माळी निसर्गाने भरभरून दिलेल्या दानाचां स्वर्गीय आनंद घेत होतो!🌹

निसर्गानुभूतीचा विशाल ठेवा नेत्रातुनी हृदयात खोलवर जावून बसत होता!डोळ्यांनी निसर्गामृत पीत होतो!प्रति हिमालयाच्या कुशीत जन्मजन्मांतराचं पुण्य ओंजळीत घेऊन पीत होतो!कवी निसर्गाच्या विविध ढंगी,विविध रंगीं साक्षात्काराने अचंबित होत असतो!याचं देही जीवनाचां सुंदर सोहळा साजरा करण्यात दंग होत असतो!आम्हाला तेथे  शिवालय भेटल्याचा भास होत होता!तेथे ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर दिसतं होते!तेथे अनेक ऋषींमुनी भेटल्याचा भास होत होता!तेथे देवभूमी दिसतं होती!तेथे आयुष्याचा परमोच्च आनंदी क्षण अनुभवत होतो!तेथे भक्ती पताका फडकत होत्या!स्वर्गसुखाच्या सानिध्यात विठ्ठल आपल्या बालगोपालांना अंगा खांद्यावर घेतल्याचा भास होत होता!तेथे जन्मसार्थक झाल्याची अनुभूती होत होती!कवी निसर्गात रममान झाला होता!साहित्यरसाचें अमृत थेंब शब्द रूप घेत कविता जन्म घेत होती!भवसागरात चिंब भिजत होतो!ज्ञानियाचा वेलू धरुनी भवसागर पार करीत तटावर विसावलो होतो!कवी तृप्तीचां अनुभव घेत पुण्याला माघारी निघाला होता!जन्मसार्थकी लागल्याची अनुभूती होतं होती!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१३ऑक्टोबर २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)